Posted On:
18 SEP 2026 12:02PM by PIB Mumbai
जागतिक पर्यटन दिनाच्या निमित्ताने, गोवा सरकारचा पर्यटन विभाग आणि मिरामार येथील गोवा विज्ञान केंद्र यांनी एकत्र येऊन, गृहिणींसाठी चार दिवसीय ‘चितारी हेरिटेज आर्ट वर्कशॉप’ (चितारी वारसा कला कार्यशाळा) आयोजित केले आहे.
ही कार्यशाळा 22 ते 25 सप्टेंबर 2026 या कालावधीत दुपारी 3:00 ते 5:00 या वेळेत गोवा विज्ञान केंद्र, मिरामार येथे आयोजित केली जाईल. सहभागींना 'चितारी' या पारंपरिक कलाप्रकाराची ओळख करून देणे आणि प्रत्यक्ष सादरीकरणाद्वारे गोव्याच्या सांस्कृतिक वारशाचा हा वैशिष्ट्यपूर्ण पैलू जाणून घेण्याची आणि शिकण्याची संधी प्रदान करणे, हे या कार्यशाळेचे उदिष्ट आहे.
गोव्याच्या समृद्ध सांस्कृतिक परंपरा आणि वारशाबद्दल अधिक जागरूकता आणि आदर निर्माण करणे, हा या उपक्रमाचा उद्देश आहे. परस्परसंवादी उपक्रमांच्या माध्यमातून, सहभागींना पारंपरिक कलाप्रकारांशी जोडले जाण्याची तसेच गोव्याचा सांस्कृतिक वारसा जतन आणि संवर्धन करण्याच्या महत्त्वाविषयी जाणीव जागृत करण्याची संधी मिळेल.
ही कार्यशाळा सर्जनशीलता, पारंपरिक ज्ञान आणि सांस्कृतिक शिक्षण यांचा संगम घडवून आणणारा एक रंजक अनुभव देईल. जागा मर्यादित आहेत आणि नोंदणी 'प्रथम येणाऱ्यास प्राधान्य' या तत्त्वावर केली जाईल. नोंदणी आणि अधिक माहितीसाठी, 0832-2463426 या क्रमांकावर संपर्क साधावा, अथवा gscp.education[at]gmail[dot]com या पत्त्यावर ईमेल करावा.
नोंदणीसाठी लिंक: https://forms.gle/wiPrSsHGjnWHRHwNA

***
NitinFulluke / RajashreeAgashe / DineshYadav
Follow us on Social Media:
@PIBPanaji
/PIBPanaji
/pib_goa
pibgoa[at]gmail[dot]com
/PIBGoa