रेल्वे मंत्रालय
पश्चिम रेल्वेचे 80व्या स्वातंत्र्यदिनानिमित्त मुख्यालयात ध्वजवंदन
प्रविष्टि तिथि:
15 AUG 2026 2:06PM by PIB Mumbai
पश्चिम रेल्वे मुख्यालयात 80वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा करण्यात आला. चर्चगेट येथील पश्चिम रेल्वेच्या मुख्यालयात पश्चिम रेल्वेचे सरव्यवस्थापक रामाश्रय पांडे यांच्या हस्ते राष्ट्रध्वज फडकविण्यात आला. या गौरवशाली प्रसंगी त्यांनी रेल्वे सुरक्षा दलाच्या (आरपीएफ) संचलनाची पाहणी केली.
पांडे यांनी उपस्थितांना संबोधित करताना या पवित्र प्रसंगी रेल्वे कर्मचारी आणि त्यांच्या कुटुंबीयांना शुभेच्छा दिल्या. कार्यक्रमाच्या प्रारंभी पश्चिम रेल्वेचे सरव्यवस्थापक रामाश्रय पांडे यांचे पश्चिम रेल्वेचे महानिरीक्षक तसेच प्रधान मुख्य सुरक्षा आयुक्त अजय सदानी यांनी स्वागत केले. पश्चिम रेल्वे महिला कल्याण संघटनेच्या (डब्ल्यूआरडब्ल्यूडब्ल्यूओ) अध्यक्षा सुजाता पांडे, पश्चिम रेल्वेचे अतिरिक्त सरव्यवस्थापक प्रदीप कुमार, विभागांचे प्रधान प्रमुख तसेच इतर वरिष्ठ रेल्वे अधिकारी यावेळी उपस्थित होते.

पश्चिम रेल्वेचे सरव्यवस्थापक रामाश्रय पांडे 15 आॅगस्ट, 2026 रोजी मुंबईतील चर्चगेट येथील पश्चिम रेल्वे मुख्यालयात राष्ट्रध्वजाला मानवंदना देताना. दुसऱ्या छायाचित्रात पांडे स्वातंत्र्यदिनाच्या कार्यक्रमातील संचलनाची पाहणी करताना आणि शेवटच्या छायाचित्रात उपस्थितांना संबोधित करताना.
उपस्थितांना संबोधित करताना सरव्यवस्थापक पांडे यांनी पश्चिम रेल्वेने अलीकडेच साध्य केलेल्या कामगिरी आणि महत्त्वपूर्ण टप्प्यांची माहिती दिली. ते म्हणाले की, आपण आपल्या स्वातंत्र्यसैनिक, हुतात्मे आणि स्वातंत्र्यलढ्यातील सर्व वीरांच्या अतुलनीय शौर्याला आणि बलिदानाला योग्य श्रद्धांजली अर्पण करत असताना, त्यांच्या पराक्रमी भावनेतून प्रेरणा घेत राहिले पाहिजे आणि देशासाठी अधिक चांगले भविष्य घडविण्यासाठी तसेच देशसेवेसाठी आपल्या प्रयत्नांना योग्य दिशा दिली पाहिजे.
आपल्या भाषणाच्या समारोपात पांडे यांनी कर्मचाऱ्यांना कठोर परिश्रम सुरू ठेवण्यासाठी प्रोत्साहित केले आणि प्रत्येकाने राष्ट्रसेवेसाठी आणि देशातील नागरिकांच्या सेवेसाठी आपले प्रयत्न समर्पित करण्याचे आवाहन केले. ते म्हणाले की, सर्वांच्या सामूहिक प्रयत्नांमुळे पश्चिम रेल्वे सातत्यपूर्ण प्रगतीच्या मार्गावर पुढे वाटचाल करेल आणि भारतीय रेल्वेसह भारताला अधिक उंचीवर नेण्यात महत्त्वाची भूमिका बजावेल.
पश्चिम रेल्वेचे मुख्य जनसंपर्क अधिकारी विनीत अभिषेक यांनी सांगितले की, या शुभप्रसंगी पश्चिम रेल्वे महिला कल्याण संघटनेच्या (डब्ल्यूआरडब्ल्यूडब्ल्यूओ) अध्यक्ष सुजाता पांडे, उपाध्यक्षा ईशा मलिक तसेच डब्ल्यूआरडब्ल्यूडब्ल्यूओ च्या कार्यकारी समितीच्या सदस्यांनी जगजीवन राम रुग्णालयाअंतर्गत असलेल्या टी-55 इमारतीसाठी खुर्च्या, टेबल, जलशुद्धीकरण यंत्रे, व्हीलचेअर आणि रेफ्रिजरेटर यांसारख्या आवश्यक उपयोगी वस्तूंचे दान केले.
टी-55 इमारतीमध्ये भारतीय रेल्वेच्या विविध भागांतील उपचारासाठी टाटा मेमोरियल रुग्णालयात दाखल होणारे रेल्वे कर्मचारी आणि त्यांच्या कुटुंबीयांची निवासाची व्यवस्था करण्यात येते.

पश्चिम रेल्वे महिला कल्याण संघटनेच्या अध्यक्ष सुजाता पांडे, उपाध्यक्ष ईशा मलिक तसेच डब्ल्यूआरडब्ल्यूडब्ल्यूओ च्या कार्यकारी समितीच्या सदस्यांकडून जगजीवन राम रुग्णालयाला उपयोगी वस्तू प्रदान करताना.
याशिवाय, जगजीवन राम रुग्णालयाला जलशुद्धीकरण यंत्रे आणि मायक्रोवेव्ह ओव्हनही दान करण्यात आले. दान करण्यात आलेल्या वस्तू पश्चिम रेल्वेच्या प्रधान मुख्य वैद्यकीय संचालक डॉ. ज्योत्सना चोप्रा यांच्याकडे सुपूर्द करण्यात आल्या.
***
नितीन फुल्लुके / नितीन गायकवाड/परशुराम कोर
***
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
(रिलीज़ आईडी: 2299950)
आगंतुक पटल : 13
इस विज्ञप्ति को इन भाषाओं में पढ़ें:
English