पंतप्रधान कार्यालय
azadi ka amrit mahotsav

पंतप्रधानांनी मानवी जीवनाला उजाळा देणाऱ्या आणि चारित्र्य घडवणाऱ्या आठ आवश्यक गुणांवर प्रकाश टाकणारे संस्कृत सुभाषित शेअर केले

प्रविष्टि तिथि: 11 AUG 2026 2:35PM by PIB Mumbai

नवी दिल्ली, 11 ऑगस्ट 2026

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज एक संस्कृत सुभाषित शेअर केले आहे. यामध्ये व्यक्तीचे आयुष्य उजळवणारे आणि चारित्र्य घडवणारे आठ आवश्यक गुण अधोरेखित केले आहेत.

पंतप्रधानांनी X वर लिहिले आहे :

"अष्टौ गुणाः पुरुषं दीपयन्ति प्रज्ञा सुशीलत्वदमौ श्रुतं च।
पराक्रमश्च बहुभाषिता च दानं यथाशक्ति कृतज्ञता च।।"

हे आठ गुण माणसाचे जीवन उजळवतात. शहाणपण त्याला योग्य मार्ग दाखवते. चांगले वर्तन त्याचे चारित्र्य स्वच्छ ठेवते आणि आणि आत्मसंयमामुळे तो शिस्त पाळतो. ज्ञान त्याला समज देते, धैर्य त्याला कठीण प्रसंगांत ठाम उभे राहायला सहाय्य करते आणि कुशल वाणी त्याला समाजात आदर मिळवून देते. आपल्या क्षमतेनुसार दान केल्याने आणि उपकारांबद्दल कृतज्ञ राहिल्याने माणसाचे जीवन परिपूर्ण बनते.
 

नेहा कुलकर्णी/राजश्री आगाशे/प्रिती मालंडकर

 

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai

 

 


(रिलीज़ आईडी: 2297562) आगंतुक पटल : 18
इस विज्ञप्ति को इन भाषाओं में पढ़ें: English , Urdu , हिन्दी , Manipuri , Bengali , Bengali-TR , Assamese , Punjabi , Gujarati , Tamil , Telugu , Kannada , Malayalam