ग्राहक व्यवहार, अन्न आणि सार्वजनिक पुरवठा मंत्रालय
azadi ka amrit mahotsav

ग्राहक व्यवहार विभागाने 'वैध मापनशास्त्र' सुधारणांबाबत देशव्यापी प्रशिक्षण कार्यक्रम सुरू केला


अलीकडील सुधारणांची प्रभावी, एकसमान आणि पारदर्शक अंमलबजावणी करण्यासाठी वैध मापनशास्त्र अधिकाऱ्यांची क्षमता बांधणी हा या कार्यक्रमाचा उद्देश

गुजरात आणि उत्तर प्रदेशमधील अधिकाऱ्यांसाठी प्रशिक्षण कार्यक्रम पूर्ण; पुढील चार महिन्यांमध्ये इतर सर्व राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांना यात सामावून घेण्यात येणार

Posted On: 25 AUG 2026 8:14PM by PIB Mumbai

नवी दिल्‍ली, 25 ऑगस्‍ट 2026

 

वैध मापनशास्त्र कायदा, 2009 मधील तरतुदी गुन्हे श्रेणीमधून वगळणे आणि 'जन विश्वास' सुधारणा व 'व्यवसाय सुलभता' वाढवण्याच्या उपाययोजनांसह हा कायदा आणि नियमांतर्गत व्यापक सुधारणा लागू केल्यानंतर, ग्राहक व्यवहार विभागाने देशभरातील वैध मापनशास्त्र अधिकाऱ्यांसाठी क्षमता-बांधणीचा एक देशव्यापी उपक्रम सुरू केला आहे.या उपक्रमाचा एक भाग म्हणून, रांची येथील 'इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ लीगल मेट्रोलॉजी' (IILM) ने उत्तर प्रदेशातील 38 वैध मापनशास्त्र अधिकाऱ्यांसाठी 17 ते 21 ऑगस्ट 2026 दरम्यान "वैध मापनशास्त्र चौकटीतील अद्ययावत सुधारणा" या विषयावरील दुसरा पाच-दिवसीय विशेष प्रशिक्षण कार्यक्रम यशस्वीपणे आयोजित केला.

हा विशेष प्रशिक्षण कार्यक्रम प्रामुख्याने विविध राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांमधील अशा वैध मापनशास्त्र अधिकाऱ्यांसाठी तयार करण्यात आला आहे, जे या कायदा आणि नियमांमधील तरतुदींची थेट अंमलबजावणी करतात. ग्राहकांचे आणि उद्योगांचे हित जपतानाच सुधारणांची शेवटच्या टोकापर्यंत सातत्यपूर्ण आणि प्रभावी अंमलबजावणी सुनिश्चित करणे हा याचा उद्देश आहे.

पहिला पाच-दिवसीय प्रशिक्षण कार्यक्रम गुजरात सरकारच्या अधिकाऱ्यांसाठी 10 ते 14 ऑगस्ट 2026  या कालावधीत आयोजित करण्यात आला होता.

या उपक्रमाचा एक भाग म्हणून, रांची येथील 'इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ लीगल मेट्रोलॉजी' (IILM) ने उत्तर प्रदेशातील 38 वैध मापनशास्त्र अधिकाऱ्यांसाठी 17 ते 21 ऑगस्ट 2026 या कालावधीत " वैध मापनशास्त्र चौकटीतील अद्ययावत सुधारणा" या विषयावर दुसरा पाच-दिवसीय विशेष प्रशिक्षण कार्यक्रम यशस्वीपणे आयोजित केला.

सतत बदलणाऱ्या नियामक चौकटींच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी आवश्यक असलेले ज्ञान आणि व्यावहारिक कौशल्ये क्षेत्रीय स्तरावरील अंमलबजावणी अधिकाऱ्यांशी सामायिक करण्यावर या अभ्यासक्रमात भर देण्यात आला. देशभरातील वैध मापनशास्त्र अधिकाऱ्यांना प्रशिक्षित करण्याच्या उद्देशाने, पुढील चार महिन्यांमध्ये  सर्व राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांना   IILM रांची येथील पाच-दिवसीय विशेष प्रशिक्षण कार्यक्रमात सहभागी करून घेतले जाणार आहे.

ग्राहक व्यवहार विभागाच्या सचिवांनी सुधारणांच्या एकसमान अंमलबजावणीवर भर दिला.

