संरक्षण मंत्रालय
रिअर ॲडमिरल विद्याधर हरके, व्हीएसएम यांनी महाराष्ट्र नौदल क्षेत्राचा पदभार स्वीकारला
Posted On:
01 AUG 2026 8:06PM by PIB Mumbai
मुंबई, 01 ऑगस्ट 2026
रिअर ॲडमिरल विद्याधर हरके, व्हीएसएम (VSM) यांनी 31 जुलै 2026 रोजी रिअर ॲडमिरल शांतनू झा, एनएम (NM) यांच्याकडून 'महाराष्ट्र नौदल क्षेत्राच्या' प्रमुखपदाचा कार्यभार स्वीकारला.
01 जुलै 1993 रोजी भारतीय नौदलात रुजू झालेले हे फ्लॅग ऑफिसर 'नॅशनल डिफेन्स अकॅडमी' (एनडीए, खडकवासला), 'डिफेन्स सर्व्हिसेस स्टाफ कॉलेज' (वेलिंग्टन) आणि 'नेव्हल वॉर कॉलेज' (गोवा) यांचे माजी विद्यार्थी आहेत. त्यांनी नौदलात सागरी आणि किनारी अशा दोन्ही आघाड्यांवर अनेक महत्त्वपूर्ण जबाबदाऱ्या सांभाळल्या आहेत. यामध्ये 'आयएनएस जलाश्व' या लँडिंग प्लॅटफॉर्म डॉक जहाजाचे कमांडिग अधिकारीपद, तसेच भारताची पहिली स्वदेशी विमानवाहू युद्धनौका 'आयएनएस विक्रांत'चे पहिले स्थापनाकालीन कमांडिंग ऑफिसर, या पदांचा समावेश आहे.
फ्लॅग रँकवर पदोन्नती मिळाल्यानंतर, त्यांनी वेस्टर्न नेव्हल कमांड (मुंबई) येथे 'चीफ स्टाफ ऑफिसर (ऑपरेशन्स)' आणि सदर्न नेव्हल कमांड (कोची) येथे 'फ्लॅग ऑफिसर सी ट्रेनिंग' म्हणून सेवा बजावली आहे.
वेस्टर्न नेव्हल कमांडच्या अधिपत्याखाली 'फ्लॅग ऑफिसर कमांडिंग महाराष्ट्र नेव्हल एरिया' या नात्याने, हे अधिकारी इतर सशस्त्र दले, भारतीय तटरक्षक दल आणि राज्य नागरी प्रशासनाच्या समन्वयाने स्थानिक नौदल संरक्षण मोहीम, प्रशासकीय बाबी, पायाभूत सुविधांचे प्रकल्प, समुदाय सहभाग/सामाजिक उपक्रम, तसेच महाराष्ट्र राज्याची किनारपट्टी सुरक्षा आणि संरक्षणाची सर्व कामे पार पाडतील व त्यावर देखरेख ठेवतील.




***
शैलेश पाटील/वैभवी जोशी/परशुराम कोर
***
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
(Release ID: 2293156)
अभ्यागत कक्ष : 77