युवा व्यवहार आणि क्रीडा मंत्रालय
राष्ट्रीय क्रीडा दिन: 'माय भारत गोवा' आणि एनएसएस गोवा राज्य यांच्या वतीने 27 ऑगस्ट रोजी गोव्यात पंतप्रधानांसमवेत दूरस्थ पद्धतीने संवाद कार्यक्रमाचे आयोजन
प्रविष्टि तिथि:
22 AUG 2026 5:31PM by PIB Mumbai
पणजी, गोवा 22 ऑगस्ट 2026
'राष्ट्रीय क्रीडा दिना'च्या निमित्ताने आयोजित करण्यात येणाऱ्या विविध उपक्रमांचा एक भाग म्हणून, गोव्यातील युवकांना आणि विद्यार्थ्यांना 27 ऑगस्ट रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याशी दूरदृष्य प्रणालीद्वारे संवाद साधण्याची संधी मिळणार आहे.
केंद्र सरकारच्या युवक व्यवहार आणि क्रीडा मंत्रालयाच्या कक्षेत कार्यरत असलेल्या 'माय भारत गोवा' आणि गोवा राज्य एनएसएस सहकार्याने संपूर्ण राज्यातील चार शैक्षणिक संस्थांमध्ये पंतप्रधानांसमवेत 'दूरस्थ पद्धतीने संवाद कार्यक्रमाचे' आयोजन केले जाणार आहे.
उत्तर गोव्यातील म्हापसा इथल्या सेंट झेवियर्स कॉलेज आणि पर्वोरिम येथील विद्या प्रबोधिनी कॉलेजमध्ये, तसेच दक्षिण गोव्यातील नावेली येथील रोझरी कॉलेज ऑफ आर्ट्स अँड कॉमर्स आणि श्री गोपाल गावकर मेमोरियल गोवा मल्टी-फॅकल्टी कॉलेजमध्ये हा कार्यक्रम आयोजित केला जाईल. कार्यक्रमासाठी निवड करण्यात आलेल्या संस्थांमधील विद्यार्थी, एनएसएस स्वयंसेवक आणि तरुण या कार्यक्रमात सहभागी होतील. राष्ट्रीय स्तरावरील खेळाडूंचा सहभाग हा देखील या संवादसत्राचा एक भाग असेल, त्यानिमित्ताने कार्यक्रमात सहभागी होणाऱ्या तरुणांना यशस्वी खेळाडूंकडून प्रेरणा घेण्याची तसेच शिस्त, समर्पण, चिकाटी आणि शारीरिक तंदुरुस्तीचे महत्त्व जाणून घेण्याची संधी मिळेल.
तरुणांचा खेळांमधील सहभाग वाढवणे तसेच शारीरिक तंदुरुस्ती, आरोग्यदायी जीवनशैली, शिस्त आणि क्रियाशील जीवनशैलीला प्रोत्साहन देणे हा या कार्यक्रमाचा उद्देश आहे. भारताचे विख्यात हॉकीपटू मेजर ध्यानचंद यांच्या जयंतीनिमित्त दरवर्षी 29 ऑगस्ट रोजी साजऱ्या केल्या जाणाऱ्या 'राष्ट्रीय क्रीडा दिना'चे औचित्य साधून त्याचे आयोजन करण्यात आले आहे.
युवकांना मोठ्या प्रमाणात सहभागी होता यावे तसेच हा दूरस्थ संवाद कार्यक्रम सुरळीतपणे पार पडावा यासाठी 'माय भारत गोवा' आणि 'एनएसएस गोवा राज्य ' शैक्षणिक संस्था आणि इतर हितसंबंधियांसह समन्वयाने कार्यक्रमाची तयारी करत आहेत.
***
राधिका अघोर/मंजिरी गानू/परशुराम कोर
Follow us on social media: PIBPanaji
/pibpanaji
pibgoa[at]gmail[dot]com
/PIBPanaji
/pibpanaji
(रिलीज़ आईडी: 2302368)
आगंतुक पटल : 21
इस विज्ञप्ति को इन भाषाओं में पढ़ें:
English