श्रम आणि रोजगार मंत्रालय
azadi ka amrit mahotsav

मडगाव ईएसआय रुग्णालय, ईएसआयसीकडे हस्तांतरित करण्याची प्रक्रिया गोवा सरकारकडून पूर्ण


ईएसआय योजनेअंतर्गत आरोग्य सेवा अधिक मजबूत करण्यासाठी‌ नवे पाऊल

प्रविष्टि तिथि: 28 JUL 2026 9:03PM by PIB Mumbai

गोवा, 28 जुलै 2026

 

मडगाव येथील ईएसआय रुग्णालय, केंद्र सरकारच्या कामगार आणि रोजगार मंत्रालयाच्या अखत्यारीत येणाऱ्या ईएसआयसी अर्थात कर्मचारी राज्य विमा महामंडळाच्या रुग्णालयाकडे सुपूर्द करण्याची प्रक्रिया आज गोवा सरकारने पणजी येथे सामंजस्य कराराच्या माध्यमातून पार पाडली. 

कर्मचारी राज्य विमा महामंडळाच्या गोवा प्रादेशिक कार्यालयाचे राज्य वैद्यकीय अधिकारी डॉ. रवींद्र नारखेडे,कर्मचारी राज्य विमा महामंडळाच्या गोवा प्रादेशिक कार्यालयाचे अभियंता नरेंद्र मीणा, गोवा सरकारच्या प्रशासकीय वैद्यकीय अधिकारी डॉ. पवित्रा देशप्रभू आणि कर्मचारी राज्य विमा महामंडळाचे तसेच गोवा सरकारचे वरिष्ठ अधिकारी यांच्या उपस्थितीत गोवा सरकारचे कामगार आणि रोजगार आयुक्त राजेश आजगावकर आणि कर्मचारी राज्य विमा महामंडळाच्या पणजी प्रादेशिक कार्यालयाचे प्रादेशिक संचालक मनीष कुमार यांच्यात सामंजस्य कराराची देवाणघेवाण झाली.

या बदलामुळे आता मडगाव  येथील इ एस आय रुग्णालय राज्य कर्मचारी विमा महामंडळाचे रुग्णालय म्हणून कार्यरत राहील. आरोग्य सेवांची व्याप्ती वाढवून त्या विमा योजनेची सुरक्षा असलेल्या व्यक्ती आणि त्यांच्यावर अवलंबून असलेल्या व्यक्ती यांच्यापर्यंत पोहोचवण्याच्या मार्गातील हे एक महत्त्वाचे पाऊल आहे.

हे रुग्णालय कर्मचारी राज्य विमा महामंडळाचे वैद्यकीय महाविद्यालय आणि रुग्णालय म्हणून अद्ययावत करण्याचे प्रस्तावित आहे. यातूनच गोवा राज्य आणि मडगाव  या भागातील विशेष आरोग्यसेवा, वैद्यकीय शिक्षण आणि आरोग्याशी संबंधित पायाभूत सुविधा अधिक मजबूत होतील.

 

* * *

(Source: ESIC, RO, Goa) | पीआयबी मुंबई | निलिमा चितळे/विजया सहजराव/दर्शना राणे

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBPanaji   Image result for facebook icon /PIBPanaji    /pib_goa   pibgoa[at]gmail[dot]com  /PIBGoa


(रिलीज़ आईडी: 2290804) आगंतुक पटल : 20
इस विज्ञप्ति को इन भाषाओं में पढ़ें: English