संरक्षण मंत्रालय
सेखों इंडियन एअर फोर्स मॅरेथॉन 2026 : मुंबई' साठी नोंदणी सुरू
Posted On:
28 AUG 2026 2:56PM by PIB Mumbai
भारतीय हवाई दल 04 ऑक्टोबर 2026 रोजी 'सेखों इंडियन एअर फोर्स मॅरेथॉन 2026' (SIM-26) चे आयोजन करणार आहे. भारतीय हवाई दलातील एकमेव 'परमवीर चक्र' विजेते, फ्लाईंग ऑफिसर निर्मलजीत सिंग सेखों यांच्या सर्वोच्च बलिदानाचे स्मरण करण्यासाठी हा कार्यक्रम एकाच वेळी भारतातील सात शहरांमध्ये आयोजित केला जात आहे. या महान योद्ध्याचा अजरामर वारसा अधोरेखित करत, संरक्षण दलांची मूल्ये आणि संस्कृतीचा प्रसार करणे हा या कार्यक्रमाचा उद्देश आहे. ही मॅरेथॉन भारत सरकारने फिटनेसचे महत्त्व वाढवण्यासाठी सुरू केलेल्या 'फिट इंडिया मुव्हमेंट'शी देखील जोडलेली आहे. भारतीय हवाई दलाच्या वतीने, मुख्यालय मेंटेनन्स कमांड मुंबईत SIM-26 चे आयोजन करणार आहे.
ऑपरेशन सिंदूरने देशाचे सार्वभौमत्व जपण्यासाठी आणि संरक्षण करण्यासाठी संरक्षण दलांचे शौर्य, निपुण ता, निश्चय आणि त्याग यांचे देशाला दर्शन घडवले. राष्ट्रीय एकतेची ताकद आणि विपरित परिस्थितीला तोंड देण्यासाठी ठामपणे उभे राहण्याचा आपल्या नागरिकांचा दृढ संकल्प देखील त्यातून प्रदर्शित झाला. राष्ट्रीय संकल्पाच्या या अदम्य भावनेचे रुपांतर आपल्या तरुणांमध्ये तंदुरुस्ती, शिस्त, लवचिकता आणि निष्ठेच्या सकारात्मक चळवळीत करण्याचा या मॅरॅथॉनचा प्रयत्न आहे. हा कार्यक्रम एका उद्दात्त कारणासाठी जनतेचा सहभाग वाढवण्यासाठी आणि तरुणांना संरक्षण दलात सामील होण्यासाठी प्रेरित करण्यासाठी भारतीय हवाई दलाचा एक महत्त्वपूर्ण उपक्रम म्हणून संकल्पित केला आहे.
भारतीय हवाई दल सर्व स्तरांतील नागरिकांना एकत्र येण्यासाठी आणि या अनोख्या उत्सवाचा भाग होण्यासाठी आमंत्रित करत आहे. अधिक तपशीलांसाठी कृपया www.sekhoniafmarathon.in वर लॉगिन करा आणि नोंदणीसाठी खालील लिंकवर क्लिक करा:
https://registrations.indiarunning.com/sekhon_indian_air_force_marathon_2026_33197
***
निलिमा चितळे/शैलेश पाटील/परशुराम कोर
***
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
(Release ID: 2304290)
अभ्यागत कक्ष : 16