ऊर्जा मंत्रालय
केंद्रीय ऊर्जा संशोधन संस्था नागपूर : ऊर्जा क्षेत्रातील संशोधन आणि इलेक्ट्रिकल उपकरण चाचणी प्रक्रियेचे बळकटीकरण
Posted On:
03 AUG 2026 8:23PM by PIB Mumbai
मुंबई, 3 ऑगस्ट 2026
महाराष्ट्र शासनासोबतच्या आपल्या दीर्घकालीन सहकार्याअंतर्गत नागपूर येथील केंद्रीय ऊर्जा संशोधन संस्थेचे (CPRI) प्रादेशिक एकक गेल्या तीन दशकांहून अधिक काळापासून कार्यरत असून औष्णिक अभियांत्रिकी क्षेत्रात संशोधन आणि सल्लामसलत सेवा प्रदान करत आहे.
याशिवाय या प्रदेशातील चाचणी उपकरणांसाठी केंद्रीय ऊर्जा संशोधन संस्थेने महाराष्ट्र शासनासोबत अलीकडेच नाशिक येथे क्षेत्रीय चाचणी प्रयोगशाळा उभारली आहे. ही प्रयोगशाळा अनेक प्रकारच्या सुविधांनी सुसज्ज असून त्यामध्ये ट्रान्सफॉर्मर आणि स्विचगिअरची शॉर्ट-सर्किट चाचणी, ऊर्जा मीटर आणि ट्रान्सफॉर्मर इन्सुलेटिंग तेलाची चाचणी इत्यादींचा समावेश आहे, यामुळे या प्रदेशातील विद्युत उपकरण चाचणी संबंधी पायाभूत सुविधा अधिक मजबूत होत आहेत.
ऊर्जा क्षेत्राच्या आधुनिकीकरणातील गुणवत्तेची हमी, चाचणी आणि तांत्रिक मूल्यांकन यांच्या महत्त्वपूर्ण भूमिकेबद्दल केंद्र सरकार सजग आहे. केंद्रीय ऊर्जा संशोधन संस्था देशभरातील ऊर्जा एककांना आणि उत्पादकांना राष्ट्रीय स्तरावर मान्यताप्राप्त चाचणी, प्रमाणीकरण, संशोधन, सल्लामसलत आणि तांत्रिक सेवा प्रदान करते.
केंद्रीय ऊर्जा संशोधन संस्थेने महाराष्ट्र शासनाच्या साहाय्याने नागपूर आणि नाशिक येथे प्रादेशिक सुविधा केंद्र उभारली असून त्याद्वारे राज्यातील ऊर्जा कंपन्या आणि उद्योगांना जागतिक दर्जाच्या चाचणी आणि तांत्रिक सेवा पुरवल्या जात आहेत. राज्य वीज वितरण कंपन्यांना त्यांच्या गरजेनुसार या सुविधांचा लाभ घेण्यास प्रोत्साहित केले जाते, यामुळे पारेषण आणि वितरण प्रणालीमध्ये वापरल्या जाणाऱ्या विद्युत उपकरणांची गुणवत्ता, सुरक्षितता, विश्वासार्हता, कार्यक्षमता आणि नियामक मानकांचे पालन सुनिश्चित करता येईल आणि त्याद्वारे एका मजबूत, सक्षम आणि लवचिक पारेषण आणि वितरण नेटवर्कच्या विकसनाला योगदान मिळेल.
केंद्रीय ऊर्जा संशोधन संस्था, देशभरात विविध ठिकाणी असलेल्या आपल्या आठ अत्याधुनिक सुसज्ज प्रयोगशाळांसह वीज कंपन्या, उत्पादक आणि ऊर्जा क्षेत्राशी संबंधितांच्या गरजेनुसार चाचणीविषयक सेवा प्रदान करत आहे. आपल्या चाचणीविषयक विद्यमान पायाभूत सेवासुविधांमध्ये सातत्याने वाढ करत या संस्थेने राज्य शासनाकडून प्राप्त झालेल्या सूचनांनुसार आपल्या प्रादेशिक चाचणी सुविधा केंद्रांचा विस्तार केला आहे, जे प्रादेशिक स्तरावरील मागणी, तांत्रिक गरज आणि तांत्रिक-आर्थिक व्यवहार्यता या घटकांवर अवलंबून आहे.
ऊर्जा मंत्रालयाचे राज्यमंत्री श्रीपाद नाईक यांनी आज राज्यसभेत लेखी उत्तरात ही माहिती दिली.
माधुरी पांगे/भक्ती सोनटक्के/प्रिती मालंडकर
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
(Release ID: 2294043)
अभ्यागत कक्ष : 54