पंतप्रधान कार्यालय
azadi ka amrit mahotsav

आशियाई क्रीडा स्पर्धेत पुरुषांच्या लांब उडी प्रकारात पदक जिंकल्याबद्दल पंतप्रधानांनी मुरली श्रीशंकर याचे केले अभिनंदन

Posted On: 28 SEP 2026 10:16PM by PIB Mumbai

नवी दिल्‍ली, 28 सप्‍टेंबर 2026

 

आशियाई क्रीडा स्पर्धेत पुरुषांच्या लांब उडी प्रकारात आणखी एक पदक जिंकल्याबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मुरली श्रीशंकर याचे अभिनंदन केले आहे.

या लांब उडीमुळे त्यांना पदक विजेत्यांच्या मंचावर यथोचित स्थान मिळाले असे पंतप्रधानांनी नमूद केले. पंतप्रधान मोदी यांनी श्रीशंकर याचे अभिनंदन करत त्याला भविष्यात आणखी अनेक यशांसाठी शुभेच्छा दिल्या.

‘एक्स’ या समाजमध्यमांवरील संदेशांत पंतप्रधान म्हणतात :

“मुरली श्रीशंकरने आशियाई क्रीडा स्पर्धेत आणखी एक पदक जिंकले!

त्याच्या उडीमुळे त्याला पुरुषांच्या लांब उडी प्रकारात पदक विजेत्यांच्या मंचावर त्याला स्थान मिळाले.

त्याबद्दल त्याचे अभिनंदन. पुढील वाटचालीसाठी आणि अनेक यशासाठी त्याला  शुभेच्छा: PM @narendramodi"

 

* * *

सुषमा काणे/सविता म्‍हस्‍कर/दर्शना राणे

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai


(Release ID: 2316301) अभ्यागत कक्ष : 8