Posted On:
31 AUG 2026 7:39PM by PIB Mumbai
पुणे, 31 ऑगस्ट 2026
लष्करप्रमुख जनरल धीरज सेठ यांनी पुणे येथील दक्षिण कमांडच्या मुख्यालयाला भेट दिली आणि कमांडच्या परिचालन सज्जतेचा आणि क्षमता वृद्धीसाठी सुरू असलेल्या उपक्रमांचा आढावा घेतला.
दक्षिण कमांडचे 'जनरल ऑफिसर कमांडिंग-इन-चीफ' लेफ्टनंट जनरल राजेश पुष्कर यांनी लष्करप्रमुखांना सध्याची कार्यान्वयीन परिस्थिती, कमांडची कार्यान्वयीन सज्जता, प्रशिक्षण उपक्रम आणि लढाऊ क्षमता तसेच मोहिमेसाठीची सज्जता आणखी वाढवण्यासाठी राबवत असलेल्या उपाययोजनांबाबत माहिती दिली.
कमांड मधील कमांडर्स् आणि येथील सैनिकांशी संवाद साधताना, जनरल धीरज सेठ यांनी युद्धाच्या बदलत्या स्वरूपाच्या अनुषंगाने युद्ध क्षमता आणि तंत्रज्ञानाचा अंगीकार, युद्धकौशल्ये तसेच 'तंत्र, रणनीती आणि कार्यपद्धती' (TTPs) मध्ये सातत्याने सुधारणा करण्यावर भर दिला. तसेच, वेगाने हालचाली करू शकणारे, तांत्रिकदृष्ट्या सक्षम आणि भविष्यासाठी सुसज्ज असे सैन्य उभारण्यासाठी वास्तववादी प्रशिक्षण, अधिक प्रभावी 'परस्पर समन्वय' आणि स्वदेशी क्षमता विकास यांच्या महत्त्वावरही त्यांनी भर दिला.
लष्कराच्या सर्व श्रेणीतील कर्मचाऱ्यांच्या व्यावसायिकतेची आणि समर्पित वृत्तीची, निष्ठेची प्रशंसा करत, लष्करप्रमुखांनी त्यांना आपल्या ध्येयावर लक्ष केंद्रित करण्याचे, परिचालन सज्जतेचे सर्वोच्च निकष राखण्याचे आणि कमांडची कार्यात्मक आघाडी अधिक मजबूत करण्याचे आवाहन केले.
या भेटीदरम्यान, जनरल धीरज सेठ यांनी, सैनिक कल्याण, युवा सक्षमीकरण, पर्यावरण संवर्धन आणि समाजसेवा या क्षेत्रांत माजी सैनिकांनी दिलेल्या योगदानाबद्दल 'योद्धा सेवा सन्मान' देऊन त्यांना सन्मानित केले. भारतीय लष्कर आणि माजी सैनिक यांच्यातील संबंध आयुष्यभर कायम राहतील हे अधोरेखित करून त्यांनी राष्ट्र उभारणीसाठी त्यांच्या सेवेची आणि योगदानाची दखल घेतली.




* * *
पीआयबी मुंबई | सुषमा काणे/सविता म्हस्कर/दर्शना राणे
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai