Posted On:
24 SEP 2026 3:42PM by PIB Mumbai
नागपूर, 24 सप्टेंबर 2026
केंद्र सरकारच्या खाण मंत्रालयाअंतर्गत असलेल्या नागपूर येथील जेएनएआरडीडीसी अर्थात जवाहरलाल नेहरू अल्युमिनियम रिसर्च डेव्हलपमेंट अँड डिझाइन सेंटरच्या संचालकपदाचा कार्यभार डॉ. रोहित कुमार गुप्ता यांनी 23 सप्टेंबर 2026 पासून स्वीकारला आहे. डॉ. गुप्ता हे प्रख्यात धातुशास्त्रज्ञ असून त्यांना अंतराळ आणि सामरिक क्षेत्रात नवीन धातू किंवा सामग्री निर्माण, प्रक्रिया, धातू क्षमता, गुणधर्म तपासणी आणि बिघाड विश्लेषण यासंदर्भात 26 वर्षांहून अधिक काळाचा अनुभव आहे. जेएनएआरडीडीसीपूर्वी ते इस्रोच्या तिरुवनंतपूरम इथल्या लिक्विड प्रोपल्शन सिस्टम्स सेंटर येथे मटेरिअल्स डेव्हलपमेंट अँड प्रॉडक्शन'चे महाव्यवस्थापक होते. तसेच इस्रोच्या विक्रम साराभाई अंतराळ केंद्रात त्यांनी विविध पदे भूषवली आहेत.

त्यांनी पीएसएलव्ही, जीएसएलव्ही, एलव्हीएम 3, चांद्रयान, मंगळयान, आदित्य-एल 1 आणि गगनयान यांसारख्या इस्रोच्या प्रमुख कार्यक्रमांसाठी प्रगत सामग्रीच्या स्वदेशी विकासात महत्त्वपूर्ण योगदान दिले आहे. तसेच, त्यांना अनेक राष्ट्रीय आणि संस्थात्मक पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आले आहे; यामध्ये पोलाद मंत्रालयाचा 'मेटलर्जिस्ट ऑफ द इयर अवॉर्ड (लोहेतर) - 2019' चा समावेश आहे.
जेएनएआरडीडीसी येथे डॉ. गुप्ता ॲल्युमिनियम आणि त्याचे मिश्रधातू, महत्त्वपूर्ण खनिजे, धातू पुनर्वापर, पदार्थ संशोधन तसेच चाचणी आणि प्रमाणीकरण या क्षेत्रांतील केंद्राच्या संशोधन व विकास क्रियाकलापांचे नेतृत्व करतील; यामुळे देशाच्या लोहेतर धातू आणि खनिज क्षेत्रात जेएनएआरडीडीसीचे योगदान अधिक वृद्धिंगत होईल.
* * *
पीआयबी मुंबई | सुषमा काणे/सोनाली काकडे/दर्शना राणे
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai