शिक्षण मंत्रालय
महात्मा गांधी आंतरराष्ट्रीय हिंदी विश्वविद्यालयातर्फे अखिल भारतीय शिक्षा समागम 2026 अंतर्गत तीन दिवसीय प्रदर्शनाचे आयोजन
Posted On:
04 AUG 2026 7:28PM by PIB Mumbai
नागपूर, 4 ऑगस्ट 2026
राष्ट्रीय शैक्षणिक धोरण (NEP) 2020 च्या अंमलबजावणीला सहा वर्षे पूर्ण झाल्यानिमित्त आयोजित 'अखिल भारतीय शिक्षा समागम 2026' चा एक भाग म्हणून, महात्मा गांधी आंतरराष्ट्रीय हिंदी विश्वविद्यालय, वर्धा येथे 4 ते 6 ऑगस्ट 2026 या कालावधीत तीन दिवसीय प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले आहे.'अटल बिहारी वाजपेयी भवन' येथील 'स्वामी सहजानंद सरस्वती संग्रहालयात' हे प्रदर्शन आयोजित केले जाईल आणि त्याचे उद्घाटन कुलगुरू प्रा. कुमुद शर्मा यांच्या हस्ते होईल.
या प्रदर्शनात विद्यापीठाच्या संग्रहालयात जतन करून ठेवलेल्या, 19 व्या शतकापासून ते आजपर्यंतच्या ऐतिहासिकदृष्ट्या महत्त्वपूर्ण नियतकालिकांचा आणि हस्तलिखितांचा दुर्मिळ संग्रह मांडला जाणार आहे. भारताच्या समृद्ध बौद्धिक आणि सांस्कृतिक वारशाचे दर्शन घडवणाऱ्या मौल्यवान साहित्यिक व ऐतिहासिक कलाकृती पाहण्याची संधी अतिथींना या प्रदर्शनात मिळेल.
गोस्वामी तुलसीदास यांनी रचलेली 'हनुमान बाहुक','विजय दोहावली','विनय पत्रिका सटीक', 'षोडश रामायण' आणि 'कुंडलीय रामायण' यांसारखी दुर्मिळ हस्तलिखिते, तसेच विद्यापीठाने जतन केलेली इतर हजारो अमूल्य हस्तलिखिते ही या प्रदर्शनाची मुख्य आकर्षणे असतील.
हिंदी साहित्य आणि ऐतिहासिक हस्तलिखितांच्या समृद्ध वारशाद्वारे भारताच्या ज्ञानाची-परंपरांची ओळख करून देणे, हा या प्रदर्शनाचा उद्देश आहे. विद्यापीठाने विद्यार्थी, संशोधक, शिक्षणतज्ज्ञ आणि सामान्य नागरिकांना या प्रदर्शनाला भेट देण्याचे, तसेच साहित्यिक व सांस्कृतिक वारशाचा हा अद्वितीय ठेवा अनुभवण्याचे आवाहन केले आहे.
माधुरी पांगे/पर्णिका हेदवकर/प्रिती मालंडकर
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
(Release ID: 2294538)
अभ्यागत कक्ष : 31