अर्थ मंत्रालय
सीजीएसटी औरंगाबाद आयुक्तालयाद्वारे जीएसटी संबंधी ताज्या घडामोडी, करदाता सेवा आणि व्यापार सुलभतेबाबत माहितीपर कार्यक्रमाचे आयोजन
Posted On:
27 AUG 2026 1:15PM by PIB Mumbai
नागपूर, 27 ऑगस्ट 2026
केंद्रीय वस्तू आणि सेवा कर (सीजीएसटी) आणि केंद्रीय उत्पादन शुल्क, औरंगाबाद आयुक्तालय, छत्रपती संभाजीनगर डीजीटीस (DGTS) मुंबई विभागीय युनिटच्या सहकार्याने 25.08.2026 रोजी जीएसटी संबंधी ताज्या घडामोडी, व्यापार सुलभता,व्यवसाय सुलभता, करदाता सेवा आणि तक्रार निवारण यंत्रणा, स्वेच्छेने अनुपालन, सीबीआयसीचे डिजिटल उपक्रम आणि करदाते आणि संबंधित घटकांच्या हितासाठी परस्पर हिताच्या इतर मुद्द्यांवर एका माहितीपर कार्यक्रमाचे तसेच चर्चासत्र व वेबिनारचे यशस्वी आयोजन केले.

या कार्यक्रमात विविध व्यापार, उद्योग आणि व्यावसायिक क्षेत्रांमधील प्रतिनिधींनी प्रत्यक्ष तसेच दूरदृश्य प्रणालीद्वारे मोठ्या संख्येने सहभाग नोंदवला. कार्यक्रमाची सुरुवात डीजीटीएस मुंबई विभागीय युनिटच्या प्रधान अतिरिक्त महासंचालकांच्या स्वागतपर भाषणाने झाली. त्यानंतर, औरंगाबाद येथील सीजीएसटी आणि केंद्रीय उत्पादन शुल्क आयुक्तांचे बीजभाषण झाले. या भाषणात त्यांनी करदात्यांच्या हितासाठी आणि समस्यांचे जलद निवारण करण्यासाठी सीबीआयसीद्वारे राबविण्यात येणाऱ्या विविध उपक्रमांवर व यंत्रणांवर विशेष भर दिला; यामध्ये 'संवाद' (SAMVAAD), 'आउटरीच' कार्यक्रम, 'ओपन डोअर पॉलिसी' (खुले धोरण), तसेच ई-मेल व सोशल मीडियाद्वारे प्रश्न विचारणे, क्षेत्रीय कार्यालयांशी थेट संपर्क साधणे आणि वेळोवेळी GSTN व GST धोरण विभागांकडे प्रकरणे पोहचवणे यांसारख्या उपाययोजनांचा समावेश आहे.

करदात्यांमध्ये जागरूकता वाढवण्यासाठी, कार्यपद्धतीत स्पष्टता आणण्यासाठी आणि अनुपालन अधिक मजबूत करण्यासाठी, जीएसटी कायदा आणि कार्यपद्धतीमधील महत्त्वाचे बदल, जीएसटीएन पोर्टलमधील सुधारणा, व्यापार सुलभता आणि प्रशासकीय सुधारणा, निवडक करदात्यांच्या श्रेणींसाठी जीएसटी नोंदणीची स्वयंचलित मंजुरी, जीएसटी दर सुधारणा, जीएसटी अपीलीय न्यायाधिकरण, एचएसएनएस उपकर यांवर केंद्रित एक सविस्तर सादरीकरण करण्यात आले. हा कार्यक्रम अत्यंत फलदायी, माहितीपूर्ण आणि ज्ञानवर्धक असल्याचे सांगून सहभागींनी विभागाद्वारे अशा जनजागृती उपक्रमांचे महत्त्व अधोरेखित केले.
* * *
पीआयबी मुंबई | नेहा कुलकर्णी/सुषमा काणे/दर्शना राणे
(Release ID: 2303696)
अभ्यागत कक्ष : 33