दूरसंचार आणि माहिती तंत्रज्ञान मंत्रालय
azadi ka amrit mahotsav

वेळेत तक्रार निवारणासाठी महाराष्ट्र आणि  गोवा केंद्रीय संचार लेखा नियंत्रक कार्यालयाकडून नाशिक येथे त्रैमासिक पेन्शन अदालतीचे आयोजन

Posted On: 18 SEP 2026 3:20PM by PIB Mumbai

 

महाराष्ट्र आणि  गोवा संचार लेखा नियंत्रक अर्थात सीसीए कार्यालयाने 18 सप्टेंबर, 2026 रोजी नाशिक येथे त्रैमासिक पेन्शन अदालतीचे आयोजन केले. ही पेन्शन अदालत महाराष्ट्र आणि  गोवा संचार लेखा नियंत्रक डॉ. सतीश चंद्र झा यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली.

या पेन्शन अदालतीने निवृत्तीवेतनधारकांना निवृत्तीवेतनाशी संबंधित  त्यांच्या तक्रारी मांडण्यासाठी आणि समस्यांचे वेळेवर निराकरण करण्यासाठी एक प्रभावी व्यासपीठ उपलब्ध करून दिले. कामकाजादरम्यान सादर केलेल्या प्रकरणांची सविस्तर तपासणी करण्यात आली आणि सीसीए (निवृत्तीवेतन)  नियमांमधील तरतुदींनुसार त्यावर कार्यवाही करण्यात आली.

 यावेळी  उपस्थित निवृत्तीवेतनधारकांनी महाराष्ट्र व गोवा सीसीए कार्यालयाच्या पारदर्शक आणि निवृत्तीवेतनधारक-स्नेही कार्यपद्धतीचे कौतुक केले. तसेच, त्यांच्या निवृत्तीवेतन-संबंधित समस्यांचे निराकरण करण्यासाठी अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी दिलेल्या सहकार्याचीही त्यांनी नोंद  घेतली.

 उपस्थितांना संबोधित करताना, डॉ. सतीश चंद्र झा यांनी निवृत्तीवेतन-संबंधित बाबींचा वेळेवर निपटारा करण्यासाठी आणि जलद, पारदर्शक व निवृत्तीवेतनधारक-केंद्रित सेवा देण्यासाठी सीसीए, महाराष्ट्र आणि गोवा यांच्या वचनबद्धतेचा पुनरुच्चार केला.‘अहर्निशं सेवामहे’ या विभागीय ध्येयवाक्याचा संदर्भ देत, त्यांनी निवृत्तीवेतनधारकांशी थेट संवाद साधण्यासाठी आणि प्रभावी तक्रार निवारणासाठी एक व्यासपीठ म्हणून निवृत्तीवेतन अदालतींच्या महत्त्वावर प्रकाश टाकला. तसेच, एका प्रतिसादक्षम, पारदर्शक, कार्यक्षम आणि नागरिक-केंद्रित यंत्रणेद्वारे निवृत्तीवेतन-संबंधित तक्रारी विहित मुदतीत सोडवण्याच्या गरजेवर त्यांनी भर दिला.

यावेळी प्रशांत ओ. एस., वरिष्ठ लेखा अधिकारी (निवृत्तीवेतन) आणि सुमित अवस्थी, लेखा अधिकारी (प्रशासन) हे देखील उपस्थित होते. त्यांनी निवृत्तीवेतनधारकांशी संवाद साधला आणि कार्यक्रमाच्या कामकाजात सहभाग घेतला.

सुमित अवस्थी यांनी केलेल्या आभार प्रदर्शनानंतर कार्यक्रमाची सांगता झाली. निवृत्तीवेतन अदालतीच्या यशस्वी आयोजनात सक्रिय सहभाग आणि योगदान दिल्याबद्दल त्यांनी निवृत्तीवेतनधारक, अधिकारी आणि कर्मचाऱ्यांचे आभार मानले. 

***

निलिमा चितळे/राजेश शिरभाते/परशुराम कोर

*** 

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai


(Release ID: 2312104) अभ्यागत कक्ष : 45
Read this releasein: English