रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्रालय
azadi ka amrit mahotsav

केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते गोव्यातील पर्वरी येथे 641 कोटी रुपये खर्चाच्या सहा-पदरी उन्नत मार्गाचे उद्घाटन


5.15 किमी लांबीचा हा मार्ग NH-66 वरील वाहतुकीची कोंडी कमी करेल, प्रवासातील विलंब टाळेल आणि संपूर्ण गोव्यातील वाहतूक व्यवस्था मजबूत करेल: केंद्रीय मंत्री नितीन गडकरी

Posted On: 09 SEP 2026 10:17PM by PIB Mumbai

केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी बुधवारी राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 66 वरील पर्वरी येथे 641 कोटी रुपये खर्चाच्या 5.15 किमी लांबीच्या सहा-पदरी उन्नत मार्गाचे उद्घाटन केले. गोव्यातील अत्यंत वर्दळीच्या शहरी भागातील वाहतूक कोंडी कमी करणे आणि पर्वरीमधून वाहनांची अखंडित ये-जा सुलभ करणे हा या पायाभूत सुविधा प्रकल्पाचा उद्देश आहे.

मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत, केंद्रीय राज्यमंत्री श्रीपाद नाईक, राज्य सरकारचे मंत्री, खासदार श्री सदानंद शेट तानावडे, आमदार आणि वरिष्ठ अधिकारी यांच्या उपस्थितीत या मार्गाचे उद्घाटन झाले. हा उन्नत मार्ग मुंबई-गोवा-कन्याकुमारी महामार्गाचा एक महत्त्वाचा  नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली भारत सरकारसाठी पायाभूत सुविधांचा विकास याला प्रमुख प्राधान्य देण्यात आले आहे.  अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष जॉन एफ. केनेडी यांचे "अमेरिका श्रीमंत आहे कारण तिथले रस्ते चांगले आहेत" हे वाक्य आठवून ते म्हणाले की, राष्ट्रीय समृद्धीला चालना देण्यात पायाभूत सुविधांच्या विकासाची भूमिका अत्यंत महत्त्वाची आहे.

आज ज्या प्रकल्पाचे उद्घाटन झालेला प्रकल्प हा, जागतिक दर्जाचे अभियांत्रिकी आणि आधुनिक तंत्रज्ञानाचे उत्कृष्ट उदाहरण आहे. यामुळे मनोहर आंतरराष्ट्रीय विमानतळ आणि महाराष्ट्र यांच्याशी अखंडित रस्ते संपर्क सुनिश्चित होईल, असे सांगत गडकरी यांनी राज्य सरकारला महामार्गालगत पर्यटकांसाठी उच्च दर्जाच्या सुविधा उपलब्ध करून देण्याचे आवाहन केले. तसेच, महामार्गालगत व्यापक हरित सुशोभीकरण करण्याला प्राधान्य देऊन संपूर्ण मार्ग खऱ्या अर्थाने हरित महामार्ग बनवावा, अशी सूचनाही त्यांनी राज्य प्रशासनाला केली.

गोवा आणि महाराष्ट्र यांच्यातील अतूट नातेसंबंधांबद्दल बोलताना ते म्हणाले की, कोकण पट्ट्यातून मुंबईला गोव्याशी जोडणारा हा महामार्ग प्रचंड भावनिक आणि आर्थिक महत्त्व असलेला मार्ग आहे. "मुंबई-गोवा महामार्गाच्या  कामात झालेला विलंब ही चिंतेची बाब राहिली आहे. मात्र, आता या महामार्गाचे 93 ते 94 टक्के काम पूर्ण झाले आहे. या ऑक्टोबरमध्ये मी मुंबई विमानतळावर उतरून कारने गोव्यापर्यंतचा संपूर्ण प्रवास करेन आणि पूर्ण झालेल्या या मार्गाच्या प्रत्येक किलोमीटरची स्वतः पाहणी करेन," असेही मंत्री म्हणाले.

