आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालय
azadi ka amrit mahotsav

मद्यार्कयुक्त पेयांमध्ये मूळ स्वादासारख्याच कृत्रिम फ्लेवर्सच्या वापराबद्दल 'एफएसएसएआय' (FSSAI) ची भूमिका

प्रविष्टि तिथि: 02 AUG 2026 6:40PM by PIB Mumbai

अनेक इलेक्ट्रॉनिक आणि मुद्रित माध्यमांमध्ये मद्यार्कयुक्त पेय उत्पादकांवर परवानगी नसलेल्या फ्लेवर्सचा वापर आणि या पेयांच्या निर्मितीपासून ते साठवणुकीदरम्यानच्या( मुरवण्याचा) कालावधीविषयी दावे केल्याप्रकरणी करण्यात आलेल्या कारवाईबाबत वृत्ते प्रसारित होत आहेत.

विद्यमान नियमांचे पुढीलप्रमाणे उल्लंघन झाल्यामुळे एफएसएसएआयने काही मद्यार्कयुक्त पेय उत्पादकांविरुद्ध अंमलबजावणीची कारवाई सुरू केली आहे:

1.मद्यार्कयुक्त उत्पादनाचे नाव:

प्रत्येक  मद्यार्कयुक्त उत्पादनाची वैशिष्ट्यपूर्ण चव आणि सुगंध यांची संवेदनात्मक ओळख ही मूळ कच्चा माल (उदा. रमसाठी काकवी, व्हिस्कीसाठी अंकुरित धान्य-माल्ट), आंबवणी, खमीराची क्रिया, ऊर्ध्वपतन, परिपक्वीकरण आणि इतर मान्यताप्राप्त उत्पादन प्रक्रियांच्या एकत्रित परिणामातून विकसित होते.

काही उत्पादक उत्पादनामध्ये बाहेरून फ्लेवर्स मिसळून त्या उत्पादनाचा मूळ गंध आणि चवीची नक्कल करतात आणि ते प्रमाणित उत्पादन म्हणून विक्री करतात, ज्यामुळे ग्राहकांची दिशाभूल होते. अशा फ्लेवर्सची आवश्यकता निर्माण होण्यामागे अशी एक गैरप्रथा आढळून आली आहे की, उत्पादक नैसर्गिकरित्या चव विकसित करण्यासाठी परिपक्वीकरण प्रक्रिया किंवा काकवी, माल्ट अथवा द्राक्षे यांसारख्या मूळ कच्च्या मालाचा वापर करण्याऐवजी प्रामुख्याने स्पिरिट किंवा न्यूट्रल(कोणत्याही नैसर्गिक उत्पादनाची चव नसलेल्या) मद्यार्काचा वापर करतात. अशा मद्यार्काला स्वतःची कोणतीही विशिष्ट चव नसल्यामुळे त्यात बाहेरून संबंधित मद्य उत्पादनाचा केवळ फ्लेवर मिसळला जातो.

अशी उत्पादने केवळ निकृष्ट दर्जाची नसून प्रमाणित उत्पादनांच्या श्रेणींची नावे वापरून त्यांचे चुकीचे सादरीकरणही केले जाते. अशा उत्पादनांची ओळख जास्तीत जास्त 'रमचा स्वाद असलेले स्पिरिट' किंवा 'व्हिस्कीचा स्वाद असलेले स्पिरिट' अशा स्वरूपातच करता येऊ शकते. तसेच, वेष्टनाच्या समोरील भागावर उत्पादनाचे खरे स्वरूप पूर्णपणे स्पष्ट केलेले नसते.

एफएसएस अन्न सुरक्षा आणि मानके (अन्नपदार्थ मानके व अन्न मिश्रके) विनियम, 2020 मधील नियम 5.1 नुसार, "प्रत्येक खाद्यपदार्थाच्या वेष्टनाच्या समोरील भागावर त्या  वेष्टनामध्ये असलेल्या खाद्यपदार्थाचे खरे स्वरूप दर्शविणारे नाव नमूद केलेले असणे आवश्यक आहे."

2.प्रयोगशाळेतील निष्कर्ष आणि नियामक आवश्यकता:

विविध उत्पादकांकडील रम आणि व्हिस्कीचे नमुने घेऊन ते तपासणीसाठी प्रयोगशाळेत पाठविण्यात आले. उत्पादनामध्ये बाहेरून कृत्रिम किंवा नैसर्गिकसदृश फ्लेवर्स आढळल्यामुळे ही उत्पादने निकृष्ट दर्जाची असल्याचे मत प्रयोगशाळांनी व्यक्त केले.

उदाहरणार्थ, एफएसएस(मद्यार्कयुक्त पेये)  विनियम , 2018 मधील नियम 2.5 नुसार, "रममध्ये त्या उत्पादनाशी संबंधित वैशिष्ट्यपूर्ण चव आणि गंध असणे आवश्यक आहे."

