भारतीय निवडणूक आयोग
मतदान केंद्रस्तरीय अधिकारी (बीएलओ) हे निवडणूक आयोग आणि नागरिकांमधील पहिला संपर्क दुवा: मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार
इलेक्टोरल साक्षरता क्लब आणि ‘ईसीआयनेट’ वर मडगाव येथे दोन दिवसीय परिषदेला प्रारंभ
Posted On:
02 SEP 2026 9:06PM by PIB Mumbai
गोवा, 2 सप्टेंबर 2026
मतदान केंद्रस्तरीय अधिकारी (बूथ लेव्हल ऑफिसर्स-बीएलओ ज) हे केंद्रीय निवडणूक आयोग (ईसीआय) आणि नागरिकांमधील पहिला संपर्क दुवा आहेत आणि ते मतदार याद्यांची अचूकता राखण्यात अत्यंत महत्त्वाची भूमिका बजावतात, असे प्रतिपादन मुख्य निवडणूक आयुक्त (सीईसी) ज्ञानेश कुमार यांनी केले आहे. बुधवारी (02 सप्टेंबर 2026) दक्षिण गोव्यात, मडगाव येथील रवींद्र भवन येथे बीएलओंशी साधलेल्या संवादादरम्यान ते बोलत होते.
मुख्य निवडणूक आयुक्तांसोबतच्या या संवादात गोव्यातील राज्यभरातून 1,000 हून अधिक बीएलओ सहभागी झाले होते. हा संवाद मडगाव येथे आयोजित 'इलेक्टोरल लिटरसी क्लब' या निवडणूक साक्षरता मंडळ आणि ‘ईसीआयनेट’ या निवडणूक आयोगाच्या एकात्मिक डिजिटल मंचावरील दोन दिवसीय परिषदेचा एक भाग म्हणून आयोजित करण्यात आला होता.

बीएलओंना "जगातील सर्वात मोठ्या लोकशाहीचा पायाभूत स्तंभ" असे संबोधन देवून, ज्ञानेश कुमार म्हणाले की, देशातील मतदार याद्या तयार करणे आणि निवडणुकांचे आयोजन हे पूर्णपणे संविधान, कायदा आणि केंद्रीय निवडणूक आयोगाद्वारे जारी केलेल्या सूचनांनुसारच केले जाते.
स्थानिक पातळीवर बीएलओं नी बजावायच्या महत्त्वपूर्ण भूमिकेवर भर देताना ते म्हणाले की, बीएलओ हे निवडणूक आयोग आणि नागरिकांमधील संपर्काचा पहिला दुवा आहेत. मतदार याद्या तयार करण्याच्या कामात गोव्यातील बीएलओंनी बजावलेल्या महत्त्वपूर्ण भूमिकेचेही त्यांनी कौतुक केले.
मतदार याद्यांमध्ये पारदर्शकता राखण्यात अधिकाऱ्यांनी बजावलेल्या भूमिकेचे कौतुक करताना, मुख्य निवडणूक आयुक्तांनी सांगितले की, मान्यताप्राप्त राजकीय पक्षांनी नियुक्त केलेले मतदान केंद्रस्तरीय प्रतिनिधी (बूथ लेवल एजंट्स-बी एल ए) तसेच उमेदवारांचे मतदान आणि मतमोजणी प्रतिनिधी, मतदार याद्या आणि संपूर्ण निवडणूक प्रक्रियेची एकाच वेळी तपासणी करतात.
या संवाद कार्यक्रमात बीएलओंची भूमिका कोकणी भाषेत आणि ‘बी एल एं’ ची भूमिका स्पष्ट करणारे इंग्रजीतील लघुपटही प्रदर्शित करण्यात आले. गोव्याच्या समृद्ध परंपरा आणि वारशाचे दर्शन घडवणारे सांस्कृतिक कार्यक्रमही यावेळी सादर करण्यात आले.
बीएलओंनी मुख्य निवडणूक आयुक्तांसोबतच्या प्रश्नोत्तर सत्रातही भाग घेतला. त्यामुळे त्यांना आपल्या समस्या मांडण्याची आणि त्यांच्या शंकांचे थेट निरसन करण्याची संधी मिळाली.

या कार्यक्रमाला गोव्याचे मुख्य निवडणूक अधिकारी संजय गोयल; महासंचालक (माध्यम), निवडणूक आयुक्त आशिष गोयल; महासंचालक (आय टी), निवडणूक आयुक्त सीमा खन्ना; उत्तर गोव्याचे जिल्हा निवडणूक अधिकारी अंकित यादव; दक्षिण गोव्याच्या जिल्हा निवडणूक अधिकारी एग्ना क्लीटस; आणि कुशावती जिल्हयाचे जिल्हा निवडणूक अधिकारी, गुरुदास देसाई यांच्यासह राज्यातील इतर वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.
प्रभावी आणि मजबूत निवडणूक प्रक्रिया सुनिश्चित करण्यात बीएलओंच्या महत्त्वपूर्ण भूमिकेची दखल घेत, निवडणूक आयोग आणि स्थानिक पातळीवरील निवडणूक यंत्रणा यांच्यातील समन्वय अधिक मजबूत करणे हा या संवादाचा मुख्य उद्देश होता.
_20260902200539_7df7ea.jpeg)
* * *
पीआयबी मुंबई | सुवर्णा बेडेकर/आशुतोष सावे/दर्शना राणे
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBPanaji
/PIBPanaji
/pib_goa
pibgoa[at]gmail[dot]com
/PIBGoa
(Release ID: 2306138)
अभ्यागत कक्ष : 18