पंतप्रधान कार्यालय
पंतप्रधानांनी भगवान विश्वकर्मा यांच्याशी संबंधित,कालातीत ज्ञानावर भर देणारे एक संस्कृत सुभाषितही केले सामायिक
Posted On:
17 SEP 2026 4:14PM by PIB Mumbai
नवी दिल्ली,17 सप्टेंबर 2026
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी विश्वकर्मा जयंतीनिमित्त नागरिकांना शुभेच्छा दिल्या आहेत. देशभरातील बांधकाम आणि रचनात्मक निर्मिती कार्यात गुंतलेले कारागीर आणि कुशल कामगारांना त्यांनी विशेष शुभेच्छा दिल्या आहेत. विकसित आणि आत्मनिर्भर भारताचे स्वप्न साकार करण्यासाठी या कारागीरांचे आणि कुशल कामगारांचे कौशल्य, समर्पण आणि कठोर परिश्रम अत्यंत महत्त्वाचे आहेत, असे पंतप्रधानांनी म्हटले आहे. राष्ट्र उभारणीच्या दिशेने त्यांच्या प्रयत्नांना सर्वतोपरी पाठिंबा आणि प्रोत्साहन देण्याच्या सरकारच्या वचनबद्धतेचा त्यांनी यावेळी पुनरुच्चारही केला.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी, भगवान विश्वकर्मा यांच्याशी संबंधित असलेल्या कालातीत ज्ञानाचा उल्लेख करणारे एक संस्कृत सुभाषित सामायिक केले आहे:
"अनादिरप्रमेयश्च अरूपश्च जयाजयः।
लोकरूपो जगन्नाथः विश्वकर्मन्नमो नमः॥"
आपल्या ‘एक्स’ पोस्टवर पंतप्रधानांनी पोस्ट केले आहे:
आपल्या सर्वांना भगवान विश्वकर्मा जयंतीनिमित्त खूप खूप शुभेच्छा
देवांच्या शिल्पकाराशी संबंधित या पवित्र दिनानिमित्त निर्मिती कार्यात गुंतलेल्या देशभरातील; सर्व रचनात्मक कार्य करणाऱ्या कारागिरांचे आणि कुशल सहकाऱ्यांचे मी विशेष अभिनंदन करतो.
विकसित आणि आत्मनिर्भर भारताचा संकल्प साकार करण्यासाठी तुमचे कौशल्य आणि कठोर परिश्रम अत्यंत महत्त्वाचे आहेत.
राष्ट्राच्या नवनिर्मितीच्या दिशेने आपण करत असलेल्या प्रयत्नांना सदैव प्रोत्साहन मिळत राहील यासाठी आम्ही सर्व प्रकारे वचनबद्ध आहोत:
अनादिरप्रमेयश्च अरूपश्च जयाजयः।
लोकरूपो जगन्नाथः विश्वकर्मन्नमो नमः॥
नितीन फुल्लुके/संपदा पाटगावकर/प्रिती मालंडकर
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
(Release ID: 2311421)
अभ्यागत कक्ष : 6
Read this releasein:
English
,
Urdu
,
हिन्दी
,
Manipuri
,
Bengali
,
Bengali-TR
,
Assamese
,
Punjabi
,
Gujarati
,
Tamil
,
Telugu
,
Kannada
,
Malayalam