युवा व्यवहार आणि क्रीडा मंत्रालय
azadi ka amrit mahotsav

माय भारत - गोवाच्या वतीने आज गोवा विद्यापीठात विकसित भारत युवा नेतृत्व संवाद 2027 या उपक्रमासंबंधी जागरूकता आणि सहभाग वाढवण्याच्या विषयावरील कार्यक्रमाचे केले आयोजन

Posted On: 11 SEP 2026 8:04PM by PIB Mumbai

 

केंद्रीय युवा व्यवहार आणि क्रीडा मंत्रालयाच्या अखत्यारीतल, माय भारत - गोवाच्या वतीने आज गोवा विद्यापीठात विकसित भारत युवा नेतृत्व संवाद (VBYLD - Viksit Bharat Young Leaders Dialogue) 2027 या उपक्रमासंबंधी जागरूकता आणि सहभाग वाढवण्याच्या विषयावरील कार्यक्रमाचे आयोजन केले गेले.

या कार्यक्रमाला गोव्याचे राज्यपाल पुसापती अशोक गजपती राजू मुख्य अतिथी म्हणून उपस्थित होते. त्यांच्यासोबतच गोवा विद्यापीठाचे कुलगुरू प्रा. राजेंद्र एस. गड, गोवा विद्यापीठाचे कुलसचिव प्रा. एस. एन. धुरी आणि ‘माय भारत’ गोव्याचे संचालक जी. एस. राघव हे देखील या कार्यक्रमाला उपस्थित होते.

यावेळी राज्यपाल पुसापती अशोक गजपती राजू यांनी उपस्थितांना संबोधित केले. देशाच्या भविष्याला आकार देण्यासाठी गोव्यातील युवा वर्ग हा एक महत्त्वाचा कारक घटक असल्याचे ते म्हणाले. विद्यार्थ्यांनी विकसित भारत युवा नेतृत्व संवादात 2027 सक्रियपणे सहभागी व्हावे असे आवाहनही त्यांनी केले.  2047 पर्यंत विकसित भारताचा संकल्प साकार करण्याच्या दृष्टीने युवा प्रतेभीतील नवोन्मेष, सर्जनशीलता आणि नेतृत्वगुणां वाव देण्याकरता या उपक्रमाच्या माध्यमातून एक व्यासपीठ उपलब्ध झाले असल्याचे त्यांनी सांगितले. या उपक्रमात सहभागी होण्याकरता संपूर्ण गोव्यातील शैक्षणिक संस्थांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करावे तसेच प्रोत्साहन द्यावे, असे आवाहनही त्यांनी केले. गोव्यातील स्थानिक प्रतिभेत राष्ट्रीय स्तरावर उत्कृष्ट कामगिरी करण्याची क्षमता असल्याबद्दल आपल्याला दृढ विश्वास वाटत असल्याची भावनाही त्यांनी व्यक्त केला.

‘माय भारत’ गोव्याचे संचालक जी. एस. राघव यांनीही उपस्थितांशी संवाद साधला.  राज्यातील महाविद्यालये आणि युवा वर्गाने या उपक्रमासाठी मोठ्या संख्येने नोंदणी करावी असे आवाहन त्यांनी केले. विकसित भारत युवा नेतृत्व संवाद  2027 हा उपक्राच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना अमूल्य मार्गदर्शन, राष्ट्रीय पातळीवरील प्रसिद्धी तसेच नेतृत्वाच्या संधी उपलब्ध होतात. यामुळे युवा वर्गात निष्क्रिय लाभार्थी बनून राहण्याऐवजी राष्ट्रीय विकासाचे सक्रिय कारक घटक म्हणून स्वतःत परिवर्तन घडवून आणण्यात मोठी मदत होते असे त्यांनी सांगितले.

या कार्यक्रमादरम्यान उपस्थितांना विकसित भारत युवा नेतृत्व संवाद 2027 अंतर्गतच्या उपक्रमांच्या माध्यमातून विकसित भारत चॅलेंज, कल्चरल ट्रॅक, डिझाइन फॉर भारत, हॅक फॉर सोशल कॉज, युथ आंत्रप्रेन्युअर्स चॅलेंज, युथ पार्लमेंट असे 6 विविधांगी पर्याय उपलब्ध करून दिले गेले असल्याची माहिती दिली गेली.

या कार्यक्रमादरम्यान उपस्थितांना विकसित भारत आव्हानात्मक उपक्रमांच्या बहुस्तरीय आखणीविषयी देखील माहिती दिली गेली. हा उपक्रमाअंतर्गत स्पर्धक आधी जिल्हा आणि नंतर राज्य स्तरावरून पुढे जात राहतात.  सर्वोत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या सहभागींना गोव्याचे प्रतिनिधित्व करण्याची तसेच नवी दिल्ली इथल्या  राष्ट्रीय विकसित भारत युवा नेतृत्व संवाद 2027 शिखर परिषदेत आपले सादरीकरण करण्याची संधी मिळणार असल्याची माहितीही उपस्थितांना दिली गेली.

***

सुवर्णा बेडेकर/तुषार पवार/परशुराम कोर

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com


(Release ID: 2309322) अभ्यागत कक्ष : 16
Read this releasein: English