वाणिज्य आणि उदयोग मंत्रालय
azadi ka amrit mahotsav

एप्रिल-जुलै 2026-27 या कालावधीतील एकूण निर्यात 316.42 अब्ज अमेरिकन डॉलर्स असल्याचा अंदाज असून एप्रिल-जुलै 2025-26 मधील 279.63 अब्ज अमेरिकन डॉलर्सच्या तुलनेत 13.16% इतकी अंदाजित वाढ दर्शवते


एप्रिल-जुलै 2026-27 दरम्यान व्यापारी मालाच्या निर्यातीचे एकूण मूल्य 173.78 अब्ज अमेरिकन डॉलर्स होते, जे एप्रिल-जुलै 2025-26 मधील 148.48 अब्ज अमेरिकन डॉलर्सच्या तुलनेत 17.04% ची सकारात्मक वाढ दर्शवते

एप्रिल-जुलै 2026-27 दरम्यान बिगर-पेट्रोलियम निर्यातीचे एकूण मूल्य 143.61 अब्ज अमेरिकन डॉलर्स होते; एप्रिल-जुलै 2025-26 मधील 127.32 अब्ज अमेरिकन डॉलर्सच्या तुलनेत यात 12.79% ची वाढ नोंदवली गेली

जुलै 2026 मध्ये व्यापारी मालाच्या निर्यातीतील वाढीस कारणीभूत ठरलेल्या प्रमुख घटकांमध्ये पेट्रोलियम उत्पादने, इलेक्ट्रॉनिक वस्तू, अभियांत्रिकी वस्तू, सेंद्रिय आणि असेंद्रिय रसायने, तसेच सुती धागा/कापड/तयार कपडे आणि हातमाग उत्पादने इत्यादींचा समावेश

प्रविष्टि तिथि: 13 AUG 2026 3:38PM by PIB Mumbai

नवी दिल्ली, 13 ऑगस्ट 2026

जुलै 2026* मध्ये भारताची एकूण निर्यात (वाणिज्य माल आणि सेवा मिळून) 80.14 अब्ज अमेरिकन डॉलर्स इतकी अंदाजित आहे, जी जुलै 2025 च्या तुलनेत 13.31 टक्क्यांची सकारात्मक वाढ दर्शवते. जुलै  2026* मधील एकूण आयात (वाणिज्य माल आणि सेवा मिळून)95.16  अब्ज अमेरिकन डॉलर्स इतकी अंदाजित आहे, जी जुलै 2025 च्या तुलनेत 15.83 टक्क्यांची सकारात्मक वाढ दर्शवते.

तक्ता 1: जुलै  2026 मधील व्यापार

 

July 2026

(US$ Billion)

July 2025

(US$ Billion)

Merchandise

Exports

44.24

36.98

Imports

76.22

64.86

Services*

Exports

35.89

33.74

Imports

18.94

17.30

Total Trade

(Merchandise +Services) *

Exports

80.14

70.72

Imports

95.16

82.16

Trade Balance

-15.03

-11.43

*टीप: सेवा क्षेत्रासाठी आरबीआयने जारी केलेली नवीनतम आकडेवारी जून 2026 ची आहे. जुलै 2026 ची आकडेवारी एक अंदाज आहे. (ii) आर्थिक वर्ष 2025-26 च्या एप्रिल ते जुलैची आकडेवारी पेमेंट्स डेटाच्या त्रैमासिक शिलकीचा वापर करून यथानुपात  तत्त्वावर सुधारित करण्यात आली आहे.

एप्रिल ते जुलै  2026-27 दरम्यान भारताची एकूण निर्यात  316.42अब्ज डॉलर्स होण्याचा अंदाज असून त्यात 13.16  टक्के सकारात्मक वाढ नोंदवली गेली आहे.  एप्रिल ते जुलै   2026-27 दरम्यान  एकूण आयात 365.85 अब्ज डॉलर्स होण्याचा अंदाज असून त्यात 17.28 टक्के वाढ नोंदवली गेली आहे.

तक्ता = 2: एप्रिल ते जुलै  2026-27 दरम्यान व्यापार

 

April-July 2026-27

(US$ Billion)

April-July 2025-26

(US$ Billion)

Merchandise

Exports

173.78

148.48

Imports

292.38

245.14

Services*

Exports

142.64

131.15

Imports

73.47

66.81

Total Trade

(Merchandise +Services) *

Exports

316.42

279.63

Imports

365.85

311.94

Trade Balance

-49.43

-32.32

 

वस्तू व्यापार

जुलै 2026 मध्ये व्यापारी वस्तूंची निर्यात 44.24 अब्ज डॉलर्स होती, जी जुलै  2025 मधील  36.98 अब्ज  डॉलर्सच्या तुलनेत अधिक आहे.

