ऊर्जा मंत्रालय
azadi ka amrit mahotsav

एनटीपीसीच्या पश्चिम क्षेत्र-I मुख्यालयाने महाबळेश्वर इथे प्रादेशिक संयुक्त उत्पादकता परिषदेची बैठक केली आयोजित

Posted On: 28 AUG 2026 4:37PM by PIB Mumbai

 

राष्ट्रीय औष्णिक ऊर्जा महामंडळ (एनटीपीसी) पश्चिम क्षेत्र-I मुख्यालय, मुंबईने, 25 ऑगस्ट 2026 रोजी महाबळेश्वर इथे प्रादेशिक संयुक्त उत्पादकता परिषद (आरजेपीसी) बैठक 2026 आयोजित केली होती. पश्चिम क्षेत्र-I मधील संघटना आणि संघटनांच्या व्यवस्थापन समितीचे सदस्य आणि प्रतिनिधी बैठकीला उपस्थित होते. या बैठकीला प्रादेशिक कार्यकारी संचालक (पश्चिम-I) ई. सत्य फणी कुमार यांच्यासह मौदा, सोलापूर, अंता, झानोर-गंधार आणि कावस येथील एनटीपीसी डब्ल्यूआर-I प्रकल्पांचे व्यवसाय युनिट (केंद्र) प्रमुख उपस्थित होते. मौदा, सोलापूर, अंता, झानोर-गंधार, कावस आणि आरजीपीपीएल येथील डब्ल्यूआर-I प्रकल्प/स्टेशन्सच्या एचआर प्रमुखांसह मनुष्यबळ विकास विभागाच्या प्रादेशिक प्रमुख (पश्चिम-I) वंदना चतुर्वेदी उपस्थित होत्या.

या बैठकीत एनटीपीसी डब्ल्यूआर-I प्रकल्प / स्थानकांमधील विविध संघटना आणि संघटनांचे प्रतिनिधीही सहभागी झाले होते. कार्यकारी संचालक (डीआरसी) आणि विभागीय आढावा समितीचे सदस्य देखील यावेळी उपस्थित होते.

ऊर्जा क्षेत्राशी संबंधित समकालीन आणि महत्त्वपूर्ण संकल्पनांवर संघटना आणि संघटनांच्या प्रतिनिधींनी केलेले सादरीकरण, हे बैठकीचे प्रमुख वैशिष्ट्य होते. या बैठकीत पुढील गोष्टींवर भर देण्यात आला:

  • औष्णिक प्रकल्पांमध्ये लवचिकता: ग्रीडच्या बदलत्या मागणीला त्वरित प्रतिसाद. 
  • वर्तणुकीशी संबंधित हस्तक्षेपाद्वारे सुरक्षा संस्कृती मजबूत करणे
  • ऊर्जा प्रकल्पांची कार्यक्षमता वाढवण्यासाठी कृत्रिम बुद्धिमत्तेचा उपयोग. 
  • कोळसा-आधारित प्रकल्पांमध्ये शून्य विलंब शुल्क आणि गॅस-आधारित प्रकल्पांची भविष्यातील शाश्वतता

या चर्चेतून व्यवस्थापन आणि कर्मचारी प्रतिनिधी यांच्यात अर्थपूर्ण संवाद, विचारांची देवाणघेवाण आणि सहयोगात्मक चर्चांसाठी एक विधायक व्यासपीठ उपलब्ध झाले, यामध्ये उत्पादकता, उत्तम काम, सुरक्षा आणि शाश्वतता वाढवण्यावर विशेष भर देण्यात आला.

या प्रसंगी बोलताना ई. सत्य फणी कुमार म्हणाले, "व्यवस्थापन आणि कर्मचारी यांच्यातील परस्पर विश्वास दृढ करण्यासाठी आणि भागीदारीची संस्कृती जोपासण्यासाठी 'आरजेपीसी' हे एक महत्त्वाचे व्यासपीठ आहे. अशा मंचांवर मांडले जाणारे विचार आणि सूचना उत्पादकता, नवोन्मेष आणि संस्थात्मक उत्कृष्टता साधण्याच्या दृष्टीने अत्यंत मोलाचे आहेत.

वंदना चतुर्वेदी म्हणाल्या की, सुरक्षा, नवोन्मेष, तंत्रज्ञान आणि कर्मचाऱ्यांचा सहभाग याचे महत्त्व अधोरेखित करण्याबरोबराच, आरजेपीसी आपल्या लोकांवर आणि व्यवसायावर परिणाम करणाऱ्या मुद्द्यांवर एकत्रितपणे चर्चा करण्याची संधी उपलब्ध करून देते.

26 ऑगस्ट 2026 रोजी सहभागींसाठी अणुऊर्जेबाबत एका विशेष जनजागृती सत्राचे आयोजन करण्यात आले होते. हे सत्र कार्यकारी संचालक (अणुऊर्जा) निर्भय गुप्ता आणि कार्यकारी संचालक (अणुऊर्जा) ए. पी. सामल यांनी या सत्राचे संचालन केले. त्यांनी अणुऊर्जेच्या भविष्यातील संधींवर प्रकाश टाकला तसेच अणुऊर्जा प्रकल्प आणि भारताच्या विकसित होत असलेल्या ऊर्जा क्षेत्रात त्यांची भूमिका यांबाबत माहिती दिली. देशाच्या भविष्यातील ऊर्जा मिश्रणातील एक महत्वाचा घटक म्हणून अणुऊर्जेचे महत्त्व आणि तिची क्षमता याविषयी या सत्रातून मोलाची माहिती देण्यात आली.

ऊर्जा क्षेत्रातील बदलत्या परिप्रेक्ष्यात, एनटीपीसीच्या उत्कृष्टता आणि नेतृत्वाच्या निरंतर प्रवासात सामूहिक योगदान देण्याच्या, तसेच रचनात्मक औद्योगिक संबंध आणि कर्मचाऱ्यांचा सहभाग अधिक दृढ करण्याच्या सामायिक वचनबद्धतेसह या बैठकीची सांगता झाली.

***

राधिका अघोर/राजश्री आगाशे/परशुराम कोर

*** 

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai


(Release ID: 2304369) अभ्यागत कक्ष : 10
Read this releasein: English