ग्राहक व्यवहार, अन्न आणि सार्वजनिक पुरवठा मंत्रालय
बीआयएस नागपूरतर्फे भारतीय मानकांवर ‘मानक मंथन’आयोजित
Posted On:
05 AUG 2026 10:06PM by PIB Mumbai
नागपूर, 5 ऑगस्ट 2026
केंद्र सरकारच्या 'ग्राहक व्यवहार, अन्न आणि सार्वजनिक वितरण मंत्रालया अंतर्गत कार्यरत असलेली भारताची राष्ट्रीय मानक संस्था - 'ब्युरो ऑफ इंडियन स्टँडर्ड्स' (BIS) यांनी 30 जुलै 2026 रोजी नागपूर येथील हॉटेल हरदेव येथे 'मानक मंथन' आयोजित केले होते. हा कार्यक्रम 'IS 2052:2023 – गुरांसाठी मिश्रित चारा – तपशील (पाचवी आवृत्ती)' आणि 'मसुदा मानक FAD/18/33969 – दूध आणि दुग्धजन्य पदार्थ प्रक्रिया प्रकल्पांसाठी 'ट्रेसेबिलिटी' प्रणालीची आवश्यकता या विषयांवर आधारित होता.
'BIS मानक गीताने कार्यक्रमाची सुरुवात झाली आणि त्यानंतर BIS च्या अधिकाऱ्यांनी स्वागतपर भाषण केले. BIS पोर्टलद्वारे नुकत्याच प्रकाशित झालेल्या सुधारित भारतीय मानकांवर, तसेच व्यापक प्रसाराच्या उद्देशाने जारी केलेल्या मसुदा मानकांवर अभिप्राय सादर करण्याच्या प्रक्रियेबद्दल यावेळी उपस्थितांना माहिती देण्यात आली. तसेच, अधिकाऱ्यांनी 'मानक मंथन'चे उद्दिष्ट स्पष्ट केले आणि 'IS 2052:2023' व मसुदा मानक 'FAD/18/33969' यांची व्याप्ती व महत्त्व यांवर प्रकाश टाकला.
'IS 2052:2023 – गुरांसाठी मिश्रित खाद्य – तपशील (पाचवी आवृत्ती)' आणि 'मसुदा मानक FAD/18/33969 – दूध व दुग्धजन्य पदार्थ प्रक्रिया प्रकल्पांसाठी 'ट्रेसेबिलिटी' प्रणालीविषयक आवश्यकता' यांवरील तरतुदींबाबत सविस्तर सादरीकरणही करण्यात आले. या सत्राद्वारे सहभागी व्यक्तींना संबंधित मानके आणि त्यांचे प्रत्यक्ष उपयोजन समजून घेण्याची संधी मिळाली.
त्यानंतर झालेल्या परस्परसंवादी चर्चेत सहभागी व्यक्तींनी त्यांचे प्रत्यक्ष अनुभव आणि शैक्षणिक नैपुण्य यावर आधारित निरीक्षणे व सूचना मांडल्या. मानकीकरण प्रक्रियेतील पुढील आवश्यक कार्यवाहीसाठी बैठकीदरम्यान प्राप्त झालेल्या प्रतिक्रियांचे संकलन केले जाणार आहे.
या कार्यक्रमात सहभागी झालेल्यांना BIS च्या संकेतस्थळावरून भारतीय मानके मोफत डाउनलोड करण्याच्या सुविधेबद्दलही माहिती देण्यात आली. तसेच, BIS परवाना मिळवण्याच्या प्रक्रियेबाबत माहिती देऊन पात्र संबंधितांना BIS प्रमाणपत्रासाठी अर्ज करण्यास प्रोत्साहित करण्यात आले.
भविष्यात अशा प्रकारचे आणखी कार्यक्रम आयोजित करण्याची विनंती उपस्थितांनी BIS कडे केली. BIS नागपूर शाखा कार्यालयाचे संचालक आणि प्रमुख डॉ. मनोज कुमार रजक यांच्या मार्गदर्शनाखाली हा कार्यक्रम यशस्वीरित्या पार पडला.
पीआयबी मुंबई | माधुरी पांगे/पर्णिका हेदवकर/प्रिती मालंडकर
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
(Release ID: 2295277)
अभ्यागत कक्ष : 35