माहिती आणि प्रसारण मंत्रालय
एनएफडीसी-नॅशनल फिल्म आर्काइव्ह ऑफ इंडिया, एफआयपीआरईसी-इंडिया आणि पुणे इंटरनॅशनल सेंटरतर्फे ‘सिनेमाज ऑफ इंडिया’ चित्रपट महोत्सवाची घोषणा
पुण्यात आयोजित तीन दिवसीय महोत्सवात प्रेमेंद्र मजुमदार यांनी निवडलेल्या 10 गाजलेल्या समकालीन भारतीय चित्रपटांचे प्रदर्शन
प्रविष्टि तिथि:
11 AUG 2026 5:40PM by PIB Mumbai
मुंबई/पुणे : 11 ऑगस्ट 2026
राष्ट्रीय चित्रपट विकास महामंडळ-भारतीय राष्ट्रीय चित्रपट संग्रहालय (एनएफडीसी-एनएफएआय), एफआयपीआरईएससीआय-इंडिया आणि पुणे इंटरनॅशनल सेंटर (पीआयसी), यांनी एकत्र येऊन 21 ते 23 ऑगस्ट 2026 या कालावधीत एनएफडीसी-एनएफएआय सभागृह, फेज I, लॉ कॉलेज रोड, पुणे येथे 'सिनेमाज ऑफ इंडिया' (Cinemas of India) हा समकालीन भारतीय चित्रपटसृष्टीची विविधता साजरा करणारा तीन दिवसीय चित्रपट महोत्सव आयोजित केला आहे. हा या उपक्रमाचा दुसरा भाग आहे.
प्रख्यात चित्रपट समीक्षक आणि लेखक प्रेमेंद्र मजुमदार यांचे संयोजन असलेल्या या महोत्सवात विविध भारतीय भाषांमधील 10 चित्रपट प्रदर्शित केले जातील. या महोत्सवात समकालीन भारतीय चित्रपटसृष्टीतील भाषिक, सांस्कृतिक आणि सौंदर्यात्मक विविधता दर्शवणारे 10 चित्रपट दाखवले जातील. रंजन घोष दिग्दर्शित 'अदम्य', फासिल मोहम्मद दिग्दर्शित 'फेमिनिस्ट फातिमा', संतोष डावखर दिग्दर्शित ‘गोंधळ’, संजू सुरेंद्रन दिग्दर्शित ‘इफ ऑन अ विंटर्स नाईट’, अभिलाष शर्मा दिग्दर्शित ‘इन द नेम ऑफ फायर’, शुभम संजय शेवडे दिग्दर्शित 'मॅगझिन', खंजन किशोर नाथ दिग्दर्शित ‘द लॉस्ट पाथ’, शिवरंजिनी दिग्दर्शित 'व्हिक्टोरिया’, जिगर नागदा दिग्दर्शित ‘व्हिस्पर्स ऑफ द माउंटन्स’, आणि जयंता माधब दत्ता दिग्दर्शित 'याकासीज डॉटर’, या चित्रपटांचा यात समावेश आहे.
बंगाली, मल्याळम, मराठी आणि हिंदी, याबरोबरच मगधी, कार्बी, राजस्थानी आणि मिसिंग यासारख्या कमी ऐकल्या जाणाऱ्या आणि कमी प्रतिनिधित्व असलेल्या भारतीय भाषांवर लक्ष केंद्रित करणे, हे महोत्सवाचे प्रमुख वैशिष्ट्य आहे. हे चित्रपट प्रेक्षकांना देशाच्या विविध भागांमधील वैविध्यपूर्ण सांस्कृतिक परिदृश्य, प्रत्यक्ष अनुभव आणि कथाकथनाच्या परंपरांशी जोडले जाण्याची संधी देतील.
या महोत्सवाविषयी बोलताना, एनएफडीसीचे व्यवस्थापकीय संचालक प्रकाश मगदूम म्हणाले की, भारतीय सिनेमॅटिक परिदृश्य देशातील विविधतेचे प्रतिबिंब आहे आणि हा महोत्सव प्रेक्षकांना मुख्य प्रवाहातील चित्रपटांच्या पलीकडे जाऊन उल्लेखनीय चित्रपट आणि दृष्टीकोन जाणून घ्यायला सहाय्य करेल.
पुणे इंटरनॅशनल सेंटरचे संचालक दीनानाथ खोलकर यांनी सांगितले की, चित्रपट हे कल्पना, संवाद आणि सांस्कृतिक समज याचे एक प्रभावी माध्यम आहे, आणि हा महोत्सव प्रेक्षकांना आत्मचिंतन करायला, आणि विविध संस्कृती आणि पिढ्यांशी नाते जोडण्यासाठी प्रोत्साहन देईल.
भारतीय सिनेमाच्या भाषिक वैविध्याचा व्यापक आलेख सादर करण्यासाठी ही निवड अत्यंत काळजीपूर्वक करण्यात आली आहे, असे एफआयपीआरईएससीआय-इंडियाचे अध्यक्ष प्रेमेंद्र मजुमदार यांनी सांगितले.
चित्रपटाचा रसास्वाद, चिकित्सक चर्चा आणि सांस्कृतिक देवाणघेवाण याला प्रोत्साहन देणे हे या महोत्सवाचे उद्दिष्ट आहे. महोत्सवातील प्रवेश विनामूल्य असेल, तसेच प्रथम येणाऱ्याला प्रथम प्राधान्य या तत्त्वावर असेल. चित्रपट रसिक, विद्यार्थी, संशोधक, चित्रपट निर्माते आणि चित्रपट प्रेमींनी या महोत्सवात सहभागी व्हावे, असे आवाहन करण्यात आले आहे.
चित्रपट महोत्सवाचे वेळापत्रक खाली दिले आहे :

पीआयबी मुंबई |निलीमा चितळे/राजश्री आगाशे/प्रिती मालंडकर
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
(रिलीज़ आईडी: 2297786)
आगंतुक पटल : 47
इस विज्ञप्ति को इन भाषाओं में पढ़ें:
English