ग्राहक व्यवहार, अन्न आणि सार्वजनिक पुरवठा मंत्रालय
azadi ka amrit mahotsav

भारतीय मानक ब्यूरो मुंबई कार्यालयाद्वारे ‘मानक मंथन’ कार्यक्रम आणि परिसंवादाचे आयोजन

Posted On: 28 SEP 2026 7:38PM by PIB Mumbai

मुंबई, 28 सप्‍टेंबर 2026

 

भारतीय मानक ब्यूरोच्या (बीआयएस) मुंबई शाखा कार्यालयाद्वारे, 'IS 14772:2020 – घरगुती आणि तत्सम स्थिर विद्युत उपकरणांसाठीचे बॉक्स आणि एन्क्लोजर - सामान्य गरजा' या मानकाच्या सुधारित मसुद्याच्या व्यापक प्रसारासाठी आज पवई येथील कार्यालयात एक परिसंवाद आणि मानक मंथन कार्यक्रम घेण्यात आला.

सुधारित मानकाच्या मसुद्यात प्रस्तावित केलेले प्रमुख बदल आणि लागू असणाऱ्या चाचण्यांच्या गरजांबद्दल भागधारकांना अवगत करणे, तसेच या मसुद्यावर त्यांची मते, सूचना आणि टिप्पण्या मिळवण्यासाठी एक व्यासपीठ उपलब्ध करून देणे, हा या कार्यक्रमाच्या आयोजनामागचा उद्देश होता.

कार्यक्रमाची सुरुवात बीआयएसचे शास्त्रज्ञ-सी अनुराग यांच्या स्वागतपर भाषणाने झाली. त्यांनी उपस्थित भागधारकांचे स्वागत केले आणि मानक निर्धारण प्रक्रियेत भागधारकांच्या सहभागाचे महत्त्व अधोरेखित केले.

बीआयएस मुंबई शाखा कार्यालयाचे शास्त्रज्ञ-सी ऋषिकेश घोडके यांनी तांत्रिक सत्रांचे संचालन केले. यामध्ये त्यांनी IS 14772:2020 शी संबंधित चाचण्यांचे निकष आणि सुधारित मानकाच्या मसुद्यात प्रस्तावित केलेल्या मुख्य बदलांचा सविस्तर आढावा घेतला.

तांत्रिक सत्रानंतर भागधारकांशी थेट संवाद आणि चर्चासत्राचे आयोजन करण्यात आले. या दरम्यान उपस्थितांनी प्रस्तावित सुधारणा आणि चाचण्यांचे निकष यासंदर्भात आपापली मते, सूचना व टिप्पण्या नोंदवल्या.

या परिसंवाद आणि मानक मंथन कार्यक्रमाने बीआयएस आणि भागधारकांमध्ये संवादाचे एक महत्त्वाचे व्यासपीठ उपलब्ध करून दिले, ज्यामुळे भारतीय मानकाच्या प्रस्तावित सुधारणेवर अर्थपूर्ण चर्चा होऊ शकली. भागधारकांकडून प्राप्त झालेल्या सूचना मानक निर्धारण प्रक्रियेला गती देतील आणि सुधारित निकषांच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी उपयुक्त ठरतील.

भारतीय मानक विकास आणि  सुधारणेमध्ये व्यापक सहभागाला प्रोत्साहन देण्यासाठी आणि गुणवत्ता व मानक निर्धारणाची परिसंस्था अधिक मजबूत करण्यासाठी बीआयएस अशा 'मानक मंथन' कार्यक्रमांच्या माध्यमातून उद्योग क्षेत्राशी आणि इतर भागधारकांशी सातत्याने संवाद साधत आहे. 

 

* * *

पीआयबी मुंबई | निलिमा चितळे/वैभवी जोशी/दर्शना राणे

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai


(Release ID: 2316175) अभ्यागत कक्ष : 34
Read this releasein: English