Posted On:
24 SEP 2026 3:05PM by PIB Mumbai
नागपूर, 24 सप्टेंबर 2026
वेस्टर्न कोलफील्ड्स लिमिटेडने स्वच्छता ही सेवा 2026 आणि विशेष मोहीम 6 अंतर्गत आपल्या विविध कार्यक्षेत्रांमध्ये समुदाय केंद्रित उपक्रमांच्या मालिकेचे आयोजन केले. स्वच्छता, पर्यावरण रक्षण, कचऱ्याचे जबाबदारपूर्वक व्यवस्थापन आणि सक्रिय लोकसहभागाला प्रोत्साहन देणे हा या उपक्रमांचा मुख्य उद्देश होता.
या उपक्रम मालिकेअंतर्गत पाथाखेडा क्षेत्रात छत्तरपूर इथल्या उच्च माध्यमिक शाळेत मैत्रीपूर्ण कबड्डी सामन्याचे आयोजन करण्यात आले होते. या स्पर्धेत दोन पुरुष आणि दोन महिला अशा एकूण चार संघांनी भाग घेतला. विद्यार्थी, शिक्षक आणि स्थानिक समुदायाच्या प्रतिनिधींनी या उपक्रमात उत्स्फूर्त सहभाग नोंदवला. या क्रीडा उपक्रमाच्या माध्यमातून स्वच्छता, सांघिक भावना आणि सामूहिक जबाबदारीचा संदेश देण्यात आला.

चंद्रपूर क्षेत्रात चंद्रपूरच्या केंद्रीय विद्यालात कचऱ्यापासून उपयुक्त वस्तू निर्माण करण्यासंबंधी (Waste to Wealth) जनजागृती कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. याअंतर्गत विद्यार्थ्यांना कचऱ्याचे वर्गीकरण, पुनर्वापर आणि टाकाऊ पदार्थांचे उपयुक्त संसाधनांमध्ये रूपांतर करण्याविषयी मार्गदर्शन करण्यात आले. या कार्यक्रमातून विद्यार्थ्यांना कचरा व्यवस्थापनाबाबत जबाबदारीने वापरात आणण्याच्या कार्यपद्धींचा अवलंब करण्यासाठीची प्रेरणा मिळाली.
यासोबतच पेंच क्षेत्रात पराशिया ब्लॉक अंतर्गतच्या गावांमध्ये रांगोळी स्पर्धांचे आयोजन करण्यात आले होते. या स्पर्धांमध्ये शालेय विद्यार्थ्यांनी आणि ग्रामस्थांनी उत्साहाने भाग घेतला. रंगीबेरंगी रांगोळ्यांच्या माध्यमातून स्वच्छता, आरोग्य, पर्यावरण रक्षण आणि प्लास्टिकमुक्त परिसर ठेवण्याचे महत्त्व प्रभावीरित्या मांडण्यात आले.
या समुदाय-केंद्रित उपक्रमांच्या माध्यमातून वेस्टर्न कोलफील्ड्स लिमिटेडने स्वच्छता ही एक सामायिक जबाबदारी असल्याचा संदेश पुन्हा एकदा सर्वदूर पोहचवला. वेस्टर्न कोलफील्ड्स लिमिटेडच्या वतीने स्वच्छता ही सेवा 2026 आणि विशेष मोहीम 6 च्या उद्दिष्टांच्या अनुषंगाने, लोकसहभागाला प्रोत्साहन देण्यासोबतच समुदायांमध्ये स्वच्छता, पर्यावरण रक्षण आणि शाश्वत कचरा व्यवस्थापनाबाबत सातत्यपूर्ण जनजागृती केली जात आहे.
* * *
पीआयबी मुंबई | सुषमा काणे/तुषार पवार/दर्शना राणे
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai