अणुऊर्जा विभाग
azadi ka amrit mahotsav

अणुऊर्जा विभाग आपल्या सहाव्या विशेष मोहीमेसाठी अत्यंत उत्साहात आणि आनंदात सज्ज

Posted On: 17 SEP 2026 3:16PM by PIB Mumbai

मुंबई, 17 सप्टेंबर 2026

अणुऊर्जा विभागाने (DAE) डिसेंबर 2025 मध्ये सुरू केलेल्या आपल्या चौथ्या विशेष मोहिमेच्या (4.0), पुढील टप्प्याअंतर्गत पाचव्या विशेष मोहीमेतही (5.0) आपला उत्साह कायम ठेवला आहे. विभागातील सर्व घटक युनिट्स, सार्वजनिक क्षेत्रातील उपक्रम आणि अनुदानित संस्था विशेष मोहिमेच्या पुढील टप्प्यासाठी सक्रियपणे कार्य करत आहेत.

पाचव्या विशेष मोहिमेच्या (5.0), पुढील टप्प्यात, डिसेंबर 2025 ते जुलै 2026 या कालावधीत, डीएईने 92 स्वच्छता मोहिमा राबवल्या. याअंतर्गत एकूण 82,901 दस्तावेजांचे पुनरावलोकन करण्यात आले, त्यापैकी 82,002 दस्तावेज निष्कासित करण्यात आल्या. तसेच, याच कालावधीत विभागाने 1,226 सार्वजनिक तक्रारी आणि 159 सार्वजनिक तक्रार अपीलांवर कार्यवाही केली.

या मोहिमेतील केलेल्या भंगाराच्या विल्हेवाटीतून 4 कोटी रुपयांपेक्षा जास्त महसूलही मिळाला आहे. याशिवाय, या मोहिमेमुळे सुमारे 8,882 चौरस फूट जागा मोकळी झाली.

अणुऊर्जा विभाग आता आपल्या सहाव्या विशेष मोहिमेसाठी (6) साठी सज्ज होत आहे. यासाठी विभागातील सर्व घटक समूह, सार्वजनिक क्षेत्रातील उपक्रम आणि अनुदानित संस्थांना या मोहिमेत सक्रियपणे सहभागी होण्याचे, सामाजिक माध्यमांद्वारे त्यांच्या उपक्रमांना व्यापक प्रसिद्धी देण्याचे आणि नाविन्यपूर्ण कल्पना व सर्वोत्तम पद्धतींचा अवलंब करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.

सहाव्या विशेष मोहिमेच्या तयारीच्या टप्प्याचा भाग म्हणून, 15 सप्टेंबर ते 30 सप्टेंबर 2026 या कालावधीत, विभागाने सर्व संबंधित संस्थांना मोहिमेसाठी स्पष्ट उद्दिष्टे निश्चित करण्याचे निर्देश दिले आहेत. ही उद्दिष्टे 2 ऑक्टोबर ते 31 ऑक्टोबर 2026 या अंमलबजावणीच्या टप्प्यात हाती घेतली जातील आणि साध्य केली जातील.

अणुऊर्जा विभाग आपल्या सर्व संबंधित संस्थांसह यामध्ये सक्रिय सहभाग, उद्दिष्ट साध्य कृती आणि नाविन्यपूर्ण पद्धतींचा अवलंब करून ही सहावी विशेष मोहीम यशस्वी करण्यासाठी कटिबद्ध आहे.

पीआयबी मुंबई | नितीन फुल्लुके /संपदा पाटगावकर/प्रिती मालंडकर

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai

 

 

 


(Release ID: 2311407) अभ्यागत कक्ष : 43
Read this releasein: English