श्रम आणि रोजगार मंत्रालय
कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटनेच्या पुणे क्षेत्रीय कार्यालयातर्फे ‘विवाद से विश्वास’ योजनेबाबत जनजागृती तसेच सुलभीकरणासाठी विशेष मोहीम
प्रविष्टि तिथि:
23 JUL 2026 6:42PM by PIB Mumbai
पुणे, 23 जुलै 2026
केंद्रीय श्रम आणि रोजगार मंत्रालयाच्या अखत्यारीतील कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटनेच्या (ईपीएफओ) पुण्यात विमाननगर स्थित क्षेत्रीय कार्यालयाने अकार्यरत ईपीएफ खाती बंद करण्याच्या प्रक्रियेला गती देणे तसेच सदस्यांना सामाजिक सुरक्षा लाभांचे वेळेवर वितरण होईल, हे सुनिश्चित करणे या उद्देशाने लक्ष्यित संपर्क आणि सुविधा उपलब्ध करून देण्यासाठीच्या उपाययोजना हाती घेतल्या आहेत.
कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटनेने (ईपीएफओ) कामगार, कर्मचारी, निवृत्तीवेतनधारक तसेच नियोक्ते यांच्या तक्रारी सोडवण्यासाठी 27 जुलै 2026 रोजी “निधी आपके निकट 2.0 (एनएएन 2.0)” हा जिल्हास्तरीय संपर्क कार्यक्रम आयोजित केला आहे. या उपक्रमादरम्यान, जिल्हा नोडल अधिकाऱ्यांच्या नेतृत्वाखालील पथक कामगार आणि नियोक्ते यांच्या समस्या ऐकून घेईल आणि त्या सोडवण्याचा प्रयत्न करेल. या कार्यक्रमाचे तपशील पुढीलप्रमाणे आहेत:
|
एनएएन 2.0 ची तारीख आणि वेळ
|
अधिकाऱ्यांचे पथक |
कार्यक्रम स्थळ |
|
सोमवार
27/07/2026
सकाळी 09:30 ते दुपारी 04:00
|
एन.रमेश, ईओ/एओ नोडल अधिकारी
|
मेसर्स किर्लोस्कर उद्योग, गाव कोलविहीरे, जेजुरी-मोरेगाव मार्ग, जेजुरी, पुणे - 412303
|
|
विशाल प्रभाकर शेरे, ईओ/एओ
|
|
प्रीती ईओ/एओ
|
|
विनीत कुमार सिन्हा, एसएस
|
|
संदीप कुमार बर्नवाल,एसएस
|
|
रामदास मरकड एसएसएसए
|
या कार्यक्रमाद्वारे नवीन ईपीएफ योजना, विश्वास योजना, पंतप्रधान व्हीबीआरवाय योजना, नवीन ‘सीआयटीईएस’ कार्ये यांच्याशी संबंधित मुद्दे हाताळण्यात येतील. मात्र, या सोबतच, कोणताही सदस्य, निवृत्तीवेतन धारक, नियोक्ता यांना काही समस्या असल्यास त्यांनी त्यांच्या तक्रारीचे निवारण करण्यासाठी या कार्यक्रमाला उपस्थित रहावे; असे आवाहन करण्यात आले आहे. तसेच, ज्यांचे निवृत्तीवेतन अदा होणे थांबले आहे अथवा ज्यांच्या जीवन प्रमाणपत्राची मर्यादा संपत आहे अशा निवृत्तीवेतन धारकांनी देखील त्यांचे डीएलसी अद्ययावत करून घेण्यासाठी या संधीचा लाभ घ्यावा जेणेकरून त्यांना सुरळीत आणि अखंडितपणे निवृत्तीवेतन मिळत राहील, अशा सूचना करण्यात आल्या आहेत. इथे माहिती दिलेल्या शिबिरात, ईपीएफओच्या पुणे प्रादेशिक कार्यालयातील ज्येष्ठ अधिकाऱ्यांच्या नेतृत्वाखालील समर्पित पथक या सर्व समस्या समजून घेऊन त्या सोडवण्यासाठी तैनात असेल.
पुण्यात विमाननगर स्थित ईपीएफओ प्रादेशिक कार्यालयातील प्रादेशिक भविष्य निर्वाह निधी आयुक्त-I, प्रभारी अधिकारी लोकेश गुप्ता म्हणाले, “दाव्यांची विनासायास पूर्तता करण्यासाठी आम्ही ईपीएफओच्या युएएनआधारित सेवा, आधार प्रमाणीकरण आणि बँक खात्यांशी जोडणी अशा डिजिटल उपक्रमांसह लक्ष्यित संपर्क कार्यक्रमाचा वापर करत आहोत.”
* * *
पीआयबी मुंबई | सुवर्णा बेडेकर/संजना चिटणीस/दर्शना राणे
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
(रिलीज़ आईडी: 2288520)
आगंतुक पटल : 21
इस विज्ञप्ति को इन भाषाओं में पढ़ें:
English