रेल्वे मंत्रालय
धाराशिव-बीड-छत्रपती संभाजीनगर नवीन रेल्वे मार्गाच्या सर्वेक्षणाला मंजुरी; डीपीआर तयार करण्याचे काम प्रगतीपथावर
Posted On:
22 JUL 2026 4:07PM by PIB Mumbai
मुंबई, 22 जुलै 2026
रेल्वे मंत्रालयाने धाराशिव-बीड-छत्रपती संभाजीनगर या नवीन प्रस्तावित रेल्वे मार्गासाठी (240 किमी) सविस्तर प्रकल्प अहवाल (डीपीआर) तयार करण्याकरिता सर्वेक्षणास मंजुरी दिली आहे. या सर्वेक्षणाचे काम आधीच सुरू झाले आहे.
सविस्तर प्रकल्प अहवाल (डीपीआर) तयार झाल्यानंतर, रेल्वे प्रकल्पाला मंजुरी मिळवण्यासाठी राज्य सरकारसह विविध भागधारकांशी सल्लामसलत करणे तसेच नीती आयोग, वित्त मंत्रालय यांसारख्या संस्थांकडून मूल्यांकनासारख्या आवश्यक त्या मंजुरी मिळवून घेणे आवश्यक असेल. रेल्वे प्रकल्पांना मंजुरी देणे ही सततची आणि गतिमान प्रकिया असते. या प्रक्रियेसाठी लागणारा नेमका कालावधी हा संबंधित घटकांकडून केल्या जाणाऱ्या मूल्यमापनावर आणि मिळणाऱ्या मंजुरींवर अवलंबून असतो, असे रेल्वे मंत्रालयाने म्हटले आहे.
केंद्रीय रेल्वे, माहिती व प्रसारण आणि इलेक्ट्रॉनिक्स व माहिती तंत्रज्ञान मंत्री अश्विनी वैष्णव यांनी आज लोकसभेत एका लेखी उत्तरात ही माहिती दिली.
* * *
पीआयबी मुंबई | सुषमा काणे/मंजिरी गानू/दर्शना राणे
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
(Release ID: 2287840)
अभ्यागत कक्ष : 89