दूरसंचार आणि माहिती तंत्रज्ञान मंत्रालय
azadi ka amrit mahotsav

टपाल विभागाद्वारे 3 सप्टेंबर रोजी विभाग स्तरीय निवृत्तीवेतन आणि डाक अदालतीचे आयोजन

Posted On: 24 AUG 2026 2:56PM by PIB Mumbai

 

निवृत्तीवेतन आणि  टपाल सेवेशी संबंधित जनतेच्या तक्रारी आणि समस्या जाणून घेण्यासाठी गोवा टपाल विभाग, पणजी यांनी विभागीय स्तरावरील निवृत्तीवेतन तसेच डाक अदालतचे आयोजन केले आहे. या अदालती गोवा विभाग, ईडीसी, पाटो,  पणजी येथील वरिष्ठ अधीक्षकांच्या कार्यालयात होतील. निवृत्तीवेतन अदालत 3 सप्टेंबर  2026 रोजी सकाळी 11.00 वाजता होणार असून टपाल अदालत दुपारी 12:00 वाजता होईल.

ज्या तक्रारींवर  सहा आठवड्यांच्या आत उत्तर मिळालेले नाही अशाच  तक्रारी या अदालतीत विचारात घेतल्या जातील.

सुरुवातीला ज्या अधिकाऱ्यांकडे मूळ तक्रार केली आहे त्या अधिकाऱ्याचे नाव आणि पद यांचा उल्लेख तक्रार अर्जामध्ये असावा. याशिवाय मूळ तक्रार कोणत्या तारखेला केली आहे त्याचाही उल्लेख करावा. प्रत्येक अर्जात केवळ एकाच तक्रारीचा समावेश असावा.

अर्जामध्ये मूळ कागदपत्रांची प्रत जोडणे बंधनकारक आहे. अदालतीमध्ये तक्रारअर्ज समक्ष दाखल करावेत किंवा ते वरिष्ठ अधीक्षक टपाल कार्यालय, गोवा विभाग, पणजी - 403001 या पत्त्यावर पोस्टाने पाठवावे. हे अर्ज कार्यालयात 1 सप्टेंबर 2026 पर्यंत पोहोचणे आवश्यक आहे.

तक्रारदार आणि निवृत्तीवेतनधारक, त्यांची इच्छा असल्यास, स्वतःच्या खर्चाने संबंधित अदालतीमध्ये व्यक्तिशः उपस्थित राहू शकतात.

***

सुषमा काणे/भक्ती सोनटक्के/परशुराम कोर

*** 

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai


(Release ID: 2302699) अभ्यागत कक्ष : 28
Read this releasein: English