माहिती आणि प्रसारण मंत्रालय
azadi ka amrit mahotsav

भंडारा येथे केंद्रीय संचार ब्युरोच्या तीन दिवसीय मल्टिमीडिया प्रदर्शनाच्या अंतिम दिवशी ‘वंदे मातरम्’चा जयघोष


तीन दिवसीय प्रदर्शनात सरकारच्या 12 वर्षांच्या कामगिरीसह व्हीबी-जी राम जी आणि ‘हर घर तिरंगा’ उपक्रमांची माहिती

प्रविष्टि तिथि: 15 AUG 2026 4:54PM by PIB Mumbai

 

केंद्रीय संचार ब्युरोच्या (सीबीसी) नागपूर क्षेत्रीय कार्यालयाच्या वतीने एकात्मिक संवाद आणि जनसंपर्क कार्यक्रमांतर्गत भंडारा बस स्थानक येथे आयोजित करण्यात आलेल्या तीन दिवसीय मल्टिमीडिया प्रदर्शनाची आज सांगता झाली. या प्रदर्शनात सरकारच्या 12 वर्षांच्या कामगिरीसोबतच व्हीबी-जी राम जी आणि ‘हर घर तिरंगा’ (एचजीटी) या उपक्रमांची माहिती देण्यात आली. तसेच, विविध सरकारी योजना, कार्यक्रम आणि कल्याणकारी उपक्रमांची माहितीही नागरिकांना देण्यात आली.

प्रदर्शनाच्या सांगता दिनानिमित्त भारताचे राष्ट्रीय गीत असलेल्या ‘वंदे मातरम्’ला 150 वर्षे पूर्ण झाल्याच्या निमित्ताने विशेष कार्यक्रम आयोजित करण्यात आला. सीबीसीच्या पीआरटी पथकाच्या नेतृत्वाखाली ‘वंदे मातरम्’चे सामूहिक गायन करण्यात आले. अधिकारी, विद्यार्थी आणि नागरिकांनीही या सामूहिक गायनात सहभाग घेतला. त्यामुळे प्रदर्शनाच्या ठिकाणी देशभक्तीपूर्ण वातावरण निर्माण झाले.

प्रदर्शनाला भेट देणाऱ्या नागरिकांनी या उपक्रमाचे कौतुक केले. विविध योजना आणि कार्यक्रमांची माहिती जाणून घेण्यासाठी हे प्रदर्शन उपयुक्त ठरल्याचे त्यांनी सांगितले.

प्रदर्शन यशस्वी करण्यासाठी सहकार्य आणि पाठिंबा दिल्याबद्दल भंडारा बस स्थानकाचे आगार व्यवस्थापक तसेच उमेद स्वयं-सहायता गट, आयुष्मान आरोग्य आणि व्हीबी-जी राम जी ग्रामीण स्टॉलच्या प्रतिनिधींचा सत्कार करण्यात आला.

नागरिकांकडून मिळालेल्या कौतुकासह तीन दिवसीय प्रदर्शनाची सांगता झाली. सरकारी उपक्रमांची माहिती नागरिकांपर्यंत अधिक जवळून पोहोचविण्याचे महत्त्व या प्रदर्शनामुळे अधोरेखित झाले.

***

माधुरी पांगे/निखिलेश चित्रे/परशुराम कोर

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com


(रिलीज़ आईडी: 2300028) आगंतुक पटल : 21
इस विज्ञप्ति को इन भाषाओं में पढ़ें: English