दूरसंचार आणि माहिती तंत्रज्ञान मंत्रालय
azadi ka amrit mahotsav

गोवा टपाल विभागासाठी ‘ग्रामीण डाक सेवक’च्या एकूण 130 पदांची अधिसूचना जारी


उमेदवारांनी 21 सप्टेंबरपर्यंत ऑनलाइन अर्ज सादर करावेत

Posted On: 02 SEP 2026 3:02PM by PIB Mumbai

गोवा, 2 सप्‍टेंबर 2026

 

टपाल विभागाने 'ग्रामीण डाक सेवक ऑनलाइन नियुक्ती प्रक्रिया - अनुसूची II, जुलै 2026' च्या संदर्भात 20 जुलै 2026 रोजी एक ऑनलाइन अधिसूचना जारी केली आहे. याद्वारे गोवा टपाल विभागातील 'ग्रामीण डाक सेवक' या पदासाठी उमेदवारांकडून ऑनलाइन अर्ज मागवण्यात आले आहेत.

गोवा विभागासाठी 'ग्रामीण डाक सेवक' या पदाच्या एकूण 130 जागांसाठी अधिसूचना जारी करण्यात आली आहे. यामध्ये शाखा पोस्टमास्टर, सहाय्यक शाखा पोस्टमास्टर आणि डाक सेवक या पदांचा समावेश आहे ऑनलाइन अर्ज सादर करण्याची अंतिम तारीख 21.09.2026 [17.00 वाजेपर्यंत] आहे.

वरिष्ठ डाक अधीक्षक यांनी दिलेल्या माहितीनुसार, गोव्यातील टपाल कार्यालयांमध्ये जीडीएस या  पदासाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांनी इयत्ता 10 वी च्या स्तरावर कोकणी किंवा मराठी भाषेचा अभ्यास केलेला असणे आवश्यक आहे. तथापि, ज्या उमेदवारांनी केवळ मराठी भाषेचा अभ्यास केला आहे, त्यांना कोकणी भाषेचेही ज्ञान असणे गरजेचे आहे.

ज्या उमेदवाराने 10वी पर्यंत कोकणी भाषेचा अभ्यास केला नाही, अशा उमेदवाराचे प्राविण्य यासाठी गोवा कोंकणी अकादमीने जारी केलेल्या प्रमाणपत्राच्या आधारे किंवा गोवा राज्याने नामनिर्देशित केलेल्या इतर कोणत्याही सरकारी-अधिकृत प्राधिकरणाच्या आधारे तपासले जाईल.

उमेदवारांनी पुढील लिंकवर ऑनलाइन अर्ज दाखल करावा:  https://indiapost.gov.in/gdsonlineengagement

 

* * *

पीआयबी मुंबई | नेहा कुलकर्णी/राजश्री आगाशे/दर्शना राणे

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai


(Release ID: 2305901) अभ्यागत कक्ष : 34
Read this releasein: English