शिक्षण मंत्रालय
azadi ka amrit mahotsav

कृत्रिम बुद्धिमत्ता मानवी संवेदनशीलतेला पर्याय ठरू शकत नाही : नीती आयोगाचे सदस्य डॉ.आर.बालसुब्रमण्यम यांचे प्रतिपादन


व्ही. एन. आय. टी. नागपुरच्या24 व्या दीक्षांत समारंभात नवोपक्रम, संशोधन आणि राष्ट्रनिर्माणावर भर

Posted On: 15 SEP 2026 7:20PM by PIB Mumbai

नागपूर, 15 सप्टेंबर 2026 

कृत्रिम बुद्धिमत्ता ही मानवी संवेदनशीलतेला पर्याय ठरू शकत नाही. त्यामुळे विद्यार्थ्यांनी पदवी ही एक सुरुवात समजून संवेदनशीलतेने समाजाची सेवा करण्यासाठी आपली शैक्षणिक गुणवत्ता आणि सामर्थ्य वापरावे, असं आवाहन नीती आयोगाचे सदस्य डॉ. आर बालसुब्रमण्यम यांनी आज केले. अभियंता दिनानिमित्त  तसेच भारतरत्न सर एम. विश्वेश्वरय्या यांच्या जयंतीनिमित्त  विश्वेश्वरय्या राष्ट्रीय तंत्रज्ञान संस्था - व्ही. एन. आय. टी. नागपूर येथे  24 व्या दीक्षांत समारंभाच्या प्रसंगी ते प्रमुख पाहुणे म्हणून बोलत होते. याप्रसंगी  व्ही. एन. आय. टी.   च्या बोर्ड ऑफ गव्हर्नर्सचे अध्यक्ष मदाभूषी मदन गोपाल, संचालक प्रा. प्रेम लाल पटेल उपस्थित होते. 

यावेळी शैक्षणिक वर्ष 2025-26 मध्ये संस्थेने शैक्षणिक गुणवत्ता, संशोधन, नवोपक्रम, उद्योजकता, उद्योग सहकार्य आणि विद्यार्थी विकास क्षेत्रात केलेल्या उल्लेखनीय कामगिरीचा आढावा घेण्यात आला.पदवीधर विद्यार्थ्यांना संबोधित करताना  नीती आयोगाचे सदस्य . आर. बालासुब्रमण्यमयांनी तांत्रिक ज्ञानासोबत विवेक, प्रामाणिकपणा, जबाबदारी आणि वास्तविक समस्या सोडविण्याची बांधिलकी जोपासण्याचे आवाहन केले. पदवी ही शैक्षणिक यशाचे प्रतीक असले, तरी अनुभव, सातत्यपूर्ण शिक्षण आणि सहकार्यामुळे खरी क्षमता विकसित होते, असे त्यांनी सांगितले.संस्थेच्या ‘योगः कर्मसु कौशलम्’ या ब्रीदवाक्याचा उल्लेख करताना डॉ. बालासुब्रमण्यम यांनी विद्यार्थ्यांनी कौशल्य आणि समर्पणाने कार्य करण्याबरोबरच केवळ समस्या ओळखणारे नव्हे, तर त्या सोडविणारे बनावे, असे आवाहन केले. आपल्या शिक्षणाचा उपयोग व्यवस्था सुधारण्यासाठी, अर्थपूर्ण संशोधनासाठी आणि समाजाच्या विकासासाठी करण्याचे आवाहनही त्यांनी केले.

व्ही. एन. आय. टी. च्या बोर्ड ऑफ गव्हर्नर्सचे अध्यक्ष मदाभूषी मदन गोपाल यांनी पदवीधर विद्यार्थ्यांनी तंत्रज्ञानाचे निर्माते आणि भारताच्या विकासातील सक्रिय भागीदार बनावे, असे सांगितले. आधुनिक तांत्रिक क्षमतेसोबत नैतिकता, उत्तरदायित्व, शाश्वतता आणि मानवी संवेदनशीलता आवश्यक असल्याचे त्यांनी नमूद केले. विद्यार्थ्यांनी भारताच्या सांस्कृतिक आणि बौद्धिक वारशाशी जोडलेले राहण्याचे आवाहनही त्यांनी केले.