उद्घाटन समारंभादरम्यान, गोव्यातील सार्वजनिक बांधकाम विभाग आणि आयआयएम-नागपूर यांच्यात ट्रॅफिक सिम्युलेशनसाठीच्या सामंजस्य करारावर स्वाक्षरी करण्यात आली. या उपक्रमाचा उद्देश राज्यातील वाहतूक व्यवस्थापनासाठी वैज्ञानिक आणि तंत्रज्ञानावर आधारित दृष्टिकोन बळकट करणे हा आहे.

या मार्गाचे उद्घाटन करण्यापूर्वी, मंत्र्यांनी मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत आणि वरिष्ठ अधिकाऱ्यांसोबत जुवारी पुलाच्या कामाच्या ठिकाणाची पाहणी केली.

13.20 किमी लांबीचा जुवारी पूल हा देशातील दुसरा सर्वात लांब केबल-स्टेड  पूल आहे. या पुलावर 125 मीटर उंच दोन पर्यटक निरीक्षण मनोरे, एक फिरते रेस्टॉरंट आणि कला दालन उभारण्याचा प्रस्ताव आहे. गडकरी यांनी संबंधित अधिकाऱ्यांना हे प्रकल्प लवकरात लवकर पूर्ण करण्याचे आवाहनही केले.

यावेळी गोव्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री दिगंबर कामत, गोवा विधानसभेचे अध्यक्ष डॉ. गणेश गावकर, मंत्री रमेश तवडकर, गोव्याचे परिवहन मंत्री मौविन गोदिन्हो, मंत्री सुदिन ढवळीकर, इतर मंत्री, लोकप्रतिनिधी तसेच गोवा सार्वजनिक बांधकाम विभाग आणि रस्ते वाहतूक व महामार्ग मंत्रालयाचे अधिकारी उपस्थित होते.

हा उड्डाणपुल सुरु झाल्यामुळे वाहतूक अधिक सुरळीत होईल आणि तीन प्रमुख वाहतूक जंक्शनवरील प्रवासाचा वेळ वाचेल. या प्रकल्पामुळे प्रवासाच्या वेळेत अंदाजे 30 ते 40 मिनिटांची बचत होण्याची अपेक्षा आहे, ज्यामुळे नागरिक आणि प्रवाशांना अधिक सुरक्षित, सुरळीत आणि अखंडित प्रवासाची सुविधा मिळेल.

हा नवीन मार्ग पणजी, पर्वरी, म्हापसा आणि उत्तर गोवा यांच्यातील संपर्क व्यवस्था बळकट करेल, तसेच मोपा आंतरराष्ट्रीय विमानतळ आणि महाराष्ट्रातील लगतच्या भागांशी संपर्क सुधारण्यास मदत करेल. सुधारित रस्ते संपर्क व्यवस्थेमुळे या क्षेत्रातील पर्यटन, व्यापार आणि आर्थिक घडामोडींनाही चालना मिळण्याची अपेक्षा आहे.

हा उन्नत मार्ग, प्रगत 'प्रीकास्ट सेगमेंटल बॉक्स-गर्डर' तंत्रज्ञानाचा वापर करून बांधण्यात आला असून यात 87 स्पॅन्स आहेत. प्रत्येकी 120 टनांपर्यंत वजन असलेल्या तब्बल 1,431 प्रीकास्ट भागांची उभारणी, प्रत्येकी 118 मीटर लांबी आणि 650 टन वजन असलेल्या दोन विशेष लॉन्चिंग गर्डर्सचा वापर करून करण्यात आली.

***

NehaKulkarni / Ashutosh Save/ Tushar Pawar/RajeshShirbhate / DineshYadav

 

Follow us on Social Media:@PIBPanaji   Image result for facebook icon /PIBPanaji    /pib_goa   pibgoa[at]gmail[dot]com  /PIBGoa


(Release ID: 2308596) अभ्यागत कक्ष : 17
Read this releasein: English