रेल्वे मंत्रालय
azadi ka amrit mahotsav

मराठवाडा आणि लगतच्या प्रदेशातील संपर्क व्यवस्था बळकट करण्यासाठी रेल्वेचे पायाभूत सुविधा प्रकल्प

Posted On: 12 AUG 2026 6:39PM by PIB Mumbai

मुंबई, 12 ऑगस्‍ट 2026

 

मराठवाडा आणि राज्यातील लगतच्या प्रदेशात संपर्क व्यवस्था सुधारण्याच्या उद्देशाने भारतीय रेल्वेने अनेक पायाभूत सुविधा प्रकल्पांवर अंमलबजावणी सुरुवात केली आहे. त्याचबरोबर काही प्रकल्पांचे नियोजनही सुरू आहे.

पंढरपूर, कुर्डुवाडी, छत्रपती संभाजीनगर आणि शेगाव ही महत्वाची गावे  दौंड, अहिल्यानगर, मनमाड आणि जळगावमार्गे जाणाऱ्या प्रमुख लोहमार्गांद्वारे भारतीय रेल्वेच्या जाळ्याने आधीच जोडलेली आहेत. या प्रदेशातील अनेक महत्त्वाची ठिकाणे विद्यमान रेल्वे स्थानकांच्या जवळच्या परिसरात आहेत. परंडा हे कुर्डुवाडी रेल्वे स्थानकापासून सुमारे 21 किमी अंतरावर आहे; तर भूम हे बार्शी टाऊन रेल्वे स्थानकापासून सुमारे 37 किमी अंतरावर आहे. त्याचप्रमाणे, मांजरसुंबा आणि गेवराई ही अनुक्रमे बीड रेल्वे स्थानकापासून सुमारे 20 किमी आणि 31 किमी अंतरावर आहेत. बीड रेल्वे स्थानक हे आसपासच्या भागांसाठी महत्त्वाचे केंद्र म्हणून कार्यरत आहे.

संपर्क व्यवस्था अधिक बळकट करण्यासाठी, रेल्वेच्या पुढील कामांना मंजुरी देण्यात आली आहे किंवा ती पूर्ण करण्यात आली आहेत -

मोठे रेल्वे प्रकल्प

1. दौंड–मनमाड दुहेरीकरण (236 किमी)

प्रकल्पाची किंमत - 3,426 कोटी रु.

या दुहेरीकरणाच्या प्रकल्पाचे नुकतेच लोकार्पण झाले असून या मार्गावरील रेल्वे वाहतुकीची क्षमता आणि संपर्क व्यवस्था लक्षणीयरीत्या बळकट झाली आहे.

2. अहिल्यानगर–बीड–परळी वैजनाथ नवीन लोहमार्ग (261 किमी)

प्रकल्पाची किंमत - 5,800 कोटी रु.

अहिल्यानगर–बीड–बडवाणी या 201 किमी लांबीच्या मार्गाचे लोकार्पण झाले आहे. उर्वरित मार्गाच्या कामातही लक्षणीय प्रगती झाली आहे. आवश्यक असलेल्या 371 हेक्टर जमिनीपैकी 366 हेक्टर जमिनीचे संपादन झाले आहे. तसेच, 20 पैकी 19 महत्त्वाचे पूल पूर्ण झाले असून, 23 पैकी 11 रोड ओव्हर ब्रिजचे काम पूर्ण झाले आहे.

नवीन लोहमार्गांसाठी अंतिम स्थान निश्चिती सर्वेक्षणांना मंजुरी

प्रदेशातील रेल्वे संपर्क व्यवस्था आणखी सुधारण्यासाठी, पुढील प्रकल्पांसाठी अंतिम स्थान निश्चिती सर्वेक्षणांना मंजुरी देण्यात आली आहे –

1. जालना–खामगाव नवीन लोहमार्ग (162 किमी)

अंतिम स्थान निश्चिती सर्वेक्षण पूर्ण झाले असून, सविस्तर प्रकल्प अहवाल तयार झाला आहे.

2. पुणे–अहिल्यानगर नवीन लोहमार्ग (134 किमी)

अंतिम स्थान निश्चिती सर्वेक्षण पूर्ण झाले असून, सविस्तर प्रकल्प अहवाल तयार झाला आहे.

3. धाराशिव-बीड-छत्रपती संभाजी नगर नवीन मार्ग (240 किलोमीटर)

सविस्तर प्रकल्प अहवाल तयार करण्यासाठी अंतिम स्थान सर्वेक्षणाला  मंजुरी देण्यात आली आहे. प्रस्तावित मार्ग गेवराई मधून जातो.

4. छत्रपती संभाजीनगर -अहिल्यानगर नवीन मार्ग (110 किलोमीटर)

सविस्तर प्रकल्प अहवाल तयार करण्यासाठी अंतिम स्थान सर्वेक्षणाला  मंजुरी देण्यात आली आहे.

या प्रस्तावित प्रकल्पामुळे अनेक महत्वाची शहरे आणि प्रदेशांना सुधारित रेल्वे संपर्क उपलब्धता प्राप्त होईल, प्रवासी आणि मालवाहतुकीला चालना मिळेल तसेच मराठवाडा आणि आसपासच्या  भागातील वाहतूक संलग्नता अधिक बळकट होईल अशी अपेक्षा आहे.

इथे एक बाब नमूद करण्याजोगी आहे की, सविस्तर प्रकल्प अहवाल तयार करण्यात आल्यानंतर राज्य सरकार तसेच प्रकल्पाशी संबंधित विविध संबंधितांशी चर्चा करण्यात येते. त्यानंतर, प्रकल्पाला मंजुरी मिळण्यासाठी नीती आयोग आणि अर्थ मंत्रालयाकडून मान्यता आणि मूल्यमापन होणे गरजेचे असते.

रेल्वे प्रकल्पांना मंजुरी देणे ही निरंतर आणि गतिशील प्रक्रिया असल्यामुळे, प्रत्येक प्रकल्पाची कालमर्यादा ही मूल्यमापन प्रक्रिया आणि संबंधित घटकांकडून मिळणाऱ्या आवश्यक मंजुरींवर अवलंबून असते.

केंद्रीय रेल्वे, माहिती आणि प्रसारण, आणि इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान  मंत्री अश्विनी वैष्णव यांनी आज लोकसभेत एका लेखी उत्तरात ही माहिती दिली.

 

* * *

पीआयबी मुंबई | सुवर्णा बेडेकर/रेश्‍मा बेडेकर/सविता म्‍हस्‍कर/दर्शना राणे

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai


(Release ID: 2298520) अभ्यागत कक्ष : 122
Read this releasein: English