केंद्रीय लोकसेवा आयोग
केंद्रीय सशस्त्र पोलीस दले (सहाय्यक कमांडंट) परीक्षा, 2025
Posted On:
07 AUG 2026 8:02PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 7 ऑगस्ट 2026
केंद्रीय लोकसेवा आयोगाने 03.08.2025 रोजी घेतलेल्या केंद्रीय सशस्त्र पोलीस दले (सहाय्यक कमांडंट) परीक्षा, 2025 मधील लेखी परीक्षेचा निकाल, तसेच 04.05.2026 ते 29.05.2026 या कालावधीत घेतलेल्या व्यक्तिमत्व चाचणीअंतर्गतच्या मुलाखतींच्या आधारे निकाल जाहीर केला आहे. या निकालाअंतर्गत सीमा सुरक्षा दल (BSF), केंद्रीय राखीव पोलीस दल (CRPF), केंद्रीय औद्योगिक सुरक्षा बल (CISF), भारत - तिबेट सीमा पोलीस (ITBP) आणि सशस्त्र सीमा दल (SSB) या केंद्रीय सशस्त्र पोलीस दलांमधील सहाय्यक कमांडंट (गट अ) पदांवर नियुक्तीसाठी शिफारस केलेल्या उमेदवारांची गुणवत्ताक्रमानुसार यादी खाली दिली आहे.
2.1 खाली नमूद केलेल्या तपशिलानुसार एकूण 350 उमेदवारांची नियुक्तीसाठी शिफारस करण्यात आली आहे :-
|
सर्वसाधारण
|
आर्थिक मागासवर्ग (EWS)
|
इतर मागासवर्ग (OBC)
|
अनुसूचित जाती (SC)
|
अनुसूचित जमाती (ST)
|
एकूण
|
|
103
(05 माजी सैनिकांसह)
|
44
|
109
(08 माजी सैनिकांसह)
|
62
(02 माजी सैनिकांसह)
|
32
|
350
(15 माजी सैनिकांसह
|
2.2 शिफारस केलेल्या उमेदवारांची अंतिम निवड/नियुक्ती ही देशभरातील विविध उच्च न्यायालयांमध्ये या परीक्षेशी संबंधित प्रलंबित असलेल्या जनहीत याचिकांच्या निकालाच्या अधीन असेल.
2.3 01 उमेदवाराचा निकाल राखून ठेवण्यात आला आहे.
3. विविध सेवांमधील नियुक्त्या या शासनाकडून उपलब्ध असलेल्या रिक्त पदांच्या संख्येनुसार, तसेच उमेदवारांनी परीक्षेच्या नियमांमध्ये पात्रतेसंबंधी नमूद केलेल्या सर्व विहित अटी/तरतुदींची पूर्तता करण्याच्या, तसेच जिथे लागू असेल तिथे समाधानकारकपणे पडताळणी पूर्ण होण्याच्या अधीन राहून केल्या जाणार आहेत. या शिफारस केलेल्या उमेदवारांना विविध सेवांचे वाटप हे त्यांनी मिळवलेली गुणवत्ता आणि त्यांनी दिलेल्या सेवांच्या पसंतीक्रमानुसार केले जाणार आहे.
4. शासनाकडून ज्या पदांसाठी रिक्त भरवण्याबाबत कळवले आहे, त्याबद्दलचे तपशील खाली नमूद केले आहेत :
|
सेवेचे नाव
|
एकूण रिक्त पदे
|
|
सर्वसाधारण
|
आर्थिक मागासवर्ग (EWS)
|
इतर मागासवर्ग (OBC)
|
अनुसूचित जाती (SC)
|
अनुसूचित जमाती (ST)
|
एकूण
|
|
सी.आर.पी.एफ. (C.R.P.F.)
|
84
|
20
|
55
|
30
|
15
|
204
|
|
बी.एस.एफ. (B.S.F.)
|
10
|
02
|
06
|
04
|
02
|
24
|
|
आय.टी.बी.पी. (I.T.B.P.)
|
41
|
08
|
18
|
09
|
03
|
79
|
|
एस.एस.बी. (S.S.B.)
|
11
|
05
|
07
|
07
|
03
|
33
|
|
सी.आय.एस.एफ. (C.I.S.F.)
|
39
|
09
|
23
|
12
|
09
|
92
|
|
एकूण
|
185
|
44
|
109
|
62
|
32
|
432*
|
* यात माजी सैनिकांसाठी राखीव असलेल्या एकूण रिक्त पदांच्या 10% पदांचाही अंतर्भाव आहे.
5. आर्थिक मागासवर्ग/इतर मागासवर्ग/अनुसूचित जाती/अनुसूचित जमाती आणि माजी सैनिक या श्रेणींमधील आरक्षणाच्या स्थितीगतीबद्दल शिफारस केलेल्या उमेदवारांनी केलेले दावे हे संबंधित प्राधिकरणांमार्फत केल्या जाण्याऱ्या पडताळणीच्या अधीन असणार आहेत.
6. शिफारस केलेल्या उमेदवारांपैकी 126 उमेदवारांची उमेदवारी ही तात्पुरत्या (प्रोव्हिजनल) स्वरुपात ठेवण्यात आली आहे.
7. केंद्रीय सशस्त्र पोलीस दले (सहाय्यक कमांडंट) परीक्षा, 2025 च्या नियम 16 (4) आणि (5) ला अनुसरून, केंद्रीय लोकसेवा आयोगाने शिफारस केलेल्या उमेदवारांच्या यादीतील अखेरच्या उमेदवाराच्यानंतर येणाऱ्या गुणवत्ताक्रमानुसार 164 उमेदवारांची एकत्रित राखीव यादीही तयार केली आहे. या राखीव यादीचे तपशील खाली नमूद केले आहेत :
|
सर्वसाधारण
|
आर्थिक मागासवर्ग (EWS)
|
इतर मागासवर्ग (OBC)
|
अनुसूचित जाती (SC)
|
अनुसूचित जमाती (ST)
|
एकूण
|
|
82
|
34
|
43
|
03
|
02
|
164
|
8. केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या संकुलातील परीक्षागृहाच्या इमारतीजवळ एका सुविधा केंद्राची (फॅसिलिटेशन काउंटर) सोय उपलब्ध करून दिली गेली आहे. उमेदवार त्यांच्या परीक्षेशी/भरतीशी संबंधित कोणत्याही माहिती/स्पष्टीकरणासाठी, कामकाजाच्या दिवशी सकाळी 10:00 ते संध्याकाळी 17:00 या वेळेदरम्यान या केंद्राला प्रत्यक्ष भेट देऊ शकतील. यासोबतच 011-23385271/ 23381125 या दूरध्वनी क्रमांकांवरूनही ते ही मदत मिळवू शकतात. हा निकाल आयोगाच्या www.upsc.gov.in या संकेतस्थळावरही उपलब्ध करून दिला गेला आहे. मात्र उमेदवारांचे गुण निकाल जाहीर झाल्याच्या तारखेपासून 15 दिवसांच्या आत संकेतस्थळावर उपलब्ध करून दिले जाण्याची शक्यता आहे.
निकाल पाहण्यासाठी इथे क्लिक करा
* * *
अंबादास यादव/तुषार पवार/दर्शना राणे
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
(Release ID: 2296462)
अभ्यागत कक्ष : 56