संरक्षण मंत्रालय
azadi ka amrit mahotsav

भारतीय वायू दलाच्या बँडकडून80व्या स्वातंत्र्य दिनानिमित्त स्वातंत्र्यदिनानिमित्त नागपुरात विशेष संगीत कार्यक्रमाचे आयोजन


सर्वांसाठी प्रवेश विनामूल्य

Posted On: 14 AUG 2026 2:29PM by PIB Mumbai

 
नागपूर, 14 ऑगस्ट 2026

भारतीय वायू दलाचा बँड भारताच्या 80 व्या स्वातंत्र्य दिनाच्या उत्सवाचा एक भाग म्हणून नागपुरात एक विशेष संगीत कार्यक्रम सादर करणार आहे. दिनांक 15 ऑगस्ट 2026 रोजी दुपारी 4:30 वाजता कविवर्य सुरेश भट सभागृह, नागपूर इथे हा कार्यक्रम होणार असून तो सर्वांसाठी विनामूल्य खुला आहे. नागरिकांना या उत्सवात सहभागी होण्याचे निमंत्रण देण्यात आले आहे.
या कार्यक्रमात देशभक्तीपर गीते, लोकप्रिय सांगीतिक रचना आणि भारतीय वायु दलाच्या बँडमधील प्रतिभावान संगीतकारांचे चैतन्यमय सादरीकरण पाहायला मिळेल. या कार्यक्रमाचा उद्देश देशाच्या समृद्ध वारशाचा उत्सव साजरा करणे, स्वातंत्र्य सैनिकांच्या त्यागाचा सन्मान करणे आणि देशभक्ती, एकता व राष्ट्रीय अभिमानाची मूल्ये दृढ करणे असा आहे.
ही मैफल सर्व वयोगटातील प्रेक्षकांसाठी एक प्रेरणादायी सांस्कृतिक अनुभव देईल, तसेच नागरिकांना संगीताच्या वैश्विक भाषेच्या माध्यमातून स्वातंत्र्य दिन साजरा करण्याची संधी उपलब्ध करून देईल. नागपुरातील नागरिकांनी या कार्यक्रमाला आवर्जून उपस्थित राहावे आणि स्वातंत्र्याच्या भावनेला वंदन करणाऱ्या या विशेष सांगीतिक आदरांजलीचा भाग व्हावे, असे आवाहन करण्यात येत आहे.

***

शैलेश पाटील/रेश्मा बेडेकर/परशुराम कोर

*** 

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai


(Release ID: 2299472) अभ्यागत कक्ष : 40
Read this releasein: English