रेल्वे मंत्रालय
azadi ka amrit mahotsav

सिंधुदुर्ग जिल्ह्यातील रेल्वे स्थानकांवर 46.68 कोटी रुपयांच्या प्रवासी सुविधांच्या कामांची अंमलबजावणी किंवा सुरुवात


वैभववाडी रोड, कणकवली, सिंधुदुर्ग, कुडाळ आणि सावंतवाडी रोड स्थानकांवर प्रमुख प्रवासी सुविधांमध्ये वाढ

सिंधुदुर्ग (ओरस) आणि वैभववाडी रोड रेल्वे स्थानकांवर तिकीट बुकिंगची सुविधा उपलब्ध

सिंधुदुर्ग आणि कणकवली इथे चार एक्स्प्रेस गाड्यांना नवीन थांबे; सावंतवाडी रोडवर अतिरिक्त तीन गाड्यांच्या थांब्यांना मंजुरी

Posted On: 22 JUL 2026 2:45PM by PIB Mumbai

मुंबई, 22 जुलै 2026

 

भारतीय रेल्वेने गेल्या पाच वर्षांत आणि चालू आर्थिक वर्षात, म्हणजे 2021-22 ते 2026-27 मध्ये 30 जून 2026 पर्यंत, सिंधुदुर्ग जिल्ह्यातल्या रेल्वे स्थानकांवर सुमारे 46.68 कोटी रुपयांची प्रवासी सुविधांची कामे पूर्ण केली आहेत किंवा नव्याने हाती घेतली आहेत.

सिंधुदुर्ग जिल्ह्यातल्या स्थानकांवर प्रवासी सुविधांमध्ये सातत्याने वाढ केली जात आहे. रेल्वे स्थानकांचा विकास आणि आधुनिकीकरण ही एक निरंतर प्रक्रिया असून गरजा, प्राधान्यक्रम आणि निधीची उपलब्धता यावर आधारित ही कामे हाती घेतली जातात.

वैभववाडी रोड, कणकवली, सिंधुदुर्ग, कुडाळ आणि सावंतवाडी रोड स्थानकांवर प्रमुख प्रवासी सुविधांची कामे पूर्ण झाली आहेत किंवा हाती घेण्यात आली आहेत. यामध्ये मॉड्युलर आणि फलाट निवारे, उच्च-स्तरीय फलाट, पादचारी पूल, लिफ्ट, सरकते जिने, दिव्यांगांसाठी अनुकूल स्वच्छतागृहे, पाण्याची सोय, प्रतीक्षा कक्ष, डिजिटल डबा दर्शक फलक आणि इतर प्रवासी सुविधांचा समावेश आहे.

सावंतवाडी रोड स्थानकावर, स्थानकाचे दुसरे प्रवेशद्वार म्हणून पूर्व दिशेला तिकीट कार्यालय, प्रतीक्षा कक्ष आणि संबंधित सुविधांचे बांधकाम हाती घेण्यात आले आहे. तसेच, खारेपाटण रोड, अचिर्णे, नांदगाव रोड, झाराप आणि मडुरे स्थानकांवरही प्रवासी सुविधांची कामे करण्यात आली आहेत.

सिंधुदुर्ग रेल्वे स्थानकावर (ओरस) यूटीएस तसेच पीआरएस तिकीट बुकिंग सुविधा उपलब्ध आहे, तर वैभववाडी रोड रेल्वे स्थानकावर यूटीएस तिकीट सुविधा उपलब्ध आहे. आरक्षित आणि अनारक्षित तिकीट बुकिंग तसेच इतर रेल्वे सेवांसाठी प्रवासी रेल-वन ॲपचाही वापर करू शकतील.

जिल्ह्यातल्या प्रवाशांसाठी दळणवळण सुविधा सुधारण्यासाठी, सिंधुदुर्ग स्थानकावर एर्नाकुलम-हजरत निजामुद्दीन एक्स्प्रेस आणि एर्नाकुलम-अजमेर मरुसागर एक्स्प्रेसला थांबा देण्यात आला आहे. त्याचप्रमाणे, कणकवली स्थानकावर हिसार-कोईम्बतूर एक्स्प्रेस आणि गांधीधाम-नागरकोईल एक्स्प्रेसला थांबे देण्यात आले आहेत.

याशिवाय, सावंतवाडी रोड स्थानकावर छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस-मंगळूरू जंक्शन एक्स्प्रेस, तिरुवनंतपुरम सेंट्रल-हजरत निजामुद्दीन राजधानी एक्स्प्रेस आणि लोकमान्य टिळक टर्मिनस-तिरुवनंतपुरम नॉर्थ गरीब रथ एक्स्प्रेस यांच्या थांब्यांना मंजुरी देण्यात आली आहे.

सिंधुदुर्ग जिल्ह्यातल्या स्थानकांवर गाड्यांच्या थांब्यांचा तपशील खालीलप्रमाणे आहे:-

KHAREPATAN RD:

S.N.

Train No.

Train Name

1

10106/10105

Sawantwadi–Diva Express

VAIBHAVWADI ROAD:

S.N.