जुलै 2026 मध्ये वस्तूंची आयात 76.22अब्ज  डॉलर्स होती, जी जुलै 2025 मधील 64.86 अब्ज  डॉलर्सच्या तुलनेत अधिक आहे.

एप्रिल-जून 2026-27 दरम्यान वस्तूंची निर्यात 173.78  अब्ज डॉलर्स होती, जी आर्थिक वर्ष 2025-26 मधील एप्रिल-जून दरम्यानच्या  148.48 अब्ज  डॉलर्सच्या तुलनेत अधिक आहे.

एप्रिल-जून 2026-27 दरम्यान वस्तूंची आयात  292.38 अब्ज डॉलर्स होती, जी एप्रिल-जून 2025-26 मधील  245.14 अब्ज  डॉलर्सच्या तुलनेत अधिक आहे.

एप्रिल-जून 2026-27 मधील  वस्तू व्यापार तूट 118.60  अब्ज डॉलर्स होती, जी  एप्रिल-जून 2025-26 दरम्यानच्या 96.66 अब्ज  डॉलर्सच्या तुलनेत अधिक आहे.

• जुलै  2026 मध्ये बिगर -पेट्रोलियम आणि बिगर-रत्ने व दागिने निर्यात 35.00 अब्ज अमेरिकन डॉलर्स इतकी होती, जी जुलै 2025 मध्ये 30.47 अब्ज अमेरिकन डॉलर्स इतकी होती.
• जुलै 2026  मध्ये बिगर -पेट्रोलियम आणि बिगर-रत्ने व दागिने आयात  51.82 अब्ज अमेरिकन डॉलर्स इतकी होती, जी जुलै 2025 मध्ये 43.07अब्ज अमेरिकन डॉलर्स इतकी होती.

Table 3: Trade excluding Petroleum and Gems & Jewellery during July 2026

 

July 2026

(US$ Billion)

July 2025 (US$ Billion)

Non- petroleum exports

37.32

32.86

Non- petroleum imports

57.91

49.30

Non-petroleum & Non-Gems & Jewellery exports

35.00

30.47

Non-petroleum & Non-Gems & Jewellery imports

51.82

43.07

सेवा व्यापार

जुलै 2026 मधील सेवा निर्यातीचे अंदाजित मूल्य 35.89 अब्ज डॉलर्स आहे, जे जुलै 2025 मधील 33.74 अब्ज डॉलर्सच्या तुलनेत अधिक आहे.

जुलै 2026 मधील सेवा आयातीचे अंदाजित मूल्य 18.94 अब्ज डॉलर्स आहे, जे जुलै 2025 मधील 17.30 अब्ज  डॉलर्सच्या तुलनेत अधिक आहे.

एप्रिल-जुलै 2026-27 दरम्यान सेवा निर्यातीचे अंदाजित मूल्य 142.64 अब्ज डॉलर्स आहे,  एप्रिल-जुलै  2025-26 दरम्यानच्या 131.15 अब्ज  डॉलर्सच्या तुलनेत अधिक आहे.

 एप्रिल-जुलै  2026-27 दरम्यान सेवा आयातीचे अंदाजित मूल्य 73.47 अब्ज डॉलर्स आहे,  एप्रिल-जुलै  2025-26 दरम्यानच्या 66.81 अब्ज  डॉलर्सच्या तुलनेत अधिक आहे.

एप्रिल-जुलै  2026-27 दरम्यान सेवा व्यापार अधिशेष 69.17 अब्ज  डॉलर्स अंदाजित आहे, जो  एप्रिल-जुलै  2025-26 मधील 64.35 अब्ज  डॉलर्सच्या तुलनेत अधिक आहे.

सेवा निर्यातीत एप्रिल-जुलै 2025-26 च्या तुलनेत एप्रिल-जुलै  2026-27* या कालावधीत 6.38 टक्क्यांची वाढ होण्याचा अंदाज आहे.

जुलै 2026 मध्ये व्यापारी मालाच्या  निर्यातीतील वाढीस कारणीभूत ठरलेल्या प्रमुख घटकांमध्ये पेट्रोलियम उत्पादने, इलेक्ट्रॉनिक वस्तू, अभियांत्रिकी वस्तू, सेंद्रिय आणि असेंद्रिय रसायने, तसेच सुती धागा/कापड/तयार कपडे आणि हातमाग उत्पादने इत्यादींचा समावेश आहे. 

 

सोनाली काकडे/सुषमा काणे/प्रिती मालंडकर

 

 


(रिलीज़ आईडी: 2299049) आगंतुक पटल : 14
इस विज्ञप्ति को इन भाषाओं में पढ़ें: English , Urdu , हिन्दी