कौशल्य विकास आणि उद्यमशीलता मंत्रालय
'नव्या' योजनेअंतर्गत प्रशिक्षित मुली
Posted On:
10 AUG 2026 7:26PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 10 ऑगस्ट 2026
व्यावसायिक प्रशिक्षणाद्वारे किशोरवयीन मुलींच्या आकांक्षा जोपासणे (नव्या) या कार्यक्रमांतर्गत 15 राज्ये/केंद्रशासित प्रदेशांमधील 1,060 मुलींना प्रशिक्षण देण्यात आले आहे. तपशील परिशिष्टात दिला आहे.
शासनाने 27 मे 2026पासून देशभरातील 100 आकांक्षी जिल्ह्यांमध्ये ‘नव्या’ कार्यक्रमाचा विस्तार करण्याचा निर्णय घेतला आहे.
'नव्या' कार्यक्रमाची अंमलबजावणी प्रधानमंत्री कौशल विकास योजना 4.0 (PMKVY 4.0) अंतर्गत करण्यात येत आहे. उद्योगाच्या गरजांशी सुसंगत कौशल्याधारित अभ्यासक्रमांसोबत प्रत्यक्ष कामावरील प्रशिक्षण देऊन प्रशिक्षित उमेदवारांना विविध क्षेत्रांमध्ये करिअरच्या संधींचा पाठपुरावा करण्यासाठी सक्षम करणे, हा या कार्यक्रमाचा मुख्य उद्देश आहे. 'नव्या' कार्यक्रमाअंतर्गत भविष्यातील नोकरीच्या भूमिकांसाठीच्या प्रशिक्षणावर विशेष भर दिला जातो त्याचबरोबर डिजिटल साक्षरता, आर्थिक साक्षरता आणि उद्योजकता अभिमुखता इत्यादी क्षेत्रांमधील प्रशिक्षण देऊन त्यांचा सर्वांगीण विकास होईल अशा पद्धतीचा अभ्यासक्रम शिकवला जातो. अशा प्रकारच्या प्रशिक्षणामुळे किशोरवयीन मुलींमध्ये रोजगारक्षमता, आर्थिक सहभाग आणि करिअरच्या दृष्टीने तयारी केली जाते.
प्रधानमंत्री कौशल विकास योजने अंतर्गत सुरु केलेल्या ‘नव्या’ या कार्यक्रमाची अंमलबजावणी आणि फलनिष्पत्ती यांच्यावर केंद्र सरकार एका प्रभावी यंत्रणेद्वारे सातत्याने देखरेख ठेवत आहे. लाभार्थी नोंदणी, उपस्थिती, प्रशिक्षण प्रगती, प्रमाणीकरण आणि इतर प्रमुख कार्यप्रदर्शन निर्देशकांचा प्रत्यक्ष पाठपुरावा करण्यासाठी स्किल इंडिया डिजिटल हब (SIDH) चा उपयोग केला जात आहे.
प्रकल्प अंमलबजावणी संस्था, राज्य कौशल्य विकास मोहीम आणि इतर संबंधितांच्या नियमित आढावा बैठका घेऊन अंमलबजावणी विषयक मुद्दे आणि प्रगतीचे मूल्यांकन केले जाते.
तसेच मंत्रालयाने राज्य कौशल्य विकास मोहिमांना प्रमाणित उमेदवारांची रोजगारक्षमता वाढवणे आणि त्यांच्या आर्थिक सहभागाला चालना देणे या उद्देशाने, उद्योगांशी समन्वय साधून तसेच नियोक्त्यांपर्यंत पोहोच निर्माण करून प्रमाणित उमेदवारांसाठी रोजगार आणि शिकाऊ उमेदवारीच्या संधी उपलब्ध करून देण्याच्या दृष्टीने आवश्यक कार्यवाही करण्याचा सल्ला दिला आहे.
परिशिष्ट
30 जून 2026 पर्यंत नव्या कार्यक्रमांतर्गत प्रशिक्षित झालेल्या मुलींची राज्य/केंद्रशासित प्रदेशनिहाय संख्या
|
Sl. No.
|
State/UT
|
Trained
|
|
1
|
Andhra Pradesh
|
41
|
|
2
|
Bihar
|
112
|
|
3
|
Chhattisgarh
|
30
|
|
4
|
Gujarat
|
95
|
|
5
|
Haryana
|
34
|
|
6
|
Himachal Pradesh
|
40
|
|
7
|
Jammu and Kashmir
|
137
|
|
8
|
Jharkhand
|
28
|
|
9
|
Karnataka
|
21
|
|
10
|
Madhya Pradesh
|
168
|
|
11
|
Maharashtra
|
92
|
|
12
|
Odisha
|
48
|
|
13
|
Punjab
|
99
|
|
14
|
Rajasthan
|
8
|
|
15
|
Uttar Pradesh
|
107
|
|
|
Total
|
1,060
|
कौशल्य विकास आणि उद्योजकता मंत्रालयाचे राज्यमंत्री (स्वतंत्र कार्यभार), जयंत चौधरी यांनी आज लोकसभेत लेखी उत्तरात ही माहिती दिली.
निलीमा चितळे/भक्ती सोनटक्के/प्रिती मालंडकर
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
(Release ID: 2297323)
अभ्यागत कक्ष : 55