कार्मिक, सार्वजनिक तक्रार आणि निवृत्ती वेतन मंत्रालय
azadi ka amrit mahotsav

फरार आरोपी राहुल शामराव काळोखे याला फिजीमधून भारतात परत आणण्यात सीबीआयला यश

Posted On: 30 JUL 2026 5:00PM by PIB Mumbai

मुंबई,30 जुलै 2026

केंद्रीय अन्वेषण विभागाने  (सीबीआय), परराष्ट्र मंत्रालय , गृह मंत्रालय आणि महाराष्ट्र पोलिसांच्या समन्वयाने, रेड नोटीस जारी असलेल्या राहुल शामराव काळोखे याला 30.07.2026 रोजी फिजीमधून भारतात परत आणण्यात यश मिळवले आहे.

एका मोठ्या गुंतवणूक घोटाळा प्रकरणात काळोखेचा शोध घेतला जात होता .आरोपीने आपल्या साथीदारांच्या संगनमताने, लोकांना अवास्तव  आणि निश्चित परताव्याची खोटी आश्वासने देऊन पैसे गुंतवण्यास प्रवृत्त केले. त्यानंतर, अनेक गुंतवणूकदारांनी विविध गुंतवणूक योजनांमध्ये मोठ्या प्रमाणावर पैसे गुंतवले. त्यानंतर, आरोपीने वैयक्तिक फायद्यासाठी गुंतवणूकदारांच्या पैशांचा गैरवापर केला. गुन्हा केल्यानंतर, तपास आणि न्यायालयीन कारवाई टाळण्यासाठी आरोपी फरार झाला होता.

महाराष्ट्र पोलिसांच्या विनंतीनुसार, सीबीआयने इंटरपोलच्या माध्यमातून त्याच्या विरुद्ध रेड नोटीस जारी केली. त्यानंतर, आरोपीचा ठाव ठिकाणा  फिजीमध्ये लागला. त्यानुसार फिजीच्या अधिकाऱ्यांनी त्याला अटक केली. आवश्यक कायदेशीर प्रक्रियेनंतर आरोपीला भारतात आणण्यात आले. फरार आरोपीला भारतात परत आणण्यासाठी भारतीय अधिकाऱ्यांचे एक विशेष पथक फिजिला गेले होते. हे पथक आरोपीसह 30 जुलै 2026 रोजी भारतात परतले.

भारतासाठी इंटरपोलचे राष्ट्रीय केंद्रीय ब्युरो म्हणून सीबीआय, इंटरपोलच्या माध्यमातून मदतीसाठी भारतपोलमार्फत भारतातील सर्व कायद्याची अंमलबजावणी करणाऱ्या संस्थांशी समन्वय साधते. परराष्ट्र मंत्रालय, गृह मंत्रालय आणि विविध कायद्याची अंमलबजावणी करणाऱ्या संस्थांच्या समन्वित प्रयत्नांमुळे, अलिकडच्या वर्षांत इंटरपोलच्या माध्यमातून समन्वय साधून 170 हून अधिक फरार गुन्हेगारांना भारतात यशस्वीरित्या परत आणण्यात आले आहे.


पीआयबी मुंबई |सुषमा काणे/श्रद्धा मुखेडकर/प्रिती मालंडकर

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai

 

 


(Release ID: 2291813) अभ्यागत कक्ष : 58
Read this releasein: English