Posted On:
08 SEP 2026 3:47PM by PIB Mumbai
नागपूर /बुलडाणा , 8 सप्टेंबर 2026
केंद्रीय माहिती आणि प्रसारण मंत्रालयाच्या नागपूर येथील पत्र सूचना कार्यालयातर्फे बुलढाणा जिल्ह्यातील पत्रकारांसाठी ‘वार्तालाप’ – या एक दिवसीय माध्यम परिषदचे आयोजन 9 सप्टेंबर 2026 बुधवार रोजी बुलडाणा रेसिडेन्सी, गणेश नगर, मलकापूर रोड, बुलडाणा येथे सकाळी 10 ते दुपारी 3 वाजे दरम्यान करण्यात आले आहे. ‘कौशल्य विकास आणि भविष्यातील संधी : जनजागृतीमध्ये प्रादेशिक माध्यमांची भूमिका’ हा या माध्यम कार्यशाळेचा मुख्य विषय आहे.
_20260908155252_af548c.jpeg)
कार्यशाळेच्या उद्घाटन सत्राला बुलडाणा जिल्ह्यातील प्रमुख प्रशासकीय अधिकारी उपस्थित राहणार आहेत.
कौशल्य विकास, पर्यटन, शाश्वत विकास तसेच केंद्र सरकारच्या विविध योजना आणि उपक्रमांमधील उदयोन्मुख संधींबाबत माध्यम प्रतिनिधींमध्ये जागरूकता निर्माण करणे हा या कार्यशाळेचा उद्देश आहे. नागरिकांमध्ये जागरूकता, आकांक्षा आणि सकारात्मक दृष्टीकोन निर्माण करण्यासोबतच अचूक आणि वस्तुनिष्ठ माहितीचा प्रसार करण्यात प्रादेशिक माध्यमांची महत्त्वपूर्ण भूमिका आहे, यावर सदर कार्यशाळेत भर देण्यात येणार आहे.
कार्यशाळेत बुलढाणा जिल्ह्याच्या विकासाशी तसेच भविष्यातील क्षमतेशी संबंधित विविध क्षेत्रे आणि विषयांवर तांत्रिक सत्रे आयोजित करण्यात येणार आहेत.
‘सरकारी धोरणे, कार्यक्रम, उपक्रम आणि उपलब्धी, पत्रकार कल्याण योजना तसेच पीआयबी फॅक्ट चेक याबाबत मुद्रित, इलेक्ट्रॉनिक आणि डिजिटल माध्यमांना माहिती पोहोचविण्यात पीआयबीची भूमिका’ यावरही विषयावर विशेष सत्राचे आयोजन करण्यात आले आहे.
या कार्यक्रमात केंद्र शासनाच्या विविध योजनांच्या लाभार्थी आणि माध्यम प्रतिनिधींमध्ये संवाद सत्र देखील होणार आहे. या माध्यमातून पत्रकारांना केंद्र सरकारच्या योजनांचा तळागाळातील लाभार्थ्यांवर झालेला परिणाम प्रत्यक्ष जाणून घेण्याची संधी मिळणार आहे.
मुद्रित, इलेक्ट्रॉनिक आणि डिजिटल माध्यमांमध्ये कार्यरत पत्रकारांसाठी आयोजित करण्यात आलेली ही ‘वार्तालाप’ माध्यम कार्यशाळा संवाद, ज्ञानाची देवाणघेवाण आणि क्षमता वृद्धिंगत करण्यासाठी महत्त्वपूर्ण मंच ठरणार आहे. विषयतज्ज्ञ, शासकीय अधिकारी आणि विविध योजनांच्या लाभार्थ्यांशी संवाद साधण्याची संधी माध्यम प्रतिनिधींना या कार्यशाळेत मिळणार आहे. त्यामुळे जनहिताच्या विषयांवर अधिक माहितीपूर्ण, अचूक आणि जबाबदार वार्तांकनाला चालना मिळण्यास मदत होणार आहे.
पीआयबी नागपूर |सौरभ खेकडे/धनंजय वानखेडे/प्रिती मालंडकर
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai