दूरसंचार आणि माहिती तंत्रज्ञान मंत्रालय
सीसीएचे महाराष्ट्र आणि गोवा कार्यालय साजरा करत आहे 'हिंदी पखवाडा'; राष्ट्रीय एकता बळकट करण्यात हिंदीची भूमिका केली अधोरेखित
Posted On:
15 SEP 2026 4:43PM by PIB Mumbai
मुंबई, 15 सप्टेंबर 2026
संचार लेखा नियंत्रक कार्यालय (सीसीए) च्या महाराष्ट्र आणि गोवा कार्यालय 'हिंदी पखवाडा 'साजरा करत आहे. या उपक्रमाद्वारे भारताची अधिकृत भाषा म्हणून हिंदीचे महत्त्व आणि देशाची एकता व अखंडता बळकट करण्यात तिची भूमिका अधोरेखित करण्यात आली .
या प्रसंगी, संचार लेखा नियंत्रक डॉ. सतीश चंद्र झा यांनी अधोरेखित केले की, हिंदी हा एक महत्त्वपूर्ण दुवा आहे जो भारताच्या मिश्र संस्कृतीला जोडतो आणि राष्ट्राची एकता व अखंडता अधिक बळकट करतो. अधिकृत भाषा म्हणून हिंदीमध्ये तत्सम, तद्भव, देशी आणि परदेशी शब्द आत्मसात करण्याची अद्वितीय क्षमता आहे असे त्यांनी नमूद केले. हिंदीचे स्थान बळकट करण्यासाठी आणि तिचा वापर अधिक व्यापक करण्यासाठी सातत्याने प्रयत्न केले जात आहेत यावरही डॉ. झा यांनी भर दिला. भारताच्या स्वातंत्र्यलढ्यात हिंदीने बजावलेल्या महत्त्वपूर्ण भूमिकेची आठवण करून देत ते म्हणाले की, या भाषेने संवादाचे एक महत्त्वाचे माध्यम म्हणून काम केले आणि स्वातंत्र्याच्या लढ्यात लोकांना एकत्र आणण्यास मदत केली.
हिंदी पंधरवड्या'च्या निमित्ताने, त्यांनी महाराष्ट्राच्या 'गणेशोत्सव' या अत्यंत लोकप्रिय सांस्कृतिक उत्सवाच्या शुभप्रसंगी सर्व अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना शुभेच्छा दिल्या. भारताच्या स्वातंत्र्यलढ्यातील अग्रगण्य नेते लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांच्या योगदानाचे स्मरण करत, त्यांनी स्वातंत्र्य चळवळीतील टिळकांची महत्त्वपूर्ण भूमिका आणि गणेशोत्सवाला महाराष्ट्राचा एक महत्त्वाचा सांस्कृतिक उत्सव म्हणून विकसित करण्यातील त्यांचे योगदान अधोरेखित केले.
लेखा अधिकारी सुमित अवस्थी यांच्या आभार प्रदर्शनाने या कार्यक्रमाची सांगता झाली.'राजभाषा धोरणा'चा प्रसार आणि प्रभावी अंमलबजावणी यांबाबत मार्गदर्शनपर व प्रोत्साहनपर भाषण केल्याबद्दल त्यांनी 'संचार लेखा नियंत्रक' यांचे आभार मानले. तसेच, उद्घाटन समारंभ यशस्वी करण्यासाठी सक्रिय सहभाग आणि योगदानाबद्दल त्यांनी सर्व अधिकारी व कर्मचाऱ्यांचेही आभार मानले.
पीआयबी मुंबई | राधिका अघोर/सुषमा काणे/प्रिती मालंडकर
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
(Release ID: 2310485)
अभ्यागत कक्ष : 14