सांस्कृतिक मंत्रालय
azadi ka amrit mahotsav

सण, रंगभूमी आणि विविध सहाय्यक योजनांच्या माध्यमातून मुंबईचा समृद्ध सांस्कृतिक वारसा जपण्यावर सरकारचा भर

Posted On: 03 AUG 2026 7:35PM by PIB Mumbai

 

मुंबई, 3 ऑगस्ट 2026 

नाट्य, संगीत, चित्रपट आणि पारंपरिक कला प्रकारांसह मुंबईच्या विविध सांस्कृतिक परंपरांचा प्रचार करण्यासाठी आणि त्यांचे जतन करण्यासाठी सरकार अनेक महत्त्वाची पावले उचलत आहे. कलाकारांना हक्काचे व्यासपीठ उपलब्ध करून देण्यासाठी आणि शहराचा समृद्ध सांस्कृतिक वारसा सर्वांसमोर आणण्यासाठी सरकार आपल्या स्वायत्त संस्था आणि सांस्कृतिक केंद्रांमार्फत विविध सांस्कृतिक कार्यक्रम आणि महोत्सवांचे आयोजन करते.

भारतातील सांस्कृतिक विविधतेचा उत्सव साजरा करण्यासाठी आरएसएम, वेव्ह्ज, छत्रपती शिवाजी महाराज राज्याभिषेक महोत्सव आणि राष्ट्रीय वसंत नाट्योत्सव यांसारख्या कार्यक्रमांचे आयोजन केले जाते. तसेच राष्ट्रीय स्तरावरील सांस्कृतिक कार्यक्रमांमध्ये मुंबईतील नाट्यनिर्मितींचे सादरीकरणही केले जाते.

नाट्य शिक्षणाचा विस्तार करण्यासाठी, स्थानिक प्रतिभेला प्रोत्साहन देण्यासाठी आणि नाट्यसृष्टी तसेच मुंबईतील चित्रपट आणि मनोरंजन उद्योग यांमधील दुवा अधिक मजबूत करण्यासाठी 'नॅशनल स्कूल ऑफ ड्रामा'ने (एनएसडी) नोव्हेंबर 2025 मध्ये आपल्या मुंबई केंद्राची स्थापना केली.

पश्चिम क्षेत्र सांस्कृतिक केंद्र' (डब्ल्यूझेडसीसी) हे राज्य सरकारे आणि इतर संस्थांच्या सहकार्याने विविध सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करते. मात्र हे केंद्र कोणतेही थेट अनुदान देत नाही. 'दक्षिण मध्य क्षेत्र सांस्कृतिक केंद्रा'ने (एससीझेडसीसी) आपल्या विविध योजनांतर्गत मुंबईतील कलाकारांना आर्थिक मदत पुरवली आहे, तसेच पद्म पुरस्कार आणि इतर सन्मानांसाठी कलाकारांच्या नावांची शिफारस केली आहे. विहित मार्गदर्शक तत्त्वांची पूर्तता करणारे पात्र नाट्यकलाकार राष्ट्रीय नाट्य विद्यालयाच्या (एनएसडी) योजनांअंतर्गत शिष्यवृत्ती आणि संशोधन अधिवृत्ती (फेलोशिप) साठी पात्र ठरतात.

म्युझियम ग्रँट योजनेअंतर्गत गेल्या 3 वर्षांत मुंबईतील 'फंड्स अँड प्रॉपर्टीज ऑफ द पारसी पंचायत बॉम्बे, फ्रामजी दादाभॉय अल्पाईवाला म्युझियम'ला खालीलप्रमाणे आर्थिक मदत देण्यात आली आहे:

आर्थिक वर्ष

संग्रहालय / संस्था

वितरित केलेली रक्कम

2023-24

फंड्स अँड प्रॉपर्टीज ऑफ द पारसी पंचायत बॉम्बे, फ्रामजी दादाभॉय अल्पाईवाला म्युझियम, मुंबई

₹64.48 लाख

2024-25

फंड्स अँड प्रॉपर्टीज ऑफ द पारसी पंचायत बॉम्बे, फ्रामजी दादाभॉय अल्पाईवाला म्युझियम, मुंबई

₹100.00 लाख

सरकार विविध सांस्कृतिक उपक्रमांद्वारे मराठी, कोकणी, कोळी आणि इतर पारंपरिक कलाप्रकारांना प्रोत्साहन देते. एससीझेडसीसी हे कोळी नृत्य आणि मराठी संगीत नाटकांचे सादरीकरण करते, तर डब्ल्यूझेडसीसी हे लावणी, गोंधळ, पोवाडा, भारुड, वाघ्या-मुरळी आणि महाराष्ट्रातील लोकनाट्य यांसारख्या पारंपरिक कलाप्रकारांसाठी व्यासपीठ उपलब्ध करून देते.

साहित्य अकादमी' साहित्यिक पुरस्कार, विविध उपक्रम आणि भाषा विकास कार्यक्रमांच्या माध्यमातून, मराठी आणि कोकणी भाषांच्या संवर्धन आणि प्रसारासाठी कार्य करते. एनएसडी आपल्या शैक्षणिक अभ्यासक्रम, नाट्यसंस्था (रेपर्टरी) निर्मिती, 'भारत रंग महोत्सव', कार्यशाळा आणि जनसंपर्क उपक्रमांच्या माध्यमातून भारतातील प्रादेशिक, लोक आणि पारंपरिक नाट्यप्रकारांच्या संवर्धन आणि प्रसाराला चालना देते.

सांस्कृतिक पायाभूत सुविधांच्या विकासासाठी हे मंत्रालय 'स्टुडिओ थिएटरसह इमारत अनुदानासाठी आर्थिक सहाय्य योजना' (फायनान्शियल असिस्टन्स फॉर बिल्डिंग अँट्स इन्क्लुडिंग स्टुडिओ थिएटर्स स्कीम) अंमलात आणते. गेल्या 3 वर्षांत मुंबईतील संस्थांना देण्यात आलेली आर्थिक मदत खालीलप्रमाणे आहे:

संस्था

वितरित केलेली आर्थिक मदत

द कंपनी थिएटरमुंबई

2024-25 मध्ये ₹10.00 लाख (पहिला हप्ता) आणि 2025-26 मध्ये ₹14.065 लाख (दुसरा आणि अंतिम हप्ता)

नालंदा नृत्य संशोधन केंद्रमुंबई

2024-25 मध्ये ₹15.00 लाख (दुसरा आणि अंतिम हप्ता) (2017-18 मध्ये ₹10.00 लाखांचा पहिला हप्ता वितरित केला होता)

मंत्रालय आणि त्याच्या अधिपत्याखालील संस्था दस्तऐवजीकरण, संपर्क उपक्रम आणि विविध सांस्कृतिक कार्यक्रमांच्या माध्यमातून देशभरात मुंबईच्या सांस्कृतिक वारशाचा प्रसार आणि संवर्धन करण्याचे कार्य पुढेही सुरू ठेवतील.

केंद्रीय संस्कृती आणि पर्यटन मंत्री गजेंद्र सिंह शेखावत यांनी आज लोकसभेत एका लेखी उत्तरात ही माहिती दिली.

 

 

माधुरी पांगे/आशुतोष सावे/प्रिती मालंडकर

 

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai

 

 

 


(Release ID: 2294007) अभ्यागत कक्ष : 28
Read this releasein: English