Posted On:
29 SEP 2026 4:48PM by PIB Mumbai
नागपूर, 29 सप्टेंबर 2026
वर्धा येथील महात्मा गांधी आंतरराष्ट्रीय हिंदी विश्वविद्यालयाने (एमजीएएचव्ही) 26 सप्टेंबर रोजी “शहीद बाजी राऊत यांचा वारसा: राष्ट्र उभारणीसाठी युवकांना प्रेरित करणे” या विषयावरील राष्ट्रीय युवा परिषदेचा उद्घाटन सोहळा आयोजित केला होता. कस्तुरबा सभागृहात झालेल्या या कार्यक्रमात 150 हून अधिक विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला.
कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान भूषवताना, कुलगुरू प्रा. कुमुद शर्मा यांनी बाजी राऊत यांना आदरांजली वाहिली आणि 1938 मध्ये ढेंकनाल येथील प्रजामंडळ आंदोलनादरम्यान त्यांनी दिलेल्या बलिदानाचे स्मरण केले. 12 वर्षीय बाजी राऊत यांनी राज्य पोलिसांना त्यांच्या बोटीतून ब्राह्मणी नदी पार करू देण्यास नकार दिल्यानंतर त्यांना गोळ्या घालून ठार करण्यात आले होते. त्यांचे बलिदान सत्य आणि न्यायासाठी ठामपणे उभे राहण्याच्या भावनेचे प्रतीक होते, असे प्रा. शर्मा म्हणाल्या. 2026 हे राऊत यांची जन्मशताब्दी वर्ष आहे, अशी माहिती त्यांनी दिली.
_20260929155021_cd5128.jpeg)
राऊत यांच्या जीवनातील प्रमुख शिकवणींवर प्रकाश टाकत प्रा. शर्मा म्हणाल्या की, धैर्य हे वयावर अवलंबुन नसते. प्रामाणिकपणा आणि वचनबद्धतेने आपली जबाबदारी पार पाडण्यात खरे नागरिकत्व सामावलेले असते. भारताचा स्वातंत्र्यलढा हा गावे, संस्थाने आणि विविध भाषांमधील कथांनी समृद्ध आहे, असेही त्यांनी सांगितले. शिक्षक आणि संशोधकांनी अशा स्थानिक इतिहासांचे दस्तऐवजीकरण आणि भाषांतर करून ते हिंदीतून सर्वांसाठी उपलब्ध करून द्यावे असे आवाहन त्यांनी केले. तसेच विद्यार्थ्यांनी देखील आपल्या काळात सत्य आणि न्यायाचे समर्थन करावे, असा आग्रह त्यांनी केला.

ही परिषद भारतीय ऐतिहासिक संशोधन परिषद (आयसीएचआर) आणि भारतीय सामाजिक विज्ञान संशोधन परिषद (आयसीएसएसआर) यांच्या संयुक्त प्रयत्नातून तसेच ओदिशा संशोधन केंद्र (ओआरसी) यांच्या सहकार्याने आयोजित केली जात आहे. नोडल अधिकारी डॉ. चंद्रशेखर पांडे यांनी या परिषदेतील सहभागींचे स्वागत केले, तर स्कूल ऑफ लॉ’चे अधिष्ठाता प्रा. जनार्दन तिवारी यांनीही उपस्थितांना मार्गदर्शन केले. परिषदेचा भाग म्हणून निबंध लेखन स्पर्धा, कार्यशाळा आणि वक्तृत्व स्पर्धा आयोजित केल्या जात आहेत. या परिषदेचा समारोप 2 ऑक्टोबर रोजी समारोप आणि पारितोषिक वितरण समारंभाने होईल. डॉ. योगेंद्र बाबू यांनी उद्घाटन सोहळ्याच्या शेवटी उपस्थितांचे आभार मानले.

* * *
पीआयबी मुंबई | सुषमा काणे/श्रद्धा मुखेडकर/दर्शना राणे
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai