वाणिज्य आणि उदयोग मंत्रालय
वाणिज्य सचिव राजेश अग्रवाल यांच्याकडून चिंतन शिबिरात 100 अब्ज डॉलर्सच्या रत्न आणि आभूषण निर्यातीचा 'दृष्टीक्षेप 2040' या कृती आराखड्याचे अनावरण
शासन-उद्योग संवादातून, रोजगार दुप्पट करून 1 कोटी करण्यासाठी आणि जागतिक वस्तू निर्यातीतील भारताचा वाटा 14 टक्क्यांपर्यंत वाढवण्यासाठी प्राधान्यक्रम निश्चित
प्रविष्टि तिथि:
19 AUG 2026 10:11PM by PIB Mumbai
नवी दिल्ली/मुंबई, 19 ऑगस्ट 2026
वाणिज्य विभाग आणि 'जेम अँड ज्वेलरी एक्सपोर्ट प्रमोशन कौन्सिल' (GJEPC) या रत्ने आणि आभूषण निर्यात प्रोत्साहन परिषद यांच्या संयुक्त विद्यमाने आज 'चिंतन शिबिर – 2040 रोडमॅप फॉर जेम्स अँड ज्वेलरी' या उच्चस्तरीय बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. 2040 पर्यंत रत्न आणि आभूषण क्षेत्रात 100 अब्ज अमेरिकी डॉलरच्या निर्यातीचे ध्येय गाठण्यासाठी सर्वसमावेशक धोरण आखणे हा या संवादाचा मुख्य उद्देश होता. हा कृती आराखडा, 2025-26 मध्ये नोंदवलेल्या सध्याच्या सुमारे 28 अब्ज डॉलरच्या निर्यातीवरून 2040 पर्यंत 100 अब्ज डॉलरपर्यंत वाढ करण्याचे उद्दिष्ट ठेवतो. या क्षेत्राचे भारताच्या स्थूल राष्ट्रीय उत्पादनात 1.2 टक्के योगदान राहील आणि 2040 पर्यंत देशाच्या एकूण वस्तू निर्यातीत 14 टक्के वाटा असेल असा अंदाज वर्तवण्यात आला आहे.
चिंतन शिबिराच्या निष्पत्तीबद्दल बोलताना भारत सरकारचे वाणिज्य सचिव राजेश अग्रवाल यांनी सांगितले की, भारताच्या रत्न आणि आभूषण क्षेत्राला सुमारे 28 अब्ज डॉलरवरून 100 अब्ज डॉलरपर्यंत नेण्यासाठी नवोन्मेष, जागतिक दर्जाची रचना (डिझाइन), सक्षम नेतृत्व आणि विश्वासावर आधारित सर्वसमावेशक परिसंस्था उभारणे हा महत्त्वाचा घटक ठरेल. भारताची खरी ताकद सोने, चांदी किंवा कच्च्या हिऱ्यांच्या खाणीत नसून देशातील कुशल कारागिरांच्या मोठ्या संख्येत आहे, यावर त्यांनी भर दिला. त्यामुळे केवळ मूलभूत उत्पादनापेक्षा रचना, नवोन्मेष आणि जागतिक ब्रँडिंगद्वारे अधिक संपत्ती निर्माण होईल. भारताने कमी नफा मिळवून देणाऱ्या कामाच्या पलीकडे जाऊन अधिक मूल्यवर्धित कामावर भर देण्याची गरज असल्याचे त्यांनी सांगितले. तसेच, उद्योगांसमोरील प्रत्यक्ष आव्हानांवर उपाय शोधण्यासाठी शैक्षणिक संस्थांमधील उद्यम-विकास केंद्रांशी भागीदारी करून शिक्षण आणि उद्योग क्षेत्रातील दरी कमी करण्याची गरज त्यांनी व्यक्त केली.
णण्यासाठी कृत्रिम बुद्धिमत्ता आणि त्रिमितीय छपाईसारख्या प्रगत तंत्रज्ञानाचा वापर करण्याच्या आवश्यकतेवर भर दिला. विकसित भारत 2047 च्या ध्येयाशी सुसंगत राहून लवचिक पुरवठा साखळी आणि जागतिक स्तरावर मान्यताप्राप्त भारतीय ब्रँड्स तयार करण्यासाठी त्यांनी जोखीम घेण्याची क्षमता वाढवण्याचे, भविष्यातील उद्योग आव्हानांना सामोरे जाण्याचे आणि तरुण प्रतिभेला मार्गदर्शन करण्याचे आवाहनही केले.
केंद्रीय वाणिज्य आणि उद्योग मंत्री पीयूष गोयल यांच्या मार्गदर्शनाखाली या चिंतन शिबिराचे आयोजन करण्यात आले. या चर्चेत भारताची उत्पादन क्षमता मजबूत करणे, बाजारपेठेतील पोहोच वाढवणे आणि 'क्राफ्टेड इन इंडिया' दागिन्यांना जागतिक स्तरावर ओळख मिळवून देण्यावर भर देण्यात आला.
भारताने जागतिक रत्ने आणि दागिने व्यापारात आधीच भक्कम स्थान निर्माण केले आहे आणि आता मूल्य साखळीमध्ये अधिक वरच्या स्तरावर जाण्यासाठी निर्णायक पावले उचलली पाहिजेत, असे डीजीएफटीचे महासंचालक लव अग्रवाल यांनी सांगितले. त्यांनी भारताला एक जागतिक ब्रँड म्हणून तसेच डिझाइन आणि मूल्यवर्धित दागिन्यांचे केंद्र म्हणून स्थापित करण्याच्या गरजेवर भर दिला.
भारतातील रत्ने आणि दागिने उद्योग सध्या एका महत्त्वाच्या टप्प्यावर असून, नवीन मुक्त व्यापार करार (FTAs), स्पेशल नोटिफाइड झोनद्वारे कच्च्या हिऱ्यांच्या विक्रीवर मिळालेली 15 वर्षांची कर सवलत आणि एमएसएमई क्षेत्राला मिळालेला भक्कम पाठिंबा यामुळे उद्योगाच्या वाढीसाठी एक मजबूत धोरणात्मक पाया तयार झाला आहे, असे जीजेईपीसीचे अध्यक्ष किरीट भन्साळी यांनी सांगितले.
चिंतन शिबिराची रचना पाच प्राधान्यक्रमाच्या मोहिमांवर आधारित होती. प्रत्येक मोहीमेसाठी स्वतंत्र गटचर्चा सत्र आयोजित करण्यात आले होते. या सत्रांचे अध्यक्षस्थान वरिष्ठ सरकारी अधिकारी आणि उद्योग क्षेत्रातील नेत्यांनी संयुक्तपणे भूषवले.
मोहीम 1 — जागतिक बाजारपेठ प्रवेश याचे अध्यक्षस्थान डीजीएफटीचे महासंचालक लव अग्रवाल यांनी भूषवले. या मोहिमेचा भर भारताच्या विस्तारत असलेल्या मुक्त व्यापार करार (एफटीए) जाळ्याचा लाभ घेणे आणि जागतिक दागिन्यांच्या वापरामध्ये भारताचा वाटा वाढवणे यावर होता.
मोहीम 2 — सुक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योग विस्तार (एमएसएमई स्केल अप) याचे अध्यक्षस्थान एमएसएमई मंत्रालयाचे अतिरिक्त विकास आयुक्त आर. के. राय यांनी भूषवले, तर ईसीजीसीचे सीएमडी सृष्टीराज अंबास्थ हे सह-अध्यक्ष होते. या मोहिमेचा भर उद्योगाचा कणा असलेल्या एमएसएमईंना वित्त, तंत्रज्ञान आणि बाजारपेठांमध्ये सुधारित प्रवेशाद्वारे विस्तार करण्यास सक्षम करण्यावर होता.
मोहीम 3 — निर्यात-आयात जलदगती याचे अध्यक्षस्थान डीजीईपीचे महासंचालक शिव कुमार शर्मा यांनी भूषवले. या मोहिमेचा भर देशात सीमापार, व्यापार प्रक्रियांना अधिक सोपे, जलद आणि अधिक अंदाज करता येण्याजोगे बनवण्यावर होता.
मिशन 4 — भारताने घडवलेले (‘क्राफ्टेड बाय इंडिया’) हे भारतीय आभूषणांना डिझाइन, बौद्धिक संपदा आणि ब्रँडिंगच्या माध्यमातून जागतिक ओळख आणि अधिक मूल्य मिळवून देण्यावर केंद्रित होते.
मिशन 5 — पुढच्या पिढीतील प्रतिभा आणि डिझाइन (‘नेक्स्ट-जनरेशन टॅलेंट अँड डिझाइन’) हे 100 अब्ज डॉलर्सच्या रत्न आणि दागिने उद्योगाला आधार देण्यासाठी आवश्यक असलेली कौशल्ये, डिझाइन क्षमता आणि प्रतिभावान मनुष्यबळ विकसित करण्यावर केंद्रित होते.
नैसर्गिक हिऱ्यांसारख्या पारंपरिक क्षेत्रांमध्ये भारताचे नेतृत्व अधिक मजबूत करण्याच्या आणि त्याच वेळी उदयोन्मुख मूल्य स्रोतांवर आक्रमकपणे लक्ष केंद्रित करण्याच्या वचनबद्धतेसह चिंतन शिबिराची सांगता झाली. या आराखड्यानुसार उत्पादन दुप्पट करून सुमारे 15 लाख कोटी रुपयांपर्यंत नेण्याची आणि या क्षेत्राचे एकूण आर्थिक मूल्य जवळपास 60 लाख कोटी रुपयांपर्यंत वाढवण्याची योजना आहे.
जागतिक रत्न आणि दागिने मूल्य साखळीमध्ये भारताचे स्थान मजबूत करण्याच्या उपाययोजनांवर विचारविनिमय करण्यासाठी चिंतन शिबिरात वरिष्ठ सरकारी अधिकारी आणि उद्योगपती एकत्र आले होते.
* * *
पीआयबी मुंबई | सुषमा काणे/सुवर्णा बेडेकर/आशुतोष सावे/शैलेश पाटील/श्रद्धा मुखेडकर/दर्शना राणे
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
(रिलीज़ आईडी: 2301399)
आगंतुक पटल : 22
इस विज्ञप्ति को इन भाषाओं में पढ़ें:
English