संस्थेचा अहवाल सादर करताना संचालक प्रा. प्रेम लाल पटेल यांनी शैक्षणिक वर्ष 2025-26 मधील प्रमुख कामगिरीची माहिती दिली. VNIT ने 5 नवीन पदवी आणि 3 नवीन पदव्युत्तर अभ्यासक्रम सुरू केले असून त्यात AI आणि Data Science, Mathematics and Computing, VLSI Design and Technology, Engineering Physics आणि Bioprocess Technologyयांसारख्या उदयोन्मुख क्षेत्रांचा समावेश आहे.संशोधन क्षेत्रातही VNIT ने महत्त्वपूर्ण प्रगती केली आहे. संस्थेच्या प्राध्यापकांना 34 पेटंट प्राप्त झाले असून सुमारे 60 कोटी रुपयांचे 94 संशोधन व विकासप्रकल्प सुरू आहेत. या प्रकल्पांमध्ये इलेक्ट्रिक मोबिलिटी, वायरलेस चार्जिंग, 6G, कृत्रिम बुद्धिमत्ता, अक्षय ऊर्जा, क्वांटम तंत्रज्ञान आणि आरोग्य क्षेत्रांचा समावेश आहे.VNIT चे आठ प्राध्यापक Stanford University–Elsevier च्या World’s Top 2% Scientists List 2025 मध्ये समाविष्ट झाले आहेत.शैक्षणिक संस्था, उद्योग आणि सरकारी संस्थांसोबत संस्थेने 22 सामंजस्य करार केले आहेत. Hyundai Motor Group सोबत Hyundai Centre of Excellence स्थापन करणे ही यातील महत्त्वपूर्ण उपलब्धी ठरली आहे. Battery Technology and Electrification क्षेत्रासाठी Hyundai National Academic-Industrial Research Networkअंतर्गत निवड होणारे VNIT हे भारतातील एकमेव NIT ठरले आहे.2026 च्या प्लेसमेंट सत्रात VNIT ने उल्लेखनीय कामगिरी केली. एकूण 170 संस्थांनी 843 नोकरीच्या ऑफर्स नदिल्या. सर्वाधिक वार्षिक पॅकेज 58.30 लाख रुपये तर सरासरी वार्षिक पॅकेज 10.45 लाख रुपये राहिले. सर्वाधिक इंटर्नशिप स्टायपेंड दरमहा 2 लाख रुपये होते.Industry Mentorship Programme अंतर्गत 250 विद्यार्थ्यांना 50 उद्योग तज्ज्ञांचे मार्गदर्शन  मिळत आहे.

24 व्या दीक्षांत समारंभात शैक्षणिक उत्कृष्टतेबद्दल गुणवंत विद्यार्थ्यांचा गौरव करण्यात आला. प्रणव प्रशांत जारोंडे यांना 7 व्या आणि 8 व्या सत्रातील एकत्रित कामगिरीत 9.9700 सर्वोच्च Yearly GPA मिळवल्याबद्दल प्रतिष्ठित Dr. Mulkraj Madan Gold Medal प्रदान करण्यात आला. त्यांचा Overall CGPA 9.3471 आहे.

B.Tech. पदवीधरांमध्ये शाह मान विपुल यांनी सर्व B.Tech. शाखांमध्ये 9.7151 सर्वोच्च Overall CGPA मिळवला. तसेच B.Tech. Computer Science and Engineering शाखेतही त्यांनी सर्वोच्च CGPA प्राप्त केला.

 

 

 

 

 

 

पीआयबी नागपूर | धनंजय वानखेडे/प्रिती मालंडकर 

 

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai

 

 

 

 


(Release ID: 2310613) अभ्यागत कक्ष : 19
Read this releasein: English