पंतप्रधान कार्यालय
azadi ka amrit mahotsav

जुडो स्पर्धेत महिलांच्या 63 किलो वजनी गटात कांस्यपदक जिंकल्याबद्दल उन्नती शर्मा हिचे पंतप्रधानांकडून अभिनंदन

Posted On: 02 AUG 2026 12:07PM by PIB Mumbai

 

राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धा 2026 मध्ये जुडो खेळात महिलांच्या 63 किलो वजनी गटात कांस्य पदक जिंकल्याबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी उन्नती शर्मा हिचे अभिनंदन केले आहे. 

संपूर्ण स्पर्धेत उन्नतीची निष्ठा आणि दृढनिश्चय स्पष्टपणे दिसून आला, असे त्यांनी म्हणले आहे. 

मोदी यांनी तिला भविष्यातील सर्व प्रयत्नांमध्ये अशाच यशासाठी शुभेच्छा दिल्या.

'X' वरील पोस्ट मध्ये पंतप्रधान लिहितात,

"जुडो मध्ये भारताच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा! राष्ट्रकुल खेळ 2026 मधील महिलांच्या 63 किलो वजन गटात कांस्य पदक जिंकल्याबद्दल उन्नती शर्मा हिचे अभिनंदन. खेळादरम्यान तिची निष्ठा आणि दृढनिश्चय स्पष्टपणे दिसत होता. ती आपल्या आगामी सर्व प्रयत्नांमध्ये अशीच उत्तुंग कामगिरी करत राहो, हीच सदिच्छा. #CWG2026"

***

यश राणे/वैभवी जोशी/परशुराम कोर

*** 

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai


(Release ID: 2293397) अभ्यागत कक्ष : 49