उत्तर प्रदेशातील 'लीगल मेट्रोलॉजी म्हणजेच वैध मापनशास्त्र अधिकाऱ्यांसाठी आयोजित विशेष प्रशिक्षण कार्यक्रमाच्या समारोप समारंभास ग्राहक व्यवहार विभागाच्या सचिव निधी खरे उपस्थित होत्या. त्यांनी सहभागी अधिकाऱ्यांशी संवाद साधला आणि 'लीगल मेट्रोलॉजी' क्षेत्रातील अलीकडील सुधारणांची प्रभावी आणि एकसमान अंमलबजावणी करण्याच्या महत्त्वावर भर दिला.

अधिकाऱ्यांना मार्गदर्शन करताना निधी खरे यांनी नमूद केले की, 'वैधानिक मापनशास्त्रा'चा नागरिकांच्या दैनंदिन जीवनावर थेट आणि स्पष्ट परिणाम होतो. तंत्रज्ञानातील जलद प्रगती तसेच नवीन उपकरणे आणि मापन प्रणालींच्या उदयामुळे, मापनांची अचूकता, विश्वासार्हता आणि 'ट्रेसिबिलिटी' म्हणजेच मापनाचा स्रोत शोधण्याची क्षमता  सुनिश्चित करणे अधिक महत्त्वाचे झाले आहे.

मजबूत नियामक प्रणाली आणि 'ईज ऑफ डुइंग बिझनेस' म्हणजेच व्यवसाय सुलभता, नावीन्यपूर्ण उपक्रम आणि  प्रभावी ग्राहक संरक्षण या गोष्टी हातात हात घालून चालल्या पाहिजेत, या  गोष्टीवर त्यांनी यावेळी प्रकाश टाकला.

सुधारणांची अंमलबजावणी अगदी तळागाळापर्यंत (अंतिम घटकापर्यंत) पोहोचली पाहिजे, तसेच  धोरणात्मक सुधारणांचे रूपांतर उत्तम सेवांमध्ये आणि ग्राहक, व्यावसायिक यांच्यातील वाढत्या विश्वासात करण्यामध्ये क्षेत्रीय अधिकाऱ्यांची भूमिका अत्यंत महत्त्वाची असते, ही गोष्‍ट  यावेळी त्यांनी अधोरेखित केली. 'सहभागी प्रशासन' पद्धतीच्या महत्त्वावरही त्यांनी  भर दिला; यामध्ये 'सुधारणा उत्सव' सारख्या उपक्रमांचा समावेश आहे, जे ग्राहक आणि संबंधित घटकांना पुढील सुधारणांसाठी सूचना देण्याची संधी उपलब्ध करून दिली आहे.

प्रशिक्षण कार्यक्रमांतर्गत समाविष्ट केलेले मुख्य विषय

या प्रशिक्षणात 'वैध मापनशास्त्र कायदा 2009' आणि त्याअंतर्गत केलेले नियम, 2023 आणि 2026 मधील 'जन विश्वास' सुधारणा, गुन्ह्यांचे स्वरूप कमी करणे आणि 'सुधारणा सूचना', व्यवसाय सुलभतेला चालना देण्याच्या उपाययोजनांवरील समित्यांच्या शिफारसी, 'मॉडेल अप्रूव्हल' म्हणजेच नमुना मान्यता आणि GATCs अर्थात ‘जनरल अॅप्रुव्हल ऑफ टाइप ऑप क्लास ऑफ वेटस् ऑर मेजर्स’ संबंधित सुधारणा, तसेच ग्राहकांचे हिताची जपणूक करून व्यवसाय सुलभतेसाठीच्या नवीन उपाययोजना यांचा समावेश होता.

या कार्यक्रमामुळे अधिकाऱ्यांना कामाची अंमलबजावणी, कायद्याची अंमलबजावणी आणि सेवा प्रदान करताना येणाऱ्या व्यावहारिक आव्हानांवर चर्चा करण्यासाठी एक व्यासपीठ मिळाले. यामुळे धोरण आणि त्याची प्रत्यक्ष अंमलबजावणी यामधील दरी कमी करण्यास मदत झाली.

या कार्यक्रमाची यशस्वी सांगता झाली. यावरून  ग्राहक व्यवहार विभागाचे क्षमता बांधणी, नियामक सुधारणा, व्यवसाय सुलभता आणि आधुनिक, प्रतिसादक्षम आणि  तंत्रज्ञान-केंद्रित 'लीगल मेट्रोलॉजी' म्हणजेच 'वैधानिक मापनशास्त्रा'च्या प्रणालीद्वारे प्रभावी ग्राहक संरक्षण यावरील निरंतर लक्ष दर्शवते.

 

* * *

शैलेश पाटील/सुषमा काणे/सुवर्णा बेडेकर/दर्शना राणे

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai


(Release ID: 2303299) अभ्यागत कक्ष : 9