दूरसंचार आणि माहिती तंत्रज्ञान मंत्रालय
azadi ka amrit mahotsav

टपाल विभागाद्वारे 1 ऑक्टोबर रोजी विभाग स्तरीय डाक अदालतीचे आयोजन

Posted On: 23 SEP 2026 4:29PM by PIB Mumbai

पणजी,23 सप्टेंबर 2026

टपाल विभाग, गोवा तर्फे 1ऑक्टोबर 2026 रोजी सकाळी 11:00 वाजता, पणजी येथील वरिष्ठ टपाल अधीक्षकांच्या कार्यालयात विभागीय स्तरावरील डाक अदालतीचे आयोजन करण्यात आले आहे.

या अदालतीत टपाल सेवेशी संबंधित सहा आठवड्यांच्या आत उत्तर न मिळालेल्या तक्रारी आणि समस्या विचारात घेतल्या जातील.

प्रत्येक अर्जात केवळ एकाच तक्रारीचा समावेश असावा. सुरुवातीला ज्या अधिकाऱ्यांकडे मूळ तक्रार केली आहे त्या अधिकाऱ्याचे नाव आणि पद यांचा उल्लेख तक्रार अर्जामध्ये असावा. अर्जामध्ये मूळ कागदपत्रांची प्रत जोडणे बंधनकारक आहे.

अदालतीमध्ये तक्रारअर्ज समक्ष दाखल करावेत किंवा ते वरिष्ठ अधीक्षक टपाल कार्यालय, गोवा विभाग, पणजी - 403001 या पत्त्यावर पोस्टाने पाठवावे. हे अर्ज कार्यालयात 29 सप्टेंबर 2026 पर्यंत पोहोचणे आवश्यक आहे.

 
 

पीआयबी मुंबई |नेहा कुलकर्णी/भक्ती सोनटक्के/प्रिती मालंडकर 

 

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai

 

 


(Release ID: 2313934) अभ्यागत कक्ष : 47
Read this releasein: English