संरक्षण मंत्रालय
azadi ka amrit mahotsav

एअर ऑफिसर कमांडिंग-इन-चीफ, मेंटेनेंस कमांड यांनी घेतली महाराष्ट्राच्या माननीय राज्यपालांची भेट

प्रविष्टि तिथि: 12 AUG 2026 4:45PM by PIB Mumbai

नागपूर, 12 ऑगस्‍ट 2026

 

भारतीय वायुसेनेच्या 'मेंटेनन्स कमांड'चे एअर ऑफिसर कमांडिंग-इन-चीफ एअर मार्शल यल्ला उमेश, VSM, PhD यांनी 11 ऑगस्ट 2026 रोजी महाराष्ट्राचे माननीय राज्यपाल जिष्णू देव वर्मा यांची राजभवनात  भेट घेतली.

या भेटीदरम्यान, एअर मार्शल उमेश यांनी माननीय राज्यपालांना, भारतीय वायु दलाच्या ‘मेंटेनन्स कमांड’ अर्थात देखभाल विभागाच्या भूमिकेचे महत्व विषद केले. ही कमांड, देखभाल, दुरुस्ती, पुरवठा साखळी सहाय्य, आणि स्वदेशीकरण उपक्रमांच्या माध्यमातून भारतीय वायु दलाची परिचालन क्षमता टिकवून ठेवण्याचे काम करते. त्यासोबतच, संरक्षण क्षेत्रातील भारताची आत्मनिर्भरता आणि भारतीय वायुदलाची निरंतर कार्यान्वयीन क्षमता सुनिश्चित करण्यात या कमांडने दिलेल्या महत्वाचे योगदान त्यांनी अधोरेखित केले.

‘आत्मनिर्भर भारत’ या संकल्पनेला पाठबळ देण्यासाठी भारतीय वायु दल करत असलेल्या प्रयत्नांबाबतची चर्चा करण्याची संधी या बैठकीच्या निमित्ताने प्राप्त झाली. तसेच, या भेटीदरम्यान,  नागरी-लष्करी सहकार्य आणि राष्ट्रनिर्माणातील भारतीय वायु दलाचे योगदान यांसारख्या परस्पर हिताच्या मुद्द्यांवरही चर्चा करण्यात आली. एअर ऑफिसर कमांडिंग-इन-चीफ, मेंटेनेंस कमांड (AOC-in-C, MC) यल्ला उमेश यांनी, 4 ऑक्टोबर रोजी मुंबईत आयोजित करण्यात येणाऱ्या 'सेखों इंडियन एअर फोर्स मॅरेथॉन'च्या नियोजनाबाबत राज्यपालांना माहिती दिली.

माननीय राज्यपालांनी भारतीय हवाई दलाची लढाऊ सज्जता सुनिश्चित करण्यासाठी मेंटेनेंस कमांडमधील कर्मचाऱ्यांची, आदर्श व्यावसायिकता, समर्पण आणि अमूल्य योगदान या गुणांची प्रशंसा केली. तसेच सर्व वायुसैनिक, असैनिकी कर्मचारी आणि त्यांच्या कुटुंबियांना शुभेच्छा दिल्या.

या सदिच्छा  भेटीमुळे भारतीय वायु  दल आणि महाराष्ट्र राज्य यांच्यातील दृढ संबंधांना बळकटी मिळाली आणि राष्ट्रीय सुरक्षा आणि सार्वजनिक सेवेप्रति असलेली सामायिक वचनबद्धता अधोरेखित झाली.

 

* * *

पीआयबी मुंबई | नेहा कुलकर्णी/सविता म्‍हस्‍कर/दर्शना राणे

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai


(रिलीज़ आईडी: 2298348) आगंतुक पटल : 16
इस विज्ञप्ति को इन भाषाओं में पढ़ें: English