नौवहन मंत्रालय
मुरगाव बंदर प्राधिकरणात 80 वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
Posted On:
15 AUG 2026 5:24PM by PIB Mumbai
गोवा 15 ऑगस्ट 2026:
मुरगाव बंदर प्राधिकरणाने ‘हर घर तिरंगा’ आणि ‘माय इंडिया माय प्राइड’ या उपक्रमांतर्गत भारताचा 80 वा स्वातंत्र्यदिन उत्साहात आणि देशभक्तीपूर्ण वातावरणात साजरा केला. या निमित्ताने बंदर समुदायातील अधिकारी, कर्मचारी आणि विविध घटकांनी एकत्र येत राष्ट्राप्रती आपला अभिमान व्यक्त केला.

कार्यक्रमाची सुरुवात वंदे मातरम्’च्या सादरीकरणाने झाली. त्यानंतर मुरगाव बंदर प्राधिकरणाचे अध्यक्ष डॉ. एन. विनोदकुमार यांच्या हस्ते राष्ट्रध्वज फडकविण्यात आला. यावेळी उपाध्यक्ष श्री. विनायक राव, विविध विभागांचे प्रमुख, अधिकारी, कर्मचारी, केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दलाचे जवान, अग्निशमन दलाचे कर्मचारी आणि विद्यार्थी उपस्थित होते.

यानंतर केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दलाचे जवान आणि मुरगाव बंदर प्राधिकरणाच्या अग्निशमन दलाने सादर केलेल्या शानदार संचलनाने (गार्ड ऑफ ऑनर) कार्यक्रमाची शोभा वाढवली. या संचलनातून राष्ट्रसेवेसाठी कार्यरत जवानांची शिस्त, समर्पण आणि कर्तव्यनिष्ठा अधोरेखित झाली.

बंदराच्या कार्यात उल्लेखनीय योगदान देणाऱ्या अधिकारी व कर्मचाऱ्यांना उत्कृष्ट कर्मचारी पुरस्कार, तर सीआयएसएफ जवानांना त्यांच्या समर्पित सेवेसाठी विशेष पुरस्कार प्रदान करण्यात आले.
कार्यक्रमात दीपविहार प्राथमिक आणि माध्यमिक शाळेतील विद्यार्थ्यांसह बंदर प्राधिकरणाच्या अधिकाऱ्यांनी सादर केलेल्या सांस्कृतिक कार्यक्रमांनी उपस्थितांची मने जिंकली. या सादरीकरणातून भारताची समृद्ध सांस्कृतिक परंपरा आणि देशभक्तीची भावना प्रभावीपणे व्यक्त झाली.
स्वातंत्र्यदिनाचा हा सोहळा केवळ उत्सव न राहता स्वातंत्र्यसैनिकांच्या त्यागाची आठवण करून देणारा ठरला. तसेच स्वातंत्र्य, एकता, सेवा आणि राष्ट्रनिर्माणाच्या मूल्यांप्रती सामूहिक बांधिलकी अधिक दृढ करण्याचा संदेश या कार्यक्रमातून देण्यात आला.
***
स्त्रोत- एमपीए,गोवा/पीआयबी पणजी/अंबादास यादव/परशुराम कोर
Follow us on social media: PIBPanaji
/pibpanaji
pibgoa[at]gmail[dot]com
/PIBPanaji
/pibpanaji
(Release ID: 2299915)
अभ्यागत कक्ष : 54