रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्रालय
azadi ka amrit mahotsav

केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते नागपूरच्या नव्या इंदोरा चौक – दिघोरी चौक उड्डाणपुलाचे उद्घाटन


राष्ट्रीय महामार्ग 353डी वरच्या या 8.90 किमी लांब पूलामुळे, वाहतूक अधिक सुरळीत होऊन, दळणवळण आणि रस्ते सुरक्षेत होणार वाढ

Posted On: 18 SEP 2026 6:00PM by PIB Mumbai

 

नागपूरच्या नागरी रस्ते पायाभूत सुविधांमध्ये एक महत्वाची भर घालण्यास, नागपूर शहर सज्ज झाले आहे. शहरातल्या इंदोरा चौक – दिघोरी चौक या राष्ट्रीय महामार्ग 353डी  वरच्या नव्या उड्डाणपुलाचे उद्घाटन, उद्या म्हणजेच शनिवारी, 19 सप्टेंबर 2026 ला दुपारी साडे चार वाजता रेशीमबाग चौक, नागपूर इथे होणार आहे.

केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते या पुलाचे उद्घाटन होईल. यावेळी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे, यांच्यासह, शिवेंद्रसिंह भोसले, अॅड. आशीष जयस्वाल, इतर मान्यवर आणि वरिष्ठ अधिकारी उपस्थित राहणार आहेत.

राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने हाती घेतलेला हा प्रकल्प राष्ट्रीय महामार्ग-353डी  वरील नागपूर–उमरेड या मार्गिकेचा भाग आहे. या मार्गिकेमुळे इंदोरा चौक (NH-44), अशोक चौक, शीतला माता चौक आणि दिघोरी चौक हे प्रमुख मार्ग जोडले जातील.

एकूण 8.90 किलोमीटर लांबीच्या या पूलांममध्ये, 6.37 लांबीचा उड्डाणपूल असून, 997.44 कोटी रुपये खर्चून हा प्रकल्प पूर्ण करण्यात आला आहे.

प्रकल्पाची प्रमुख वैशिष्ट्ये :

उड्डाणपूलाची रुंदी, 12 मीटर इतकी असून, दोन्हीकडच्या वाहतुकीची सोय होण्यासाठी, त्यात दोन मार्गिका देण्यात आल्या आहेत. या पूलाच्या बांधकामात, अल्ट्रा-हाय परफॉर्मन्स फायबर-रिइन्फोर्स्ड काँक्रीट (UHPFRC) तंत्रज्ञानाचा वापर करण्यात आला आहे. त्याची कमाल लांबी 90 मीटर आहे. या संरचनेत 60 मीटर लांबीच्या 34 स्पॅनचा समावेश आहे. भांडे प्लॉट आणि शीतला माता चौक येथे प्रत्येकी 90 मीटर लांबीचे दोन स्पॅन आहेत, तर उर्वरित स्पॅनची लांबी 45 मीटर आहे.

या प्रकल्पात, दोन आर ओ बी म्हणजे, रेल्वे उड्डाणपूल असून, 13.82 किमीचे सर्व्हिस आणि स्लिप मार्ग आहेत. पाचपावली इथे सध्या असलेल्या रेल्वे उड्डाणपुलाची जागा नवा पूल घेईल. तर, नाईक तलाव आणि पाचपावली दरम्यानचे रॅम्प तसेच कायम ठेवण्यात आले आहेत. ताजबाग इथे वर आणि खाली जाण्यासाठी, रॅम्प देण्यात आले असून, डागा मेमोरियल विमेन्स हॉस्पिटल च्या तिथे खाली जाणारा रॅम्प देण्यात आला आहे.  

अग्रसेन चौक इथे उड्डाणपूल पहिल्या स्तरावर बांधण्यात आला असून, त्यावरून विद्यमान मेट्रो मार्गिका दुसऱ्या स्तरावरून जाते. त्यामुळे दोन्ही संरचना वेगवेगळ्या उंचीच्या स्तरांवर कार्यरत राहतात. अशोक चौक इथे पायलन  संरचनेसह उन्नत गोलाकार वाहतूक व्यवस्था (रोटरी) उभारण्यात आली आहे. या रोटरीला भंडारा रोड, मेडिकल चौक आणि नागपूर बसस्थानकाच्या दिशेने जाणाऱ्या रॅम्पद्वारे जोडण्यात आले आहे.

***

सुवर्णा बेडेकर/राधिका अघोर/परशुराम कोर

*** 

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai


(Release ID: 2312208) अभ्यागत कक्ष : 55
Read this releasein: English