आयुष मंत्रालय
azadi ka amrit mahotsav

गोव्यातील अखिल भारतीय आयुर्वेद संस्थेत देशभक्तीपूर्ण वातावरणात स्वातंत्र्यदिन साजरा

Posted On: 15 AUG 2026 3:21PM by PIB Mumbai

 

गोवा, 15 ऑगस्ट 2026:

अखिल भारतीय आयुर्वेद संस्था, गोवा येथे 80 वा स्वातंत्र्यदिन देशभक्तीपूर्ण वातावरणात आणि उत्साहात साजरा करण्यात आला. या कार्यक्रमात संस्थेतील प्राध्यापक, अधिकारी, कर्मचारी, विद्यार्थी आणि सुरक्षा कर्मचारी मोठ्या उत्साहाने सहभागी झाले.

कार्यक्रमाची सुरुवात संस्थेच्या अधिष्ठाता डॉ. प्रा. सुजाता डी. कदम यांच्या आगमनाने झाले. त्यांच्यासमवेत डॉ. स्वप्नील औटी, सहाय्यक प्राध्यापक, पंचकर्म विभाग आणि डॉ. प्रा. मोहन जोशी, सहयोगी अधिष्ठाता (पदवीपूर्व व पीएच.डी.) उपस्थित होते. संस्थेच्या सुरक्षा कर्मचाऱ्यांनी अधिष्ठातांना मानवंदना देत औपचारिक संचलनाद्वारे स्वागत केले.

डॉ. प्रा. सुजाता डी. कदम यांच्या हस्ते राष्ट्रध्वज फडकविण्यात आला. त्यानंतर वंदे मातरम् आणि राष्ट्रगीताचे सामूहिक गायन करण्यात आले. ध्वजारोहणानंतर सुरक्षा कर्मचाऱ्यांनी संचलन केले. विद्यार्थ्यांच्या उत्साहपूर्ण ढोलवादनामुळे या संचलनाला विशेष रंगत आली. संचलनातून शिस्त, समन्वय आणि देशभक्तीची भावना प्रकर्षाने दिसून आली.

यानंतर विद्यार्थी परिषदेच्या अध्यक्षांनी स्वागतपर भाषण केले. सांस्कृतिक कार्यक्रमात एकल व समूहगीतांचे सादरीकरण तसेच देशभक्तिपर भाषणाचा समावेश होता. प्राध्यापकांच्या मुलांनी सादर केलेल्या विशेष कार्यक्रमाने उपस्थितांमध्ये आनंदाचे आणि उत्साहाचे वातावरण निर्माण केले.

आपल्या अध्यक्षीय भाषणात डॉ. प्रा. सुजाता डी. कदम यांनी समर्पण, जबाबदारी, एकता आणि राष्ट्रसेवा या मूल्यांचे महत्त्व अधोरेखित केले. यावेळी डॉ. स्वप्नील औटी यांनी स्वातंत्र्यदिनाचे महत्त्व आणि प्रत्येक नागरिकाची राष्ट्राप्रती असलेली जबाबदारी यावर मार्गदर्शन केले.

कार्यक्रमाच्या शेवटी विद्यार्थी परिषदेच्या महासचिवांनी आभार प्रदर्शन केले.

अखिल भारतीय आयुर्वेद संस्था, गोवा येथील स्वातंत्र्यदिनाचा हा सोहळा स्वातंत्र्य, देशभक्ती, एकता आणि संस्थात्मक बांधिलकीचा उत्सव ठरला.

***

स्त्रोत-एआयआयए,गोवा/पीआयबी पणजी/अंबादास यादव/परशुराम कोर

Follow us on social media: PIBPanaji    /pibpanaji  pibgoa[at]gmail[dot]com  /PIBPanaji    /pibpanaji


(Release ID: 2299869) अभ्यागत कक्ष : 33
Read this releasein: English