Train No.

Train Name

1

10106/10105

Sawantwadi–Diva Express

2

10104/10103

Madgaon-CSMT Mandovi Express

3

20111/20112

Madgaon-CSMT Konkan Kanya Express

4

11004/11003

Sawantwadi-Dadar Tutari Express

5

19057/19058

Surat–Mangaluru Jn Express

ACHIRNE:

S.N.

Train No.

Train Name

1

10106/10105

Sawantwadi–Diva Express

NANDGAON RD:

S.N.

Train No.

Train Name

1

10106/10105

Sawantwadi–Diva Express

2

11004/11003

Sawantwadi-Dadar Tutari Express

KANKAVALI:

S.N.

Train No.

Train Name

1

10106/10105

Sawantwadi–Diva Express

2

10104/10103

Madgaon-CSMT Mandovi Express

3

20111/20112

Madgaon-CSMT Konkan Kanya Express

4

11004/11003

Sawantwadi-Dadar Tutari Express

5

12051/12052

CSMT–Madgaon Janshtabdi Express

6

12617/12618

Ernakulam–H.Nizamuddin Mangala Exp.

7

12133/12134

CSMT-Mangaluru Jn Express

8

22229/22230

CSMT-Madgaon Vande Bharat Express

9

11099/11100

LTT-Madgaon Express

10

22150/22149

Pune–Ernakulam Express

11

16338/16337

Ernakulam–Okha Express

12

10116/10115

Madgaon-BandraT Express

13

22629/22630

Dadar–Tirunelveli Express

14

22115/22116

LTT-Karmali AC Express

15

22475/22476

Hisar–Coimbatore AC Express

16

16335/16336

Gandhidham-Nagarcoil Express

17

11203/11204

Nagpur-Madgaon Express

18

19057/19058

Surat–Mangaluru Jn Express

SINDHUDURG:

S.N.

Train No.

Train Name

1

10106/10105

Sawantwadi–Diva Express

2

10104/10103

Madgaon-CSMT Mandovi Express

3

20111/20112

Madgaon-CSMT Konkan Kanya Express

4

11004/11003

Sawantwadi-Dadar Tutari Express

5

22113/22114

LTT-TVC North Express

6

10116/10115

Madgaon-BandraT Express

7

22634/22633

H.Nizamuddin–Thiruvananthpuram Exp.

8

19260/19259

Bhavnagar–TVCNorthExpress

9

22656/22655

H.Nizamuddin–ThiruvananthpuramExp.

10

12978/12977

Ajmer–Ernakulam Marusagar Express

11

19057/19058

Surat–Mangaluru Jn Express

KUDAL:

S.N.

Train No.

Train Name

1

10106/10105

Sawantwadi–Diva Express

2

10104/10103

Madgaon-CSMT Mandovi Express

3

20111/20112

Madgaon-CSMT Konkan Kanya Express

4

11004/11003

Sawantwadi-Dadar Tutari Express

5

12051/12052

CSMT–Madgaon Janshtabdi Express

6

16345/16346

LTT-Thiruvannathpuram Netravati Exp.

7

12619/12620

LTT-Mangaluru Mastygandha Exp.

8

22119/22120

CSMT-Madgaon Tejas Express

9

22414/22413

H.Nizamuddin–Madgaon Rajdhani Exp.

10

22115/22116

LTT-Karmali AC Express

11

20932/20931

Indore–TVC North Express

12

16312/16311

TVCNorth–SrGanganagar Express

13

22908/22907

Hapa–Madgaon Express

14

16334/16333

Thiruvananthapuram–Veraval Exp

15

19057/19058

Surat–Mangaluru Jn Express

16

11203/11204

Nagpur-Madgaon Express

ZARAP:

S.N.

Train No.

Train Name

1

10106/10105

Sawantwadi–Diva Express

SAWANTWADI:

S.N.

Train No.

Train Name

1

50108/50107

Madgaon–Sawantwadi Passenger

2

10106/10105

Sawantwadi–Diva Express

3

10104/10103

Madgaon-CSMT Mandovi Express

4

20111/20112

Madgaon-CSMT Konkan Kanya Exp

5

11004/11003

Sawantwadi-DadarTutari Express

6

12051/12052

CSMT–Madgaon Janshtabdi Express

7

11099/11100

LTT-Madgaon Express

8

22150/22149

Pune–Ernakulam Express

9

10116/10115

Madgaon-BandraT Express

10

16635/16636

Gandhidham-Nagarcoil Express

11

12742/12741

Patna–Vasco Express

12

19057/19058

Surat–Mangaluru Jn Express

13

11203/11204

Nagpur-Madgaon Express

MADURE:

S.N.

Train No.

Train Name

1

50108/50107

Madgaon–Sawantwadi Passnger

 

केंद्रीय रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांनी आज लोकसभेत एका लेखी उत्तरात ही माहिती दिली.

 

* * *

पीआयबी मुंबई | सुषमा काणे/निखिलेश चित्रे/दर्शना राणे

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai


(Release ID: 2287869) अभ्यागत कक्ष : 45
Read this releasein: English