प्रयोगशाळेच्या अहवालात स्पष्टपणे नमूद करण्यात आले आहे की, "कृत्रिम फ्लेवर्सचा वापर केल्यामुळे उत्पादनाची नैसर्गिक चव झाकली जात असून त्यामुळे ते उत्पादन निकृष्ट दर्जाचे ठरते." तसेच, उत्पादनाच्या ओळखपत्रकावर अशा उत्पादनाचा उल्लेख " फ्लेवर्ड / प्रीमिक्स रम" असा न केल्यास ग्राहकांची दिशाभूल होण्याची किंवा त्यांची फसवणूक होण्याची शक्यता आहे.

मद्यपेयांमध्ये मूळ स्वादासारख्याच कृत्रिम फ्लेवर्सच्या वापराबद्दल 'एफएसएसएआय' (FSSAI) ची भूमिका

3. दिशाभूल करणारे दावे:

'ओल्ड मंक एक्सएक्सएक्स रम' (Old Monk XXX Rum) च्या प्रकारातील लेबलवर केलेला "7 वर्षे जुनी ब्लेंडेड" हा दावा देखील दिशाभूल करणारा असल्याचे आढळले आहे. तपासणीच्या निष्कर्षांनुसार, या रममधील मुख्य घटक हा न्यूट्रल (अपक्व/विना-मॅच्युअर्ड) स्पिरिट आहे, तर मॅच्युअर्ड (पक्व) रम स्पिरिटचा वाटा यात अत्यंत कमी (5% पेक्षा कमी) आहे. 'एफएसएस (मद्यपेये) नियमावली, 2018' नुसार, कोणत्याही ब्लेंडेड स्पिरिटच्या वयाचा दावा हा त्या मिश्रणात वापरलेल्या सर्वात कमी वयाच्या स्पिरिटच्या आधारावरच केला गेला पाहिजे. त्यामुळे हा प्रकार सध्याच्या नियमांचे उघडउघड उल्लंघन करणारा आहे.

4. मद्यपेयांमध्ये फ्लेवर (चव आणि वास) मिसळण्याबाबतची नियमावली:

लागू असलेल्या 'अन्न सुरक्षा आणि मानके नियमावली'अंतर्गत मद्यपेयांमध्ये नैसर्गिक आणि निसर्ग-समकक्ष स्वादांच्या वापरास स्पष्ट परवानगी आहे, यावर दुमत असण्याचे कारण नाही. त्यानुसार, जेथे कायद्याने अशा प्रकारच्या वापरास मुभा दिली आहे आणि त्याला योग्य तांत्रिक कारण/समर्थन लाभलेले आहे, तेथे कॉफी, व्हॅनिला किंवा यांसारखे इतर फ्लेवर्स वापरण्यास उत्पादकांवर कोणतीही बंदी नाही.

तथापि, प्रस्तुत प्रकरण हे स्वादवर्धक घटकांच्या वापरावर बंदी घालण्याशी संबंधित नाही. उलटपक्षी, काही उत्पादकांनी मानकीकृत मद्यपेयामध्ये, त्याच मद्यपेयाचा फ्लेवर वरून मिसळण्याची जी पद्धत अवलंबली आहे, उदा. रममध्ये रमचाच फ्लेवर किंवा व्हिस्कीमध्ये व्हिस्कीचाच फ्लेवर टाकणे.

सध्या विचाराधीन असलेली ही पद्धत म्हणजे कॉफीमध्ये कॉफीचाच फ्लेवर किंवा चहामध्ये चहाचाच फ्लेवर मिसळण्यासारखी आहे. अशा प्रकारे वरून स्वादाची भर घालण्यामागे कोणतेही 'योग्य तांत्रिक कार्य' साध्य होत नाही, कारण हा स्वाद किंवा वास मूळ उत्पादनाच्या रचनेतूनच नैसर्गिकरित्या निर्माण होणे अपेक्षित असते. अन्न घटकांबाबतची नियमावली या तत्त्वाला स्पष्टपणे पाठबळ देते. 'अन्न सुरक्षा आणि मानके नियमावली, 2011' च्या कलम 3.1.1 (4) आणि 3.1.1 (7) मध्ये हे स्पष्टपणे नमूद करण्यात आले आहे.

5. 'एफएसएसएआय'ने (FSSAI) केलेली कारवाई:

 i. प्रयोगशाळेतील तपासणी अहवालात मानके पूर्ण न झाल्यामुळे खालील उत्पादनांच्या विक्रीवर बंदी घालण्यात आली आहे:

 • मेसर्स मोहन रॉकी स्प्रिंगवॉटर, खोपोली युनिट

(ब्रँड: ओल्ड मंक रमचे 3 प्रकार – द लेजंड, गोल्ड रिझर्व्ह, एक्सएक्सएक्स मॅच्युअर्ड रम)

• मेसर्स युनायटेड स्पिरिट्स, बारामती

(ब्रँड: मॅकडोवेल्स नंबर 1 रम)

• मेसर्स इनब्र्यू बेव्हरेजेस, मध्य प्रदेश

(ब्रँड: बॅगपायपर डिलक्स व्हिस्की, ओल्ड कास्क डिलक्स एक्सएक्सएक्स रम)

• मेसर्स असोसिएटेड अल्कोहोल अँड ब्रुअरीज, मध्य प्रदेश

(ब्रँड: सेंट्रल प्रॉव्हिन्स व्हिस्की, मॅकडोवेल्स नंबर 1 सेलिब्रेशन मॅच्युअर्ड एक्सएक्सएक्स रम)

• मेसर्स युनायटेड स्पिरिट्स, मध्य प्रदेश(ब्रँड: अँटिक्विटी ब्लू व्हिस्की, रॉयल चॅलेंज व्हिस्की)

 ii. गोव्यात मे. मँडेक्सी डिस्टिलरीज अँड ब्रुअरीज यांच्या परिसरात तपासणी आणि नमुने संकलनाची कारवाई करण्यात आली.

 iii. या प्रकरणात महाराष्ट्रातील आणखी सहा उत्पादकांना नोटिसा बजावण्यात आल्या असून, पुढील आवश्यक ती कारवाई लवकरच करण्यात येणार आहे.

 6. काही उत्पादकांवरील विक्रीबंदीला सशर्त शिथिलता

 विक्रीबंदीविरोधात दोन उत्पादकांनी केलेल्या अपीलच्या आधारे त्यांच्यावरील विक्रीबंदीला सशर्त शिथिलता देण्यात आली आहे. त्यांच्या सध्या उपलब्ध असलेल्या साठ्याची विक्री करण्यास परवानगी देण्यात आली असून, त्यासाठी उत्पादनाच्या पॅकेजिंगच्या समोरील बाजूस त्या उत्पादनाचे वास्तविक स्वरूप स्पष्टपणे नमूद करणे बंधनकारक करण्यात आले आहे. तसेच, भविष्यातील उत्पादनात रम फ्लेवर, व्हिस्की फ्लेवर किंवा त्यासारखे कृत्रिम अथवा समान प्रकारचे स्वाद घटक वापरू नयेत, असे स्पष्ट निर्देश देण्यात आले आहेत.

7. बाजारातील स्थिती

सध्याचे प्रकरण संपूर्ण मद्य उद्योगाचे प्रतिनिधित्व करणारे नाही, हे स्पष्ट करणेही तितकेच महत्त्वाचे आहे. परिशिष्टात नमूद केल्याप्रमाणे अनेक उत्पादक निर्धारित मानकांचे पूर्णपणे पालन करून प्रमाणित मद्यपेयांचे उत्पादन करत आहेत.

मात्र, केवळ काही मोजकेच उत्पादक प्रामुख्याने न्यूट्रल अल्कोहोल किंवा एक्स्ट्रा न्यूट्रल अल्कोहोलपासून पेये तयार करतात, ज्यामध्ये प्रमाणित अल्कोहोलयुक्त पेयांशी संबंधित वैशिष्ट्यपूर्ण स्वादाचा स्वाभाविकपणे अभाव असतो, आणि त्यानंतर ती वैशिष्ट्ये पुन्हा निर्माण करण्यासाठी त्यात एकसारखे किंवा कृत्रिम स्वादवर्धक पदार्थ मिसळले जातात.

तसेच, प्रमाणित मद्यपेयांची वैशिष्ट्यपूर्ण चव आणि सुगंध निर्माण करण्यासाठी रममध्ये रम फ्लेवर किंवा व्हिस्कीमध्ये व्हिस्की फ्लेवर मिसळण्याची कोणतीही आंतरराष्ट्रीय स्तरावर मान्यताप्राप्त उत्पादन पद्धत अस्तित्वात नसल्याचेही नमूद करण्यात आले आहे.

एफएसएसएआयची मानके मद्यपेयांची रासायनिक रचना त्यांच्या मूळ कच्च्या घटकांशी सुसंगत आणि अस्सल राहावी, यासाठी निश्चित करण्यात आली आहेत. ग्राहकांची दिशाभूल होईल अशा प्रकारे कोणतेही अन्न मिश्रक किंवा स्वादद्रव्य वापरण्यास अन्न व्यवसायांना परवानगी नाही. अन्न सुरक्षा मानके आणि पद्धतींच्या संदर्भात ग्राहकांच्या हिताचे संरक्षण करणे तसेच अन्न व्यापारातील न्याय्य व्यवहार सुनिश्चित करणे, ही एफएसएसएआयची वैधानिक जबाबदारी आहे. 

• मेसर्स युनायटेड स्पिरिट्स, मध्य प्रदेश

(ब्रँड: अँटिक्विटी ब्लू व्हिस्की, रॉयल चॅलेंज व्हिस्की)

***

शैलेश पाटील/नितीन गायकवाड/वैभवी जोशी/श्रद्धा मुखेडकर/परशुराम कोर

*** 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai

(रिलीज़ आईडी: 2293531) आगंतुक पटल : 17
इस विज्ञप्ति को इन भाषाओं में पढ़